Kavita In Marathi

मराठी कविता “ती अनोळखी रात्र” Best 2023 | Ratra Kavita in Marathi

ती अनोळखी रात्र | Ratra Kavita in Marathi वाचल कि बर्याच लोकांच्या डोक्यात सहवास आला असेल ;-D हा सहवास फक्त दोन माणसांन मधेच होतो का? नाही ना?

Secret What’s App Group Link

की मी एकटीच अशी वेडी आहे, जिला वाटते कि तो निसर्गा मधिल सर्व गोष्टींसोबत पण सहवास होऊ शकतो? मला वाटते नुसते एकमेकान सोबत बोलण्यापेक्षा, काही न बोलता देखील समोरच्याला समजून घेणे म्हणजे खरा सहवास. नाही का?

आयुष्याचा हा धडा मला त्या रात्री मिळाला जेव्हा पहिल्यांदा खऱ्या अर्थाने तिची आणि माझी ओळख झाली. ती म्हणजे रात्र. हो, ह्या रात्री मध्ये खूप रहस्य दडली आहेत. काहींसाठी ती फक्त झोपायची वेळ असेल, पण काहींसाठी ती त्यांच्या एकांतात त्यांना देणारी सोबत बनते. माझ्यासाठी तर ती माझ्या कलेला चालना देणारे कारण ठरली. माझ्या कविते द्वारा मी तिच्या शब्दांचा आवाज बनले. हो, कविता लिहण्याचा तो माझा सर्वात पहिला प्रयत्न होता. आता तो प्रयत्न यशस्वी ठरला कि नाही, हे माझी कविता वाचून तुम्हीच मला सांगा.
Kavita in Marathi : ती अनोळखी रात्र मराठी कविता रात्र

ती अनोळखी रात्र Best 2023 | Ratra Kavita in Marathi

“मी आणि माझा एकांत, सोबतीला मात्र ती अनोळखी रात्र,
सोबत तिच्या तो घनदाट काळोख, अशी होती आमची ती सर्वात पहिली ओळख.

सहवास झाला, गप्पा रंगल्या, विचार जुळले,
शब्ध तिचे कवितेत उतरवायला हाथ माझे आपोआप वळले.

म्हणते कशी, प्रेमात पडलेल्या सूर्याची सतत वाट पाहत राहते
आणि सायंकाळी त्याची भेट घेयला समुद्र किनारी जाते.

भेट होण्या पूर्वीच सूर्य मात्र मावळून जातो,
बघणा ग, रोज हा आमचा लपंडाव चालूच राहतो.

मराठी कविता “ती अनोळखी रात्र” Best 2023 | Ratra Kavita in Marathi

वाटते कि आता काळोख आणि एकांत हेच आहेत माझे सवंगडी,
इंग्लिश मध्ये म्हणतात ना ते काय ‘बेस्ट बडी’.

हो आणि आता तुझी देखील साथ आहे लाभली,
माझ्या आयुष्यावर तू तर डायरेक्ट कविताच लिहिली.

हळू हळू रात्र सरली, मी देखील निजले
आणि दुसऱ्या दिवशी मात्र दिवसभर तिचीच वाट पाहत बसले.

मन माझे व्याकुळ झाले. कधी रात्र येते, कधी दिवस सरतो
आणि कधी माझ्या लेखणीला तिच्या शब्दांचा स्पर्श होतो “

मराठी कविता “ती अनोळखी रात्र” Best 2023 | Ratra Kavita in Marathi

तर हाच होता तो सहवास ज्या मध्ये न बोलता देखील ती रात्र खूप काही बोलून गेली. ती मला खूप आपलीशी वाटली. एकांत हे माझ्या आणि तिच्या मधले साम्य होते, कदाचित म्हणूनच मी तिला समजू शकले आणि तिच्यावर लिहू शकले. हे होते माझे रात्रीचे रहस्य. मला खात्री आहे कि तुमच्या कडे देखील असे काही वेडसर रात्री सोबतचे रहस्य, अनुभव असतीलच, तर ते नक्की मला आपल्या कंमेंट्स द्वारे कळवा आणि हो, माझी कविता आवडली कि नाही ते देखील सांगा. आपण लौकरच भेटू पुन्हा एकदा एका नव्या अनुभवा सोबत, एका नव्या कविते सोबत. तोपर्यंत ‘स्टे सेफ स्टे होम’.

मराठी कविता “ती अनोळखी रात्र” Best 2023 | Ratra Kavita in Marathi

Author : Ms. Shroti

आमचे इतर ब्लॉग्स

स्वप्नील यांच्या आणखी कविता वाचा

नवीन Made in India POCO smartphone बद्दल वाचा

mazablog

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

1 month ago

आभासी प्रेम | Best love poem on rain in marathi in 2024

श्री विजय तानाजी पाटील यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem on rain in marathi in…

1 month ago

दिखाव्याला भुलला | Best cute love poem in marathi in 2024

श्री.मच्छिंद्र रत्नाकर झुरंगे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत cute love poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

ऑनलाईन प्रेम | best love poem for her in marathi in 2024

जयद्रथ आखाडे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem for her in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

खरचं हे प्रेम आहे का | best love athavan poem in marathi in 2024

प्रतिक्षा परमेश्वर थोटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love athavan poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

आभासी ओढ | Best funny love poem in marathi in 2024

अनंत वा तेलंग यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत funny love poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago