Kavil / काविळची लक्षणे, कारणे आणि उपचार

काविळची लक्षणे

1) थकवा जाणवणे 2) बद्धकोष्ठतेचा त्रास 3) पिवळी लघवी 4) त्वचा आणि नखं पिवळी पडणे

काविळची लक्षणे

5) डोळे पिवळे होणे 6) सतत उलट्या 7) पोट दुखणे 8) सौम्य ताप

डॉक्टरांना कधी भेटावे ?

सौम्य ताप असेल आणि वर सांगितलेली सगळी लक्षणे दिसत असतील तर लवकर त्यावर इलाज करणे आवश्यक आहे.झालेला आजार कावीळच आहे याची खात्री करुन घेण्यासाठी लवकर डॉक्टरांकडे जाऊन चाचण्या करुन घ्याव्या लागतात . तरच त्याचे निदान करता येईल.

कावीळची कारणे

1) अस्वच्छ पाणी पिणे 2) बाहेरचे अन्न अति खाणे 3) मद्यपान करण्याची सवय

कावीळ घरगुती उपचार

1) ऊसाचा रस- काविळीसाठी हा खूप गुणकारी आहे. ऊस चावून देखील खाऊ शकतो .उसाच्या रसामुळे शरीरात उष्णता निर्माण होते . रक्त तयार होण्याची प्रक्रिया सुरु होते. शिवाय रोग प्रतिकार शक्ती वाढते.

कावीळ घरगुती उपचार

2) टोमॅटो रस-  रोज सकाळी उठून एक पेलाभर टोमॅटोचा रस प्यावा. टोमॅटोचा रस नुसता पिणे शक्य नाही . तर त्यामध्ये मीठ आणि मिरपूड घालावी . त्यामुळे तोंडालाही चव येते .

कावीळ घरगुती उपचार

3) मुळ्याचा रस-  काविळमध्ये भूक लागत नाही.म्हणूनच मुळ्याचा रस आहारात घेणे आवश्यक असते. मुळ्याची पाने खुडून त्याचा रस प्यायलाने पोट साफ होते तसेच भूकही लागते.

कावीळ घरगुती उपचार

4) भिजवलेले मनुके शरीरातील उर्जा वाढवण्याचे काम ड्रायफ्रुट करते. त्यातल्या त्यात मनुके कावीळीसाठी चांगले असतात. काळे मनुके रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी ते खावे . काविळनंतर साधारण १५ ते २० दिवस मनुक्यांचे सेवन करा.

कावीळ घरगुती उपचार

5) पपई पानांचा रस पपईच्या पानांचा रस हा अनेक आजारांवर गुणकारी असतो . पपईची कोवळी पाने वाटून त्याचा रस केला जातो. या पानांमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याची क्षमता असते . म्हणूनच पपईच्या पानांचा रस या दिवसात घ्यावा . यासाठी पपईची कोवळी पाने निवडायची आहे.

कावीळ घरगुती उपचार

6) तुळशीची पाने-  तुळशीच्या पानामधले औषधी तत्व कावीळ बरी करण्यासाठी चांगले असतात. त्यामुळे शक्य असल्यास या दिवसात पाने चावून खावीत . एकावेळी ७ ते ८ पाने चावून खाऊ शकता. त्यामुळे बरे वाटेल. शिवाय कावीळ कमी होण्यासही मदत होईल.