Categories: Kavita In Marathi

अनाम वीर | Best Army sathi Marathi kavita in 2024

सोमदत्त कुलकर्णी यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Army sathi Marathi kavita in 2024 विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

Army sathi Marathi kavita in 2024

काव्य बंध समूह आयोजित उपक्रम काव्य लतिका
रविवारीय काव्य स्पर्धा
विषय: सैनिका साठी कविता

अनाम वीर | Army sathi Marathi kavita in 2024

अनाम वीरा हि कविता
लिहिली आहे मी तुजसाठी
तव शोर्य गाथा गात आहे
जुळल्या आहेत सर्व गाठी १

मन माझे भरून आले
गाता तव वीरतेचे पोवाडे
तव पराक्रमाने गुंजती येथे
देशातील सर्व एक आखाडे. २

अनाम वीरा सलाम तुजला
काय वर्णू तव देश भक्तीला
राष्ट्र अभिमान पाहून तव
नमन माझे वारंवार तुजला ३

नसा नसात खेळत आहे
भारत मातेची अमर प्रीती
देश सेवेत जगणे मरणे
हिच तव जीवनाची नीती ४

शब्द आज मौन जाहले
कसी गाऊ वीरतेची गाथा
तुझ्या शौर्याला माझे सलाम
अन् टेकविला आज माथा ५

धन्य धन्य वीरा तुझे रूप
धन्य खरी असे तुझी वीरता
भव्य दिव्य तुझे एक कार्य
नमन माझे तुज वीर भारता ६

नाही तुने केली कधी चिंता
एक क्षण कधी आपल्या कुटूंबाची
नच महत्व भासे वीरा तुजला
कधी हि तुजला परीवाराची ७

जागेपणी किंवा स्वप्नात असता
देश प्रेम नसा नसात खेळते
करता देशाची सेवा तुजला
एक खरी अनुभुती हि मिळते ८

एक मागणे देवा माझे आहे
शूर वीरा सम पराक्रम मिळो
देश सेवा करता करता माझा
दंभ, अहंकार, द्वेष सारा जळो ९

©®सोमदत्त कुलकर्णी
हडपसर, पुणे

Army sathi Marathi kavita in 2024

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Ashutosh R

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

1 month ago

आभासी प्रेम | Best love poem on rain in marathi in 2024

श्री विजय तानाजी पाटील यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem on rain in marathi in…

1 month ago

दिखाव्याला भुलला | Best cute love poem in marathi in 2024

श्री.मच्छिंद्र रत्नाकर झुरंगे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत cute love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

ऑनलाईन प्रेम | best love poem for her in marathi in 2024

जयद्रथ आखाडे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem for her in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

खरचं हे प्रेम आहे का | best love athavan poem in marathi in 2024

प्रतिक्षा परमेश्वर थोटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love athavan poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

आभासी ओढ | Best funny love poem in marathi in 2024

अनंत वा तेलंग यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत funny love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago