Categories: लेख

Besan Ladoo Recipe In Marathi | परफेक्ट बेसन लाडू रेसिपी

नमस्कार मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत Besan Ladoo Recipe In Marathi | परफेक्ट बेसन लाडू रेसिपी. बघण्याची काय गरज आहे कारण की नेहमीच आपण बेसनाचे लाडू बनवतो. पण यात गंमत अशी आहे की हे लाडू बनवताना थोडा जरी साखरेचा अंदाज चुकला तर गफलत होऊ शकते कारण की जर असे झाले तर आपण हे लाडू बाहेरच्यांना देखील देऊ शकत नाही आणि घरच्यांना सुद्धा ते लाडू खाण्याची इच्छा होत नाही.

चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया दिलेल्या स्टेप्सनुसार तुम्ही जर लाडू बनवण्याचा प्रयत्न केला तर तुमचे बेसन लाडू एकदम परफेक्ट होतील यात काही शंका नाही

बेसन लाडू साठी लागणारे साहित्य

एक कप साजूक तूप
दीड कप बेसन
वेलची पूड
काजूचे तुकडे
आणि मनुके

Besan Ladoo Recipe In Marathi | परफेक्ट बेसन लाडू रेसिपी

प्रक्रिया

सगळ्यात आधी चार चमचे साजूक तूप घ्या जर तूप नसेल तर तुम्ही डालडा पण वापरू शकता. गॅस वरती कढई ठेवा आणि त्यामध्ये दीड कप बेसन आणि साजूक तूप यांचे मिश्रण करा आणि लो गॅस वरती हळूहळू भाजत रहा.

हे मिश्रण भाजताना थोडे थोडे तूप तुमच्या परमानुसार त्यात टाकत चला आणि सतत हलवत रहा जेणेकरून ते कढईला किंवा PAN ला चिकटणार नाही

दहा मिनिटं भाजल्यावर ती त्याला थोडासा लाल रंग येण्यास सुरुवात होईल पुरेसा रंग लाल रंग आल्यानंतर गॅस बंद करा त्यानंतर वेलची पूड घ्या आणि एक चमचा या मिश्रणात टाका तसेच तुमच्या आवडीनुसार काजू सुद्धा यामध्ये मिक्स करा

आता हे मिश्रण वरपासून खालपर्यंत चांगल्या पद्धतीने मिक्स करा ते गरम असेल तेव्हाच ते व्यवस्थित मिक्स होते मिक्स करून झाल्यानंतर थंड होईपर्यंत बाजूला ठेवा.

मिश्रण थोडेसे कोमट झाल्यावर त्यात दोन कप पिठीसाखर घाला जर तुम्हाला बेसनाच्या लाडूची गोडी जास्त हवी असेल तर त्यात याच्यापेक्षा जास्त साखर घातली तरी चालते हे मिश्रण एकजीव झाले आहे याची खात्री झाल्यानंतर तुम्ही लाडू व्हायला घेऊ शकता

लाडू वळताना त्यावरती मनुके लावायचे आहेत काही जण लाडवाच्या गरम मिश्रणातच मनुके टाकतात पण मला तरी नंतर एकेक मनोका लावलेला आवडतो त्यामुळे मनुक्याची चव ही जपली जाते आणि दोन वेगळ्या चवींचा अनुभव लाडू खात नाहीत

आता हे लाडू एका प्लेटमध्ये काढा आणि गार झाल्यावर ती डब्यामध्ये भरून ठेवा अशाप्रकारे आपले बेसनाचे गोड स्वादिष्ट लाडू तयार झाले आहेत तुम्हालाही बेसन लाडू रेसिपी कशी वाटली हे नक्की कळवा आणि आपल्या मैत्रिणींबरोबर किंवा नातेवाईकांबरोबर शेअर करायला विसरू नका

स्वादिष्ट बासुंदी घरी बनवायची आहे ? रेसिपी वाचण्यासाठी क्लिक करा.

पुरणपोळीचा बेत अस्सल महाराष्ट्रीयन रेसिपी शिवाय पूर्ण होणारच नाही. क्लिक करा.

बाळगुटी म्हणजे काय ? आणि त्याचा वापर कसा करावा ?

mazablog

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

1 month ago

आभासी प्रेम | Best love poem on rain in marathi in 2024

श्री विजय तानाजी पाटील यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem on rain in marathi in…

1 month ago

दिखाव्याला भुलला | Best cute love poem in marathi in 2024

श्री.मच्छिंद्र रत्नाकर झुरंगे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत cute love poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

ऑनलाईन प्रेम | best love poem for her in marathi in 2024

जयद्रथ आखाडे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem for her in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

खरचं हे प्रेम आहे का | best love athavan poem in marathi in 2024

प्रतिक्षा परमेश्वर थोटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love athavan poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

आभासी ओढ | Best funny love poem in marathi in 2024

अनंत वा तेलंग यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत funny love poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago