Categories: Kavita In Marathi

आगमन गौराईचे आणि स्वानुभव | 2 Best Gauri Ganpati Marathi Poem

छाया नाळे आणि सौ. वंदना रमेश ढोले यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Gauri Ganpati Marathi Poem विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

आगमन गौराईचे | Gauri Ganpati Marathi Poem

काव्य बंध आयोजित काव्य लतिका स्पर्धा
विषय- गौराई आली घरा
दिनांक -7 सप्टेंबर 2023
कविता- आगमन गौराईचे

सौख्याचे, मांगल्याचे, आनंदाचे
सजले मी, अन घर सौभाग्याचे
दारी रांगोळी सडे कुंकवाचे
स्वागत करते आगमन गौराईचे

सोन पाऊले ये घेऊनी तो पाऊस
डोळे लाऊनी सर्वजण मनी उदास
धनधान्याच्या राशी घेऊन खास
सुख येऊ दे बळी राजास

गणगौर रूप हे ममतेचे
गणाधीश अन पार्वती, गंगा मातेचे
जीवनाचे मर्म घेऊन येती
आनंद दुःखाचा मेळ सांगती

माझी भक्ती समर्पित तुम्हांला
द्या शक्ती सवे मुक्ती मजला
फळे फुले दुर्वा सर्व पल्लवी अर्पण
निसर्ग देवता ती करी समर्पण

अग्नी, वायू ,आकाश, जल,भूमी
पंचतत्व विलीन तू जननी
प्रतिक तु लक्ष्मी अन सरस्वतीचे
संसार रुपी वसलेल्या गृहलक्ष्मीचे

लेकुरवाळ्या लेकीचे ते येणे
माहेर वाशीणीचे ते येऊन जाणे
शांतता स्थिरता देऊन जाई
समाधानाचे सर्व गीत गाई

काव्य रचनेचे सुमन वाहते तुजला
कृपाप्रसादाचा आशिष दे मजला
कृपा प्रसादाचा आशिष दे मजला
कृपाप्रसादाचा आशिष दे मजला

छाया नाळे (भुजबळ )सातारा

स्वानुभव | Gauri Ganpati Marathi Poem

काव्यबंध समूह आयोजित
काव्यलतिका स्पर्धा
स्पर्धेसाठी
दिनांक:- ०७/०९/२०२३
विषय :- गौराई आली घरा
शीर्षक – स्वानुभव

गौरीगणपतीच्या आगमनाची
तयारी केली जोरदार…
केली आरास फुलांची
घालुनी मंडप नक्षीदार..

सर्वांच्या अथक प्रयत्नांनी
झाली आकर्षक आरास ..
आतुरता लागली सर्वांना
कधी येईल तो दिवस खास..

भाद्रपद शुद्ध चतुर्थीला
आगमन झाले गणरायाचे..
तिसऱ्या दिवशी आले घरी
साजिरे रूप गौराईचे…

स्वागत केले सर्वांनी
प्रतिष्ठापना केली गौराईची..
पूजा पाठ आरती करुनी
प्रार्थना केली सुख समृद्धीची…

मखरात बसवुनी त्यांना
मान पूजेचा दिला…
भाजी भाकरीचा नैवेद्य
सायंकाळी अर्पिला..

दुसऱ्या दिवशी
जेवण केले गोडाधोडाचे…
हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात
स्वागत केले सुवासिनींचे…

खुलून दिसले रूप गौराईचे
मोह काही आवरेना..
घ्यावे कॅमेरात कैद करून
हीच होती मनी भावना…

टिपून घेताना गौराईचे रूप
साक्षात्कार झाला…
दिसले खरे रूप देवीचे
अंगावर शहारा आला….

पाहिले प्रसन्न रूप अन
घेतले मनात साठवून…
पंचवीस वर्षांची आराधना
मन आले आनंदाने भरून..

भास नसे तो
दिले दर्शन साक्षात..
आशीर्वाद दिला मजला
सुखी रहा तुझ्या आयुष्यात…

सौ. वंदना रमेश ढोले
मु. पो.उरुळी कांचन
ता.हवेली, जि. पुणे.

आगमन गौराईचे आणि स्वानुभव | 2 Best Gauri Ganpati Marathi Poem

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

आगमन गौराईचे आणि स्वानुभव | 2 Best Gauri Ganpati Marathi Poem

Ashutosh R

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

2 months ago

आभासी प्रेम | Best love poem on rain in marathi in 2024

श्री विजय तानाजी पाटील यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem on rain in marathi in…

2 months ago

दिखाव्याला भुलला | Best cute love poem in marathi in 2024

श्री.मच्छिंद्र रत्नाकर झुरंगे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत cute love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

ऑनलाईन प्रेम | best love poem for her in marathi in 2024

जयद्रथ आखाडे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem for her in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

खरचं हे प्रेम आहे का | best love athavan poem in marathi in 2024

प्रतिक्षा परमेश्वर थोटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love athavan poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

आभासी ओढ | Best funny love poem in marathi in 2024

अनंत वा तेलंग यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत funny love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago