Categories: लेख

दसरा 2023- विजयादशमी मराठी माहिती

ह्या वर्षी दसरा हा सण 24 ऑक्टोबर २०२3 रोजी असेल. दसरा म्हणजेच विजयादशमी होय. “दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा”
अशी म्हण मराठीमध्ये रूढ आहे. या म्हणीतूनच या सणाची महती कळते. भारतीय संस्कृतीत या सणाला विशेष महत्व आहे. सर्वजण हा सण मोठ्या उत्साहाने साजरा करतात. नवरात्र उत्सवाची सांगता विजयादशमीने होते. विजयादशमी ही प्रभू श्री रामचंद्राने रावणावर मिळवलेला विजय आणि देवी दुर्गा मातेने महिषासुरावर मिळवलेला विजय यांचे प्रतीक आहे. चांगुलपणाचा वाईट शक्तीवर विजय.

दसरा 2023- विजयादशमी मराठी माहिती

नवरात्र उत्सवानंतर दहाव्या दिवशी रावणाच्या प्रतिरूपाचे दहन करून हा सण साजरा करतात. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र साजरे केले जातात आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी केली जाते.हा सण दरवर्षी सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये दिवाळी सणाच्या आधी वीस दिवस येतो.

ज्ञानाची देवता सरस्वती देवीचे पूजन या दिवशी मनोभावनेने केले जाते . एकमेकांना आपट्याची पाने दिली जातात. आपट्याच्या पानांबद्दल एक कथा सांगितली जाते ती अशी फार पूर्वी ज्या वेळी गुरु-शिष्य परंपरा होती त्या काळी एक गुरू आपलय आश्रमात ज्ञान द्यायचे कार्य करीत. त्यांचे नाव होते वर्तनतु. त्यांच्या कडे कौत्स नावाचा शिष्य शिक्षण घेण्यासाठी राहत असे. ज्या वेळी विद्या पूर्ण झाली त्या वेळी त्याने वर्तनतु ऋषींना गुरुदक्षिणेबद्दल विचारले. त्यावेळी ते ऋषी म्हणाले ” वत्सा विद्या हि दान करण्याकरिता असते त्याचा मोल करायचा नसतो त्यामुळे मला गुरुदक्षिणा नको. पण जर तुला द्यायचेच असेल तर मी तुला चौदा वर्ष शिकवले म्हणून तू मला चौदा कोटी सुवर्ण मुद्रा गुरुदक्षिणा म्हणून दे.” कौत्स रघुराज्याकडे गेला व त्याने चौदा कोटी सुवर्ण मुद्रांबद्दल विचारले. तेव्हा रघुराजाने कौत्साने रिकाम्या हाताने परत जाऊ नये म्हणून इंद्रदेवाला सोन्याचा वर्षाव करावयास सांगितले. जिथे हा वर्षाव झाला तिथे आपट्याची आणि शमीची झाडे होती. कौत्साने मोजून चौदा कोटी मुद्रा घेतल्या आणि बाकी मुद्रा नगर्जनांना घेऊन जाण्यास सांगितले. त्या दिवसापासून शमीच्या आणि आपट्याच्या झाडांना ह्या दिवशी महत्व दिले जाते.

दसरा 2023- विजयादशमी मराठी माहिती

आपट्याचे आयुर्वेदिक महत्व पण आहे. कफ व पित्त दोषांवर हे पान गुणकारी समजले जाते. तसेच पांडव ज्यावेळी वनवासाला निघून गेले त्यावेळी त्यांनी सर्व शस्त्र शमीच्या झाडांमध्ये लपवली होती. सध्या या शमीच्या झाडाच्या पानांना देऊन लोक “सोन घ्या आणि सोन्यासारखे राहा” अशी शुभेच्छा देतात.

दसरा 2023- विजयादशमी मराठी माहिती

करोना महामारी मध्ये २०२० वर्ष गेल्यानंतर ह्यावर्षी सण साजरा करताना मात्र तुम्हाला नक्की उत्साह राहो हीच प्रार्थना. तुम्हाला व तुमच्या परिवाराला विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा.

दसरा 2023- विजयादशमी मराठी माहिती


लेखिका-सिद्धी गवस

शेती नावावर करून घेताना – आजची वास्तवता

पहिलं प्रेम भाग १ वाचण्या साठी क्लीक करा पहिलं प्रेम भाग १

Click to read- The Power Of Relationships

mazablog

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

1 month ago

आभासी प्रेम | Best love poem on rain in marathi in 2024

श्री विजय तानाजी पाटील यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem on rain in marathi in…

1 month ago

दिखाव्याला भुलला | Best cute love poem in marathi in 2024

श्री.मच्छिंद्र रत्नाकर झुरंगे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत cute love poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

ऑनलाईन प्रेम | best love poem for her in marathi in 2024

जयद्रथ आखाडे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem for her in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

खरचं हे प्रेम आहे का | best love athavan poem in marathi in 2024

प्रतिक्षा परमेश्वर थोटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love athavan poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

आभासी ओढ | Best funny love poem in marathi in 2024

अनंत वा तेलंग यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत funny love poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago