Categories: लेख

Guru Purnima Speech in Marathi

गुरु पौर्णिमा महत्व :

गुरुब्रम्हा गुरु विष्णू , गुरुदेवो महेश्वरायः ।
गुरु साक्षात परब्रम्ह, तस्मैयश्री गुरवे नमः ।।
Speech for guru purnima in marathiguru purnima marathi speech

ब्रम्हा, विष्णू, महेश यांचे रुप म्हणजे गुरु . या साक्षात परब्रम्हाला माझे नमस्कार असो, असा गुरुमहिमा भारतीय संस्कृतीमध्ये वर्णन केला आहे. ही गुरुपौर्णिमा म्हणजेच व्यासपौर्णिमा आषाढ शुद्ध पौर्णिमेदिवशी साजरी होते.

व्यास महर्षिं यानी महाभारत हा महान ग्रंथ लिहिला. महाभारत काळामघ्ये मोठे विद्वान, श्रेष्ठ असे व्यासमुनी होऊन गेले. त्यांच्या इतके थोर व्यासंगी, ज्ञानसंपन्न गुरु अद्यापपर्यंत झाले नाहीत ,अशी आपली श्रद्धा आहे. जसे राजावाचून सेना, शेतकऱ्यावाचून मळा आणि मंगळ सुत्रावाचून स्त्रीचा गळा, नावाड्याशिवाय नौका या गोष्टी जशा विसंगत वाटतात त्याच प्रमाणे सदगुरुशिवाय जीवन व्यर्थ आहे. म्हणूनच श्री समर्थ यांनी ‘सदगुरुविणा जन्म निष्फळ’ असे म्हटले आहे.

विद्या हे महान दैवत आहे. विद्यादान करण्याचे महान आणि पवित्र असे कार्य गुरु करतात. म्हणूनच गुरु म्हणजे ज्ञानाची गंगोत्री आणि सरस्वतीची अमृतवाणी, तसेच सर्वांना ज्ञानाचा प्रकाश देणारा दीपस्तंभ, भावी पिढीला घडवणारा शिल्पकार, गुरु म्हणजे दयेचा सागर आणि केवळ लोकांच्या कल्याणासाठीच झटणारा, निस्वार्थी असा ज्ञान दान करणारा, गुरुविना आपल्या जीवनाचा मार्ग सफल होऊ शकत नाही. कारण दिपस्तंभाशिवाय आपली नौका किनाऱ्याला सुरक्षितपणे पोहोचू शकत नाही. speech for guru purnima in marathiguru purnima marathi speech

कोकिळेच्या आवाजात जरी माधुर्य असले तरी कंठ फुटण्यास वसंत ऋतुच यावा लागतो. त्याच प्रमाणे मनुष्याजवळ ज्ञान उपजत असले तरी ते फलद्रुप होण्यासाठी त्याला सद्गुरु पासून चालना मिळावी लागते. लोखंड जसा परिसाच्या स्पर्शाने सुवर्ण बनतो . त्याचप्रमाणे गुरुच्या ज्ञानदानाने शिष्य हा कृतार्थ होतो.

Guru Purnima ज्ञानाचे पीठ :

गुरु हे ज्ञानाचे पीठ आहे . या दिवशी गुरुचे पूजन करणे म्हणजे ज्ञानाचे आणि सत्याचे पूजन करणे होय. गुरुसारखा पाठीराखा पाठीशी असला तर शिष्याला जीवनात मार्ग सापडतो. गुरुची सुरुवात आपल्या आईवडीलांपासून होते. आई ही प्रत्येकाची सगळ्यात मोठी गुरु आहे. ती आपल्या बाल मनावर अनेक चांगले संस्कार रुजवते, कितीतरी चांगल्या गोष्टींचे ज्ञान, चांगले विचार आणि सदाचार आपल्या मनावर बिंबवते, आपण अज्ञानाचे सज्ञान आईच्याच तालमीत होतो . प्रेम आणि वात्सल्य ह्या गुणांचा वारसा आपण तिच्याकडूनच घेतो.

Speech for guru purnima in marathiguru purnima speech

महर्षी व्यास हे जीवनाचे खरे भाष्यकार आणि समाजाचे खरे गुरु होते. महान साहित्यिक तत्ववेत्ता म्हणून गुरु व्यास यांची किर्ती आहे. व्यासमुनी हे शिष्यांना मौनातून ज्ञान द्यायचे. व्यासांच्या नंतर जो शिष्य संप्रदाय तयार झाला. त्यांना गुरुपौर्णिमेच्या दिवशी अधिकार देण्यात आला की, त्यांनी मौन ऐवजी मुखवाणीतून शिष्याला ज्ञान द्यावे. आणि तेव्हापासून “गुरुपौर्णिमा” साजरी करण्याची प्रथा सुरु करण्यात झाली. त्या दिवशी गुरुप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपूजन करुन गुरुदक्षिणा दिली जाते . अर्थात हे सर्व शिष्याच्या अध्यात्मिक उन्नत्तीसाठी असते.

गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्व हजार पटीने कार्यरत असते. इतर दिवशी गुरुंसाठी काही केल्याने जो फायदा होतो, त्यापेक्षा गुरुपौर्णिमेच्या दिवशी हजार पटीने फायदा होतो. या दिवसाचे हे माहात्म्य आहे. वैदिक काळापासूनच गुरुबद्दलचा आदर आपणास दिसून येतो. महाराजे हे देखील गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय राजकारण करित नाहीत . भारतीय गुरु परंपरेमध्ये गुरु – शिष्याच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. जसे जनक – याज्ञवल्क्य, कृष्ण – सुदामा आणि संदिपनी, गुरु विश्वामित्र – राम लक्ष्मण, परशुराम – कर्ण, गुरु द्रोणाचार्य – अर्जुन अशी गुरु शिष्य परंपरा आहे.

गुरुबद्दलचा आदर कर्ण यांच्या उदाहरणामध्ये देता येईल. गुरूंची झोप मोडू नये म्हणून स्वत:ची मांडी भुंग्याने पोखरुन काढली तरी थोडीही हालचाल न करता सर्व वेदना सहन केल्या. त्या केवळ गुरुबद्दलच्या आदरापोटी, समाजामध्ये गुरुचे स्थान अतिशय उच्च आहे. म्हणूनच भारतात गुरुची महती राहण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी करतात.speech for guru purnima in marathiguru purnima marathi speech

Guru Purnima : निसर्ग मोठा गुरु :

निसर्ग हा देखील एक गुरुच आहे. निसर्ग हा त्यागाचे मूर्तीमंत प्रतीक आहे . निसर्गामधील नद्या, पर्वत, सरोवर, झरे, धबधबे, दऱ्या – खोऱ्या, वेली, फळे, पाऊस, वृक्ष हे आपणास गांभीर्य, परोपकार, निश्चलता, सहिष्णूता शिकवतात. निसर्ग हा जणू महान जादुगारच आहे . त्याच्याजवळ ज्ञानाचा अपार असा खजिना आहे. निसर्गातून आपल्यावर खूप चांगले संस्कार घडतात. पण त्यासाठी आपल्याला निसर्गोपासना करायला हवी. वृक्ष, फुले, फळे ,वेली, या पासून शितलता घेता येते. तसेच जमिनीपासून दृढ निर्धार असे सुसंस्कार आपण घेऊ शकतो.

आज मोठ्या प्रमाणात संस्कृतीचे अवमूल्यन होत आहे. गुरु अर्थात शिक्षकाने वर्गात कोणाचा अपमान केला किंवा अभ्यासाबद्दल विचारले तर वेळप्रसंगी त्या गुरुला मारहाण केली जाते आणि अपशब्द बोलले जातात . अशा परिस्थितीमध्ये मुलांना गुरु आणि त्यांचे महात्म्य याचे ज्ञान मिळणे आवश्यक आहे . त्यामुळे प्रत्येक घरामध्ये , शाळेत , शैक्षणिक संस्थेमध्ये गुरु पौर्णिमा साजरी झाली पाहिजे. यासाठी हा सगळा लेखन प्रपंच, गुरुविषयीचे थोडक्यात सार खालील दोन ओळीत आपल्याला सापडेल.speech for guru purnima in marathiguru purnima marathi speech

Swati

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

1 month ago

आभासी प्रेम | Best love poem on rain in marathi in 2024

श्री विजय तानाजी पाटील यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem on rain in marathi in…

1 month ago

दिखाव्याला भुलला | Best cute love poem in marathi in 2024

श्री.मच्छिंद्र रत्नाकर झुरंगे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत cute love poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

ऑनलाईन प्रेम | best love poem for her in marathi in 2024

जयद्रथ आखाडे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem for her in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

खरचं हे प्रेम आहे का | best love athavan poem in marathi in 2024

प्रतिक्षा परमेश्वर थोटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love athavan poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

आभासी ओढ | Best funny love poem in marathi in 2024

अनंत वा तेलंग यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत funny love poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago