Categories: Kavita In Marathi

बाबा | Best father related poem in marathi in 2023

नेत्रा शेट्टी सातारा यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत father related poem in marathi विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

father related poem in marathi

काव्यबंध समूह आयोजित
काव्यलतिका
दर रविवारी स्पर्धा

दिनांक:-१५/१०/२०२३

बाबा | father related poem in marathi

सांगत बाबा तुमची कहाणी
पडतात शब्द कमी
ह्रदय मात्र येई भरूनी
अन् डोळा येई पाणी

दुधाच्या घोटाचा थेंब निथळता
आयुष्यभर मायेने जपला आहे
उसळणारा डोंब भुकेचा
प्रत्येक क्षणी शमला आहे

लागणारा प्रत्येक दुःखाचा डोहाळा
कष्ट करून बाबांनी पुरविला आहे
गर्भगळित करणाऱ्या नजरांना भेदत
प्रत्येक हट्ट आमुचा पुरविला आहे

father related poem in marathi

उसवणीला लागणारीभावकीची चादर
समजुतीच्या धाग्यांनी जपली आहे
बालपणातील प्रत्येक झोप सुखाची
त्यांच्या जागरणामुळेच मिळाली आहे

अर्धी कच्ची इज्जतीची भाकर
इमानदारीच्या चुलीत भाजली आहे
समाजाचा प्रत्येक चटका सोसत
सारी जबाबदारी पार पाडली आहे

गर्भ आईच्या उदरी वाढला जरी
नाळ दोघांच्या कष्टाची जोडली आहे
सोसल्या आईने असंख्य वेदना
अर्थ जीवनाचा बाबांकडून मिळविला आहे

भूक लागली हा शब्द निघण्याआधी
ताट पुढे आणणारी ती आईच आहे
काढून पोटात चिमटा
सदा आमुची हौस पुरविणारी
आमुच्या साठी आयुष्य वेचणारी
बाबा तुमची माया अन् काळजी आहे

माता पित्यांचे अगणित ऋण
मांडणे शब्दात कठीण आहे
जिवंत पणी जपणे तयासी
हाच खरा काकस्पर्श आहे

आठवणींच्या हिंदोळ्यावर आयुष्य जगत आहे
क्षण वेचून प्रत्येक त्यातील
व्यतीत केलेले क्षण तुमच्या सोबतीचे
वर्णीयते तुमची लाडकी आहे.


कवी ✍🏻
नेत्रा शेट्टी सातारा

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Ashutosh R

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

2 months ago

आभासी प्रेम | Best love poem on rain in marathi in 2024

श्री विजय तानाजी पाटील यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem on rain in marathi in…

2 months ago

दिखाव्याला भुलला | Best cute love poem in marathi in 2024

श्री.मच्छिंद्र रत्नाकर झुरंगे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत cute love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

ऑनलाईन प्रेम | best love poem for her in marathi in 2024

जयद्रथ आखाडे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem for her in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

खरचं हे प्रेम आहे का | best love athavan poem in marathi in 2024

प्रतिक्षा परमेश्वर थोटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love athavan poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

आभासी ओढ | Best funny love poem in marathi in 2024

अनंत वा तेलंग यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत funny love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago