Categories: Kavita In Marathi

आल्या गौराई आल्या आणि माहेरवाशीण लेक | 2 Best Gauri Ganpati Kavita in Marathi

सौ. सुवर्णा बाबर आणि सौ. शोभा देशपांडे यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Gauri Ganpati Kavita in Marathi विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

आल्या गौराई आल्या | Gauri Ganpati Kavita in Marathi

स्पर्धेसाठी स्वरचित कविता
“काव्यबंध समूह आयोजित साप्ताहिक काव्यलतिका स्पर्धा “
दि. – ८ सप्टेंबर २०२३
विषय – ” गौराई आली घरा “


शीर्षक – “आल्या… गौराई आल्या”


सरता सरला श्रावण मास
भाद्रपद घेवुन येई
चाहूल गौरी-गणपतीची
सुरू झाली मग लगबग घाई .!!१!!

आल्या आल्या गौराई सोनपावली
स्वागतास दारी तोरणे बांधली
जेष्ठा कनिष्ठा येती माहेरा
येती सुख, समृद्धी माझ्या घरा .!!२!!

नक्षीदार रांगोळी सजली अंगणात
ओलांडण्या माप तांदळाचे उभे उंबऱ्यात
करूनी वंदन तुलसी वृंदावना
होई आगमन गौराईंचे माझ्या घरा .!!३!!

विसावल्या जराश्या माहेरवाशीणी
आनंदल्या पाहूनी थाटमाट मनोमनी
खावून भाजी भाकर सुखावल्या
थकूनी मग क्षणभर निजल्या .!!४!!

माहेराचा भरजरी पैठणी-शालू नेसली
घालून सोन्या-मोत्यांचे दागिने गोड हसली
जाई-जुईचा गजरा माळून केसांत
राहीली उभी दिमाखदार मखरात .!!५!!

नेवैद्य पूरणपोळी, लाडू, चिवडा, करंजी
रंगीबेरंगी फुले आणि छान छान खेळणी
लडीवाळ गोपा आणि धान्याची रास
सजावट सारी झालीच कशी खास .!!६!!

धुप-दिपांचा सुवास दरवळे साऱ्या घरात
नको उणीव कसलीच गौरी पूजनात
साग्रसंगीत थाटमाट सारा
आनंदी वारे वाहे साऱ्या घरा .!!७!!

उजडला दिन परतीचा
हळवा प्रसंग हा पाठवणीचा
औक्षून गौराई भरल्या ओटीन
घेईं निरोप लख लख आशिष देवून.!!८!!


सौ. सुवर्णा बाबर
पुणे

माहेरवाशीण लेक | Gauri Ganpati Kavita in Marathi

काव्यबंध समुह आयोजित
काव्यलतिका स्पर्धा
दिनांक-०७-०९-२०२३
विषय- “गौराई आली घरा”
शीर्षक- “माहेरवाशीण लेक”

चैत्र शुक्ल तृतीयेला
पार्वती येई गौरी रुपाने
उत्साहाला ऊधाण येई
पूजन करुया प्रेमभराने.

अंगणी सुरेख काढली रांगोळी
भरले रंग मनासारखे छान
गौराईच्या स्वागताला सजले
सुंदर बागेत तुळशी वृंदावन

भरजरी साड्या नेसून गृहिणी
सालंकृत सुंदर सजूनी
स्वागतास तयार झाल्या
सायंकाळी मुहूर्त बघूनी

टाळ मृदंगांच्या गजरात
ऊंबरठ्यावर तुकडा ओवाळून
औक्षण करुनी प्रवेश करिते
सुवासिनी माप ओलांडून

हळदी कुंकुवाच्या पाऊलांनी
दोघी बहिणी मिरवत येती
पाहूनी वैभव माहेराचे
मनोमनी हरखून जाती

तयार सुंदर आरास बैठकीत
देवदर्शन घेत घरभर फिरुन
दोघी बहीणी आनंदाने मग
स्थानापन्न होती आनंदी होवून

नवीन शालू नेसवून
अलंकार अर्पिती तिजला
लाडू करंजी फराळाने
नैवैद्य असे सजला

केळीच्या हिरव्या पानावर
लिंबू, चटण्या कोशीबींर
सोळा भाज्या भजे वडे
वरण, तुप,भाताच्या मुदीवर

खीर, अंबिल, कढी,आमटी
पुरणपोळी पंचपक्वान्न जेवायाला
सगेसोयरे सारे आवर्जून येती
गौरीचे दर्शन घ्यावयाला

सुगंधीत पुष्पमाला अर्पून
मनोभावे पूजन करुनी
दणक्यात आरती महापूजेची
होई भक्तीमय वातावरणी

कार्यक्रम हळदी कुंकवाचा
महिला भगिनी सजून येती
कौतुकाने बघत सारे
गौराईंचे दर्शन घेती

गौराई माहेरवाशिण लेक
सोहळा तीन दिवस चाले
सारे घरदार उत्साहाने
आनंदीत झाले

सौ.शोभा देशपांडे
छत्रपती संभाजीनगर

आल्या गौराई आल्या आणि माहेरवाशीण लेक | 2 Best Gauri Ganpati Kavita in Marathi

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

आल्या गौराई आल्या आणि माहेरवाशीण लेक | 2 Best Gauri Ganpati Kavita in Marathi

Ashutosh R

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

2 months ago

आभासी प्रेम | Best love poem on rain in marathi in 2024

श्री विजय तानाजी पाटील यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem on rain in marathi in…

2 months ago

दिखाव्याला भुलला | Best cute love poem in marathi in 2024

श्री.मच्छिंद्र रत्नाकर झुरंगे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत cute love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

ऑनलाईन प्रेम | best love poem for her in marathi in 2024

जयद्रथ आखाडे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem for her in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

खरचं हे प्रेम आहे का | best love athavan poem in marathi in 2024

प्रतिक्षा परमेश्वर थोटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love athavan poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

आभासी ओढ | Best funny love poem in marathi in 2024

अनंत वा तेलंग यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत funny love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago