Categories: Kavita In Marathi

सण आनंदाचा आणि तनमन तमा मारू | 2 Best diwali acrostic poems in marathi

विजय तानाजी पाटील आणि पद्माकर दत्तात्रेय वाघरुळकर यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत diwali acrostic poems in marathi विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

diwali acrostic poems in marathi

काव्यबंध समुह आयोजित
काव्यलतिका
स्पर्धेसाठी स्वरचित कविता

२९/१०/२०२३

विषय:- सण दिव्यांचा
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔

सण आनंदाचा | diwali acrostic poems in marathi

सण दीपावलीचा,
सण आनंदाचा..
सण हा हर्षाचा,
सण हा वर्षाचा…
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔

आम्रपर्ण अन झेंडूचे तोरण,
शोभे प्रवेशद्वारी..
रंगीबेरंगी रांगोळी नटून
स्वागतास उभी दारी…
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔

डोले घरादारावर ,
मिणमिणत्या दिव्यांची आरास..
उभा गच्चीवर,
आकाशकंदील ऐटीत खास…
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔

कोपऱ्यात बालगोपालांचा किल्ला,
मावळ्यांसोबत गर्वाने उभा…
तिथे आरास व मस्ती करण्यास,
असे त्यांना पूर्ण मुभा…
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔

भल्या पहाटे होई,
उटण्यासोबत अभ्यंगस्नान..
मग फटाके फोडण्याचा,
आनंद घेती सारे बनूनी लहान…
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔

नवीन कपड्यावरी,
अत्तराचा फाया..
लहानथोर सोबत बसती,
फराळाचा आनंद घ्याया…
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔

यानंतर मात्र होई,
बालगोपालांसोबत शेतावर फेरी..
गावाकडील मंडळींसोबत,
गप्पा अन फराळाची बारी…
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔

पाडव्याला होई ,
सौभाग्यवतीकडून औक्षण ..
बहिणभावाच्या नात्यात ,
गोडवा वाढवी भाऊबीजेचा सण …
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔

सण दीवाळीचा,
खरंच असे मोठा,
नाही आनंदास,
यात काही तोटा…
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔

संपता दिवाळीसण ,
पाखरे उडूनी जाती सारी…
आजी-आजोबा राही एकटी,
दिवाळी आठवत आपल्या घरी…
🪔🪔🪔🪔🪔🪔🪔🪔

✍️विजय तानाजी पाटील (तासगाव )✍️

diwali acrostic poems in marathi

काव्यबंध समूह आयोजित रविवारीय काव्यलतिका ‘स्पर्धेसाठी’
दि.२९अॉक्टोबर २०२३ रविवार
विषय- सण दिव्यांचा

तनमन तमा मारू | diwali acrostic poems in marathi

सरताच दसरा तो
वेध दिवाळी लागते
दीपावली स्वागताला
जणू तयारी ती होते

चार दिवसांचा सण
क्षणोक्षण आनंदाचा
आहे कारण खासच
तोच जो सण दिव्यांचा

दारोदारी लटकते
छान आकाश कंदील
विविधांगी रंगछटा
सर्व जना मोहवील

वसुबारसेपासून
होई सणा सुरूवात
गाय वासरा पुजून
भूतदया मांगल्यात

धन त्रयोदशी दिन
पूजा धन्वंतरीसाठी
होई दक्षिण दिशेला
दीपदान यमापाठी

नरकाची चतुर्दशी
भल्या पहाटे उठणे
घरी करून उटणे
स्नान अभ्यंग करणे

अश्विनाची अमावस्या
लक्ष्मी मातेचे पूजन
धन कुबेर शारदा
वंदिदात सर्वजन

होई दिव्यांची आरास
पणतीचे दिवे दिसे
तम सारण्या जगाचा
सर्वां प्रकाश तो वसे

बली प्रतिपदा दिन
कुणी म्हणती पाडवा
पुजुनिया गोवर्धन
बळीराजा तो गोडवा

खास दिन भाऊबीज
प्रेम बहीण भावाचा
ओवाळून ती बहीण
स्नेह जुळे आयुष्याचा १०

असा सण आनंदाचा
छान साजरा तो करू
विश्व बंधुत्वाचा ध्यास
तनमन तमा मारू ११

✍️पद्माकर दत्तात्रेय वाघरूळकर (दत्तिंदुसुत) छत्रपती संभाजीनगर. मो.क्र.९७३०७९८२७९🤝

diwali acrostic poems in marathi

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Ashutosh R

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

2 months ago

आभासी प्रेम | Best love poem on rain in marathi in 2024

श्री विजय तानाजी पाटील यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem on rain in marathi in…

2 months ago

दिखाव्याला भुलला | Best cute love poem in marathi in 2024

श्री.मच्छिंद्र रत्नाकर झुरंगे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत cute love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

ऑनलाईन प्रेम | best love poem for her in marathi in 2024

जयद्रथ आखाडे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem for her in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

खरचं हे प्रेम आहे का | best love athavan poem in marathi in 2024

प्रतिक्षा परमेश्वर थोटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love athavan poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

आभासी ओढ | Best funny love poem in marathi in 2024

अनंत वा तेलंग यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत funny love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago