Categories: लेख

Marathi Love Story “एकतर्फी”

Marathi Love Story “एकतर्फी” भाग १

असंच नेहमीप्रमाणे कॅन्टीनमध्ये बसलो होतो , त्याच गप्पा आणि तेच विनोद. अचानक एक सुगंध हवेत दरवळला आणि आपोआप नाक देखील त्या दिशेला जाण्यास उत्सुक झाले, मी त्या दिशेने पाहिले, एक मुलींचा ग्रुप हसत हसत शेजारच्या टेबल वर बसला. एकूण मुली चार होत्या पण तो सुगंध एकीचाच जी माझ्या अगदी समोरच बसली होती(नजरेच्या). चेहरा सगळंच काही सांगत नव्हता पण माझे डोळे ताबा सोडत होते, काहीना काही कारणाने ते तिकडेच जायचे, म्हणजे तो टेबल शेवटचा जरी असला तरी त्यामागच्या भिंतीवर काय लिहिले आहे ते वाचायची आवडच मला लागली होती जणू. आमचा नाश्ता करून झाला होता तरी अगदी शेवटच्या चेंडूवर षटकार मारावा तसा मी शेवटच्या क्षणी चहा मागवला आणि सगळ्यांनी माझ्याकडे असं पाहिलं की जणू मी त्यांनाच चहा बनवायला सांगितला आहे. पुन्हा सगळ्यांनी वेडीवाकडी तोंडं करून आहे त्या जागेवर बसले. मी एरवी चहा घेणं टाळतो पण त्या एका चेहऱ्यामुळे मला तो सुद्धा प्रिय झाला असावा. चहा संपला आणि वेळही झाला होता, मग आम्ही तिथून निघालो. डोक्यात एकच विचार चालू होता, ती उद्या परत दिसेल का? आणि आम्ही गप्पा मारत कामाला लागलो. Maza Blog

दिवस संपला, आता पार्किंग मधे दिसतेय का अशी अपेक्षा होती. कोण मुलगी, कुठे काम करते, काय काम करते, असा काहीही पत्ता नाही पण तरीही आजच्या दिवसातील एक सुंदर घटना होती माझी. कसं असतं ना, एक व्यक्ती आधी कधीही न पाहिलेली एवढ्या चार व्यक्तींमध्ये तिच्यावरच नजर खिलवावी असं याआधी कधी घडलंच नव्हतं. तुम्ही कितीही व्यस्त असले तरीही ते एक चित्र नेहमीच डोळ्यासमोर येत असतं.

Marathi Love Story एकतर्फी

दुसऱ्या दिवशी ऑफिस ला आलो, कामाला सुरवात केली, थोडा वेळ काम केल्यावर जरा कंटाळा आला म्हणून बाहेर गेलो तर ती मला जिन्यातून वर जाताना दिसली, अचानक छातीवर काहीतरी वजन पडावं आणि श्वास दीर्घ व्हावा असं काहीतरी घडलं. ती दिसेनाशी झाली आणि मी पुन्हा आतमध्ये येऊन बसलो. “ती मला आवडतें का?” हा एक प्रश्न मी मलाच विचारला आणि उत्तर न देताच सोडून दिला. काही प्रश्न हे उत्तरासाठी नसतात. पुन्हा तीच वेळ तोच टेबल, तोच नाष्टा, आणि तेच मित्र. फक्त माझ्या मनातल्या अपेक्षा नवीन होत्या, माणसांच्या त्या गर्दीत मी तो एक चेहरा शोधत होतो. “आज पुन्हा येईल का ती? दिसेल का मला?” ह्या प्रश्नांनी गर्दी केलेलं मन. आमची निघायची वेळ झाली पण ती आज दिसलीच नाही. अचानक मनात एक विचित्र एकटेपणा जाणवू लागला. म्हणजे दोन दिवसांपूर्वी हे सगळं नीट होतं पण त्या एका चेहऱ्यामुळे आता प्रत्येक क्षणावर एक अदृश्य ताबा घेतला होता. शेवटचा चहा घेऊन जीना उतरू लागलो आणि तिला त्याच वेळी वर येताना पाहिले. अचानक एक ऊर्जा माझ्या शरीरात आली आणि मी तिला पाहत जीना उतरलो. वाटतं होतं पुन्हा वर जाऊन बसवं पण आता वेळ नव्हती. चला काहीतरी चांगलं झालं, आणि मी पुन्हा कामावर दाखल झालो. Maza Blog


गेले कित्येक दिवस हे असं बघण्याचं सत्र सुरूच होतं, पण माणूस असल्याकारणाने अपेक्षा वाढतात आणि मला तीचं कमीत कमी काय नाव आहे हे जाणून घ्यायचं होतं. कस ते माहीत नव्हतं पण आज ते मी जाणूनच घेणार होतो. सुट्टी झाली आणि मी पुन्हा कॅन्टीनमध्ये गेलो, आता सध्यातरी एवढी एकच जागा अशी होती की जिथे आम्ही दोघं वेगळे एकत्र बसायचो. ती आली आणि आज मात्र तिच्यासोबत एकच मुलगी होती, ती टेबल वर जाऊन बसली आणि तितक्यात तिच्या मैत्रिणीने तिला आवाज दिला, “रजनी, तू काय खाणार आज?” माझी नजर वर झाली आणि कान लगेच त्या दिशेला पोहचले. अपेक्षा करावी आणि पुढच्या क्षणात ती कोणीतरी पूर्ण करावी, “रजनी”, किती सुरेख नाव ते. आजकाल नुसतं नाव समजलं की त्या माणसापर्यंत पोहचायला वेळ लागत नाही म्हणतात. माझ्या चेहऱ्यावर एक हलकेच हसू चमकले. आज अगदीच युद्ध जिंकल्यासारख वाटत होतं. घरी गेलो आणि लगेच फेसबुक वर नाव शोधणार पण अडनावाच काय आशा किती रजनी भेटतील तिथे! तरीही थोडासा प्रयत्न केला आणि शेवटी अपयशी ठरत झोपलो.

Marathi Love Story एकतर्फी

Marathi Love Story “एकतर्फी” भाग २


आज कॅम्पस मधे झगमगाट वाटत होता, काहीतरी कार्यक्रम असावा बहुतेक. मी आपलं नेहमीप्रमाणे गाडी लावून ऑफिसमध्ये जायला निघालो तितक्यात काही मुली साडीमध्ये समोरून गेल्या. मी एकाला विचारले, “आज काय विषेश?” तर तो म्हणाला,”अरे आज पारंपरिक दिवस आहे! म्हणून हे सगळे असे ड्रेस वगेरे घालून आलेत.” मी हो बोलत कामावर गेलो. डोक्यात एकच विचार चालू होता आज ती कशी दिसत असेल? पण त्या आधी आज ती दिसेल का? आज ऑफिस मधून बाहेर जास्त वेळा जाणं होणार हे नक्की. शेवटी जेवणाची वेळ झाली आणि मी नेहमीच्याच जागी त्याच अपेक्षा घेऊन पोहचलो. आणि ती दिसली… माझे डोळे विस्परले, तोंड अर्धवट उघडं आणि भुवया किंचीत वर, याआधी देखील मी सौंदर्य पाहिलं होतं पण अशी कमनियता आजवर पहिली नव्हती.


विसर पडला होता जेव्हा ती दिसली,
सुगंध दरवळला होता जेव्हा ती जवळून गेली,
अन्न, हवा,पाणी एकत्र तिच्या सौंदर्यात होतं,
आणि काळीज मात्र माझं आज माझ्या हातात होतं. Maza Blog

एखाद्या मोरपंखा प्रमाणे दिसत असलेली ती, चेहऱ्यावरचा एक विलक्षण हास्य भाव, डोळ्यात थोडंस काजळ, ओठांवर गुलाबी लिपस्टिक, कानात डौलदार रिंगा, नाकावर पांघरून घातलेली नथ, आणि नेसलेली नऊवारी. आता फक्त माझी तयारी आणि एक पंडित यायचा बाकी आहे असं वाटलं.

आज मी तिच्याशी बोलावं अस वाटलं, पण मग कसं शक्य आहे हे? पण पुन्हा एक विचार आला, मला ती आवडते पण तिला कुठल्याही प्रकारची चाहूल लागू न देता मला तिच्यावर मनमुरादपणे प्रेम करायचंय. माझा वेळ झाला आणि मी जायला निघालो आणि माझं नशीब बलवत्तर ती सुद्धा माझ्यासोबत लिफ्ट साठी वाट पाहत उभी होती अगदी माझ्यापासून एक हात अंतरावर. आता मी ज्या अवस्थेत तिथे उभा आहे ते शहारे मी व्यक्त करू शकत नाही. लिफ्टमध्ये आम्ही दोघे आणि अजून एक अज्ञात व्यक्ती होता. कसं असतं ना, म्हणजे अज्ञात तर तिही होती मला पण तिच्याशी मी पारदर्शी निरागस नातं जोडून मोकळा झालो होतो. ती तिच्याच तंद्रीत होती आणि मी सुद्धा. तिच्या प्रत्येक श्वासावर मी लक्ष देत होतो अगदी परीक्षेत कॉपी करताना एखाद्या विद्यार्थाचं त्याच्या शिक्षकाकडे असतं तसंच. ती सहाव्या मजल्यावर बाहेर पडली आणि आमचा तो आठ सेकंदांचा प्रवास संपला. तो सहवासच संपला, मला सुद्धा तिथेच बाहेर यावं वाटलं, पण नाही जमत काही गोष्टी.
पण मी अशा मनस्थतीत होतो की मला तिला मिळवायचं नाही, मला तिच्याशी बोलायचं पण नाही, नाही कोणतं नातं जोडायचं. मला फक्त तिच्यावर प्रेम करायचं होतं.

Marathi Love Story एकतर्फी


खर पाहायला गेलं तर प्रेमाच्या खूप आशा व्याख्या बऱ्याच दिग्गजांनी लिहून ठेवल्या आहेत, काहींनी त्या चित्रफितीतून मांडल्या सुद्धा, पण माझ्या मते मी आता ज्या परिस्तिथीत त्या सुंदरी बरोबर आहे ते म्हणजेच प्रेम असावं. ती मनापासून आवडणं, ती दिसताच अंगावर शहारे येणं, ती जवळ नुसती उभी असली तरी हृदयाची हालचाल वाढत जाणं म्हणजेच प्रेम. आता यानंतर मी तिला मिळवण्यासाठी प्रयत्न करणार, खूप काही खटाटोप करून मी तीच लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणार, मग अगदीच शुल्लक कारणं काढून तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार, आणि अगदीच जमलं तर तिच्यासोबत वेळ कसा घालवता येईल यासाठी बाकीच्या माझ्या आयुष्याला बाजूला ठेऊन तिच्यासोबतचा काहीतरी नियोजन करणार. असं करता करता आम्ही दोघे एकमेकांना हळू हळू ओळखू लागणार, त्यात सुद्धा दोघेही किंवा ज्याला जास्त ओढ असेल तो आपापल्या कमीच्या बाजू लपवून एकमेकांना समजून घेणार, समोरचा कितीही मनाविरुद्ध वागला तरी “काही नाही रे, मला काहीच हरकत नाही.” असं अगदीच मनापासून बोलण्याचा प्रयत्न करणार. आणि शेवटी कोणीतरी एकजण हे नातं पुढे ढकलण्याची नेहमीप्रमाणे कोणीतरी कोणावर प्रेम करतंय हे सांगून त्या घडवलेल्या नात्याला ‘प्रेमाचं नातं’ असं नाव देणार. किती असतो ना खटाटोप! Maza Blog


पण माझं मत जरा वेगळं आहे, मला असं वाटतंय की मी आता आहे तो काळ म्हणजे प्रेम असावं. आणि दिग्गजांनी सुद्धा प्रेमाच्या त्याच व्याख्या केल्यात ना, तीचा सहवास हवासा वाटणे, डोळ्यासमोर नेहमी तिचाच चेहरा असणे, तिच्या प्रत्येक क्षणात आपलं लक्ष पाहिजे. पण हल्ली तसं होत नाही, जे नेमकं प्रेम आहे ते कधी संपेल आणि आमच्या प्रेम अस्ताला सुरवात होईल याची घाईचं सगळ्यांना झालेली असते. खरं म्हणजे ती आपल्या डोळ्यांना दिसल्यापासून ती आपल्या आयुष्यात येईपर्यंत जो काळ असतो तोच खरं तर ‘प्रेमाचा काळ’ असतो. त्यानंतर तर फक्त एकमेकांसोबत टिकून राहण्यासाठी केलेले खटाटोप असतात.
मी गेले कित्येक दिवस तिला पाहत होतो, तिच एक निरीक्षण करत होतो, पण मी तिला व्यक्त व्हावं आणि मग तिने मला काहीतरी बोलावं, पुन्हा तिला मी ‘मी’ समजून सांगावं अस मला अजिबात वाटलं नव्हतं. मला ते प्रेम मिळवायचं नव्हतं ते फक्त जगायचं होतं.
थोडे दिवस गेले त्या बहुलीने एक जादू केली होती ती वाढतंच होती, मात्र गेले काही दिवस ती दिसलीच नाही. मी अक्षरशः रोज वेळ काढून वेगवेगळ्या वेळेला बाहेर पडायचो, पण ती मात्र दिसली नाही. डोळ्यांना ती दिसत नव्हती म्हणून त्यांना भरती आली. मी एका शांत ठिकाणी असल्यासारखं मला वाटलं.


” त्या एकांताच्या अक्रोशाने माझ्या प्रेमाची जमीन हादरली होती, अवघ्या काही क्षणातच रक्ताने एक वेग घेतला होता, आणि हे घडत असताना माझ्या मनातल्या शब्दांना माझ्या वाणी ने बाहेर जाण्यासाठी होकार दिला होता…”

Author – स्वप्नील खैरनार

Marathi Love Story एकतर्फी

स्वप्नील खैरनार यांचे आणखी लिखाण वाचा – Marathi Poem On Love

Made In India Smartphone Review वाचण्या साठी क्लिक करा

mazablog

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

1 month ago

आभासी प्रेम | Best love poem on rain in marathi in 2024

श्री विजय तानाजी पाटील यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem on rain in marathi in…

1 month ago

दिखाव्याला भुलला | Best cute love poem in marathi in 2024

श्री.मच्छिंद्र रत्नाकर झुरंगे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत cute love poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

ऑनलाईन प्रेम | best love poem for her in marathi in 2024

जयद्रथ आखाडे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem for her in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

खरचं हे प्रेम आहे का | best love athavan poem in marathi in 2024

प्रतिक्षा परमेश्वर थोटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love athavan poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

आभासी ओढ | Best funny love poem in marathi in 2024

अनंत वा तेलंग यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत funny love poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago