Categories: लेख

Kabbadi Info In Marathi:

Kabbadi Info In Marathiभारत देशात बऱ्याच खेळांचा उगम झाला आहे. या खेळांचा जन्म घेण्यामागे आणखीन पण बरीच कारणं असतील किंवा नसतील . पण एक महत्वाचं कारण आहे ,ते म्हणजे शारिरीक व्यायाम. शरीराची हालचाल होणं हे फार आवश्यक आहे. आणि ते फक्त या मैदानी खेळांच्या माध्यमातुन होते . त्यामुळे या खेळांना फार महत्वं असायचं.धावतं युग आणि डिजिटल माध्यम आले त्यामुळे मैदानं ओस पडतांना दिसु लागली. युवा पिढी , लहान मुलं ,अगदी वयस्कर माणसेही हातात मोबाईल घेऊन तासन तास घरात एकाच ठिकाणी बसु लागली.त्यामुळे याचे दुष्परीणाम सुध्दा लगेच दिसायला लागले . kabaddi information मेंदू दगड झाला आणि शरीर अवाढव्य वाढत गेलं.व्यायामाच्या कमतरतेमुळे त्याचे दुष्परीणाम सुध्दा दिसायला लागले. या घातक दुष्परीणामांपासुन युवा पिढीला दुर ठेवायचे असेल तर त्यांना मैदानी खेळांचं महत्वं कळायलाच हवं.भारतामध्ये असाच एक खूप पुर्वीपासुन चालत आलेला खेळ म्हणजे कबड्डी! जाणून घेऊया कब्बड्डी या खेळाची संपूर्ण माहिती मराठी मध्ये –Kabbadi Info In Marathi

कबड्डीची माहिती :

kabaddi informationकबड्डी या खेळाची सुरूवात नेमकी कधी आणि कशी झाली ,याबद्दल खात्रीने जरी काही सांगता येत नसले .तरी अभिमन्युने या खेळाची सुरूवात महाभारताच्या काळात केली होती. असे काही तज्ञांच्या मते सांगण्यात येते.भारतात सुमारे ४००० वर्षांपासुन कबड्डी हा खेळ खेळला जात आहे.असे काही जाणकारांच्या मते सांगण्यात येते.आपल्या भारतामध्ये देखील प्रत्येक राज्यात वेगवेगळया नावांनी आणि थोडयाफार फरकाने हा खेळ खेळला जात आहे.Kabbadi Info In Marathi

या खेळाला महाराष्ट्रात हुतूतू… बंगालमध्ये हुडूडू… केरळमध्ये वंडीवडी… चेन्नईत चेडूयुडू… उत्तर भारतात कोनवरा, साबरगण्णा… पंजाब राज्यात झाबर गंगा,सौची पक्की अश्या वेगवेगळया नावांनी ओळखतात . आणि थोडयाफार फरकाने हा खेळ खेळला जात होताच . पण या खेळाला सर्वदुर एकच नाव असावं . या करता महाराष्ट्र राज्याने प्रयत्नं केले आहेत.भारतात हा खेळ ’कबड्डी’ या नावाने ओळखला जातो . आणि त्याचं श्रेय आपल्या महाराष्ट्र राज्याला द्यायला हवं. मराठी माणसांनी अगदी प्रयत्नपुर्वक कबड्डी या खेळातल्या विविधतेतुन आपल्या राज्यात एकता निर्माण केली.कबड्डी हा खेळ पुर्वी फार नियमांमुळे आखीव रेखीव खेळला जात नसे . एका मैदानाचे दोन भाग एका रेषेने केले की संपले नियम! अश्या नियमांच्या अभावामुळे गोंधळाची परिस्थीती निर्माण होत असे.Kabbadi Info In Marathi

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत समावेश:

kabaddi information १९३१ साली महाराष्ट्रातील अकोला येथे अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण परिषदेचे चौथे अधिवेशन पार पडले. भारतामधील देशी खेळांचे नियम ठरविण्यासाठी या अधिवेशनात एक समिती नेमण्यात आली.भारतामधील देशी खेळांचे नियम या समितीने तयार केले . पुढे १९३७ ला नाशिक मध्ये पार पडलेल्या अधिवेशनामध्ये या नियमांना मान्यता देण्यात आली.पुढे नियमामध्ये काही दुरूस्त्या करण्यात आल्या. त्याच वर्षी कबड्डी या खेळाचा ऑलम्पिक संघटनेने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत समावेश केला. महाराष्ट्र राज्याने जे काही नियम या खेळाकरीता निश्चित केले होते .त्या नियमांनुसार संपुर्ण भारतात कबड्डी हा खेळ खेळला जाऊ लागला.Kabbadi Info In Marathi

kabaddi information पुढे कबड्डीच्या प्रचाराकरीता आणि प्रसाराकरीता अपार कष्ट आणि मेहनत घेतली गेली. या खेळाने भारत देशाच्या कक्षा ओलांडल्या. कबड्डी या खेळाला देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यात अनेकांनी मेहनत घेतली.१९९० ला बिजींग येथे पार पडलेल्या आशियाई स्पर्धांपासुन आशियात कबड्डीला समाविष्ट करण्यात आले. या खेळाला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यात महाराष्ट्राचा फार मोठा वाटा आहे.आणखी एक विशेष कौतुकास्पद गोष्ट म्हणजे, कबड्डी हा असा एकमेव खेळ आहे . की या खेळात पुरूष आणि महिला अश्या दोन्हीही भारतीय संघांनी विश्वकप जिंकला आहे.तसेच गेल्या काही वर्षांमध्ये प्रो – कबड्डी या सामन्यांमुळे या खेळाला नवसंजिवनी मिळाली आहे, मोठ-मोठे कलाकार आपापल्या टिम विकत घेत आहेत.या खेळाकरता जरी अशा सकारात्मक गोष्टी घडत असल्या तरी या झगमगाटात पारंपारिक पध्दतीने खेळली जाणारी कबड्डी जगली आणि तगली पाहीजे असं प्रत्येकाला मनोमन वाटुन जातं.Kabbadi Info In Marathi

कबड्डीसाठी लागणारे मैदान :

कबड्डी हा खेळ पुरूष आणि स्त्रिया दोघेही खेळु लागले आहेत. पुरूषां करता १२. ५० ग १० मी. आणि महिलांकरता ११ मी ग ८मी. असं आयताकृती मैदान लागतं .या मैदानात शेणखत आणि बारीक चाळलेली माती याचा वापर करून सपाट मैदान तयार करण्यात येतं.पुर्वी केवळ खुल्या मैदानात खेळला जाणारा हा खेळ काळानुरूप आता बंदिस्त जागेत मॅट वर देखील खेळला जातो . तरी देखील अस्सल मातीतला कबड्डीचा खेळ पाहाण्यात जास्त गमंत येते.Kabbadi Info In Marathi

कबड्डी खेळाचे फायदे:

शरीर स्वस्थ आणि निरोगी राहते.kabaddi information
सामुहिक खेळ असल्याने सांघीक कार्य करण्याची भावना वृध्दिंगत होते.

Author : Mrs. Swati Dhas Kshirsagar

शेती नावावर करून घेताना – आजची वास्तवता

उन्हाळ्यात स्वतःची काळजी कशी घ्यावी ? तुम्हाला आमच्या या ब्लॉग जाऊन नवीन माहिती घ्यायला नक्की आवडेल.

 

Swati

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

1 month ago

आभासी प्रेम | Best love poem on rain in marathi in 2024

श्री विजय तानाजी पाटील यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem on rain in marathi in…

1 month ago

दिखाव्याला भुलला | Best cute love poem in marathi in 2024

श्री.मच्छिंद्र रत्नाकर झुरंगे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत cute love poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

ऑनलाईन प्रेम | best love poem for her in marathi in 2024

जयद्रथ आखाडे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem for her in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

खरचं हे प्रेम आहे का | best love athavan poem in marathi in 2024

प्रतिक्षा परमेश्वर थोटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love athavan poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

आभासी ओढ | Best funny love poem in marathi in 2024

अनंत वा तेलंग यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत funny love poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago