रमेश अनंत चव्हाण यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Karn kavita Marathi lyrics in 2024 विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.
Karn kavita Marathi lyrics in 2024
काव्यबंध समूह आयोजित
काव्यलतिका
(रविवारीय काव्यस्पर्धा(
दिवस ३/३/२०२४(
विषय- महारथी कर्ण
मंत्राच्या त्या शक्तिशाली प्रभावाने
लग्नाआधी राहिला तो गर्भ उदरात
जन्मला शूरवीर थोर महान बालक
मुख तेजस्वी कांती जणू सुर्यतेज!!२!!
कुंतीभोज राजाची कन्या ती कुंती
दुर्वास ऋषिंनी दिले मंत्राचे वरदान
उत्साहपोठी पाहण्या प्रभाव मंत्राचा
केलं सूर्याचे स्मरण मंत्रोच्चार करून!!१!!
जेष्ठ पांडव महान क्षत्रिय असूनही
कुळहीन होऊन तो सूतपुत्र राहिला
जो होता जन्मताच श्रेष्ठ कौतेय पुत्र
सामान्य पुत्र राधेय म्हणून जगाला!!३!!
परशुरामाचा शिष्य महान धनुर्धर
धनुर्विध्येचा नाही दिला अधिकार
कुळ कलंक अपमानात भिजला
पराक्रमाने भेदला त्याने अहंकार!!४!!
सुर्यपूत्र असूनही अंधारात वाढला
मातेच्या चुकीमुले सुतपुत्र बनला
धर्मी असून अधार्मीयांत तो वाढला
पात्र असून अपमान सोसत राहिला!!५!
पराक्रमी वीर योद्धा तो थोर महान
सत्याचा हा सारथी मनाने दानवीर
जीवनात अपमान भोगूनी जगला
होता तो सुर्यपूत्र योद्धा कर्ण शूरवीर!!६!!
कौंतेय असून कौंतेयासोबत भिडला
मैत्री साठी दुनियेसाठी शूर लढला
निशस्त्र असता मृत्युमुखी तो पडला
असा महारथी कर्ण मृत्युंजय बनला !!७!!
तो लढला युद्ध नायक तो ठरला
पांडवांचा भाऊ तो त्यांच्या विरुद्ध
प्राण गेला पन वचन त्याने पळाला
मैत्री सामर्थ्य सन्मानासाठी केले युद्ध!!८!!
रमेश अनंत चव्हाण
तोंडली मंडणगड
Karn kavita Marathi lyrics in 2024
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.
आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…
श्री विजय तानाजी पाटील यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem on rain in marathi in…
श्री.मच्छिंद्र रत्नाकर झुरंगे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत cute love poem in marathi in 2024 विषयावर…
जयद्रथ आखाडे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem for her in marathi in 2024 विषयावर…
प्रतिक्षा परमेश्वर थोटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love athavan poem in marathi in 2024 विषयावर…
अनंत वा तेलंग यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत funny love poem in marathi in 2024 विषयावर…