Categories: लेख

Marathi How are you? meaning – मराठी अर्थ

How are you हि वाक्यरचना इंग्लिश भाषा म्हणजेच जिला आपण इंग्रजांची भाषा म्हणूनही ओळखतो, या भाषेतील जास्तीत जास्त वेळा वापरली जाणारी आहे. किंबहुना हि वाक्य रचना मुलांना लहानपणीच शिकवली जाते. तिचा मुख्य वापर हा औपचारिकता ह्या प्रकारात मोडतो. ह्या प्रकारामध्ये How are you चा अर्थ “तुम्ही कसे आहात ?” किंवा “तू कसा आहेस ?” किंवा “तू कशी आहेस ?” असा घ्यावा. शक्यतो एखाद्या व्यक्ती सोबतची आयुष्यातील प्रथम भेट किंवा खूप दिवसांच्या अंतराने झालेल्या भेटीच्या वेळी हे वाक्य कुशल मंगल विचारण्यासाठी वापरले जाते.

Marathi How are you? meaning

ह्या प्रकारात समोरच्या व्यक्तीकडून “I am fine. what about you?” असा प्रतिप्रश्न विचारला जातो. ह्याचाच अर्थ असा कि “मी छान आहे. तुम्ही कसे आहात?” किंवा “मी छान आहे. तू कसा आहेस?” किंवा “मी छान आहे. तू कशी आहेस?”. ह्या वाक्यातून व्यक्तीची प्रकृती किंवा मानसिक स्थिती बद्दल विचारणा करण्याची भावना असू शकते. अश्यावेळेस हे वाक्य केवळ औपचारिक न राहून ते एक प्रश्नार्थक वाक्य मानले जाऊ शकते. बहुदा चांगल्या संभाषणाच्या सुरुवात म्हणून हे वाक्य निवडलेले असते.

Marathi How are you? meaning

हे वाक्य “ICE BREAKER” म्हणून काम करते. ह्याचा अर्थ असा कि दोन व्यक्तींमधील संभाषण चालू करण्याचे अडथळे मोडणारा पूल. संभाषणातील हे अडथळे दोन प्रथमतः भेटणाऱ्या लोकांमधील असू शकतात किंवा आधी ओळख असलेल्या परंतु काही कारणाने बोलणं कमी किंवा अगदीच न बोलणाऱ्या व्यक्तींमधील हि असू शकते.

शब्दशः ह्या वाक्यरचने नुसार How are you? हा जरी प्रश्न असला तरी त्याला नेहमीच उत्तर मिळेल असे नाही. बऱ्याचदा वयाने मोठ्या किंवा हुद्द्याने मोठ्या असणाऱ्या व्यक्तींकडून हे एक स्वागतार्ह वाक्य समजले जाते. आणि त्याला त्यांच्याकडून फक्त स्मितहास्य किंवा शुभ प्रभात/ शुभ दुपार किंवा दिवसाच्यय शेवटच्या भेटीला शुभ रात्री असा परतावा मिळू शकतो.

Marathi How are you? meaning

क्वचित प्रसंगी तुम्ही How are you? ह्या वाक्य रचनेला त्याच वाक्य रचनेने सुद्धा परतावा देऊ शकतात. ह्या प्रकारामध्ये How are you? ला हॅलो किंवा हाय ह्या शब्दांचा दर्जा दिलेला असतो. असा प्रसंग बहुदा पहिली किंवा दुसरी व्यक्ती घाईमध्ये जाताना होतो. अशावेळी थांबून उत्तर जरी नाही मिळाले तरी इंग्लिश आचरण पद्धती नुसार हे वागणे नियमात बसते असे सांगितले जाते.

Marathi How are you? meaning

शेती नावावर करून घेताना – आजची वास्तवता

पहिलं प्रेम भाग १ वाचण्या साठी क्लीक करा पहिलं प्रेम भाग १

Click to read- The Power Of Relationships

mazablog

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

1 month ago

आभासी प्रेम | Best love poem on rain in marathi in 2024

श्री विजय तानाजी पाटील यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem on rain in marathi in…

1 month ago

दिखाव्याला भुलला | Best cute love poem in marathi in 2024

श्री.मच्छिंद्र रत्नाकर झुरंगे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत cute love poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

ऑनलाईन प्रेम | best love poem for her in marathi in 2024

जयद्रथ आखाडे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem for her in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

खरचं हे प्रेम आहे का | best love athavan poem in marathi in 2024

प्रतिक्षा परमेश्वर थोटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love athavan poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

आभासी ओढ | Best funny love poem in marathi in 2024

अनंत वा तेलंग यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत funny love poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago