Manchurian recipe in Marathi | हॉटेल ला लाजवेल अशी मंचुरियन रेसिपी

Gobi Veg Dry Manchurian Gravy recipe in Marathi
चायनीज पदार्थ खावेत की नाही हा नेहमी पडणारा प्रश्न आहे पण मंचुरियन ही एक अशी रेसिपी आहे त्यात भाज्यांचा भरपूर वापर केला जातो त्यामुळे ती स्वादिष्ट तर असतेच पण हेल्दी ही असते. मंचूरियन खाण्यासाठी तळलेले तांदूळ किंवा न्यूडल्स च्या मिश्रणासह दिले जाऊ शकतात. जर आपण घरच्या घरी चांगले तेल वापरून आणि योग्य कॉलिटी च्या भाज्या वापरून मंचुरियन तयार केले तर याच्या इतका पौष्टिक पदार्थ तुम्हाला दुसरा कोणताही मिळणार नाही.

मंचुरीयन रेसिपी साठी लागणारा वेळ

तयारीसाठी वीस मिनिटं आणि पाककृती करण्यासाठी 40 मिनिटं असा एकत्रित एक तास पुरेसा होतो.

रेसिपी चा प्रकार

ही एक चायनीज रेसिपी आहे. त्यात आपण प्युअर व्हेजिटेरियन रेसिपी पाहणार आहोत.

किती लोकांकरिता

आजची रेसिपी दोन लोकांकरिता आरामशीर पुरेल

मंचुरियन बनवण्याकरता साहित्य

मंचुरियन बॉल साठी

अर्धा कप बारीक चिरलेला किंवा किसलेला कोबी, किसलेले गाजर अर्धा कप, हिरवी शिमला मिरची पाव कप, फ्रेंच बीन्स पाव कप बारीक चिरलेली, पाव कप बारीक चिरलेले स्प्रिंग ओनियन, दोन चमचे कॉर्न फ्लोअर, दोन चमचे मैदा, काळीमिरी पावडर अर्धा चमचा, चवीनुसार मीठ आणि तेल

मंचुरियन सॉस साठी

बारीक चिरून घेतलेला लसूण, अर्धा चमचा बारीक चिरून घेतलेले आले, अर्धा वाटी बारीक चिरलेल्या दोन-तीन हिरव्या मिरच्या, पाव कप कांदा बारीक चिरलेला, सोया सॉस अर्धा चमचा, रेड चिली सॉस एक चमचा, काळीमिरी पावडर पाव चमचा, अर्धा चमचा व्हिनेगर, अर्धा चमचा हिरव्या भाज्या चिरलेल्या, अर्धा चमचा तेल, चवीनुसार मीठ

पाककृती

मंचुरियन बॉल्स रेसिपी

मंचुरियन बॉल्स बनवणे

एका भांड्यात बारीक चिरलेल्या सर्व भाज्या म्हणजे कोबी गाजर शिमला मिरची आणि कांदा यांचे मिश्रण करा

यामध्ये दोन चमचे कॉर्न फ्लोअर, दोन चमचे मैदा अर्धा चमचा काळी मिरी आणि अर्धा चमचा मीठ टाका. मिठाचे प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसारही ठरवू शकता.

आता हे सर्व मिश्रण एकत्र करायला सुरुवात करा आणि थोड्या वेळात जेव्हा त्यात पाणी सुटायला सुरुवात होईल तेव्हा पीठ मिळेल असे मळून घ्या

या मिश्रणाचा एक छोटा भाग तर हातावर घ्या ज्या आकाराचे तुम्हाला गोळे बनवायचे अंदाजे तेवढाच भाग घ्या त्याचा गोलाकार व्हेज बॉल बनवा आणि एका ताटात काढून ठेवा

अशाच प्रकारे सर्व मिश्रणाचे बॉल्स बनवून ताटामध्ये काढून ठेवा

मंचुरियन बॉल्स तळणे

इकडे घ्या भरपूर तेल घ्या कारण की मंचुरियन बॉल्स आपल्याला त्यात पूर्णपणे तळायचे आहेत. आता गॅस चालू करा. तेल गरम झाल्यानंतर त्याच्या त थोडेसे मिश्रण टाकून पहा जर ते तेलावरती तरंगायला लागले तर तुम्ही बोल सोडू शकता.

तेल जास्त उकळू देऊ नये कारण जर ते खूप गरम असेल तर बोलला बाहेरून गरम करून लाल करेल पण ते आतून कच्चे राहतील कमी गरम तेल बॉसला आतून बाहेरून व्यवस्थित शिजवेल.

तळताना बॉल्स सर्व बाजूंनी फिरवून व्यवस्थित तळून घ्या ते सोनेरी होईपर्यंत तळा आणि एका ताटामध्ये पेपर नॅपकिन टाकून त्यावरती पसरून ठेवा म्हणजे त्यातले अनावश्यक तेल शोषून घेतले जाईल

मंचुरियन सॉस ची रेसिपी Manchurian Gravy recipe in Marathi

एका पॅनमध्ये अर्धा चमचा तेल घ्या आणि ते गरम करा हे तेल मघाशी वापरलेले घ्या. या तेलात अर्धा चमचा बारीक चिरलेला लसूण टाका त्यानंतर अर्धे बारीक चिरलेले आले आणि एक दोन हिरव्या मिरच्या त्यात टाकून द्या

एक मिनिट वरील सर्व गोष्टी मंद गॅस वरती परतून घ्या त्यात पाव कप गोल चिरलेला कांदा घाला आणि अर्धा चमचा सोया सॉस एक चमचा टोमॅटो केचप आणि एक चमचा रेड चिली सॉस घाला रेड चिली सॉस च्या ऐवजी तुम्ही ग्रीन चिली सॉस घालू शकता पण तो गोड नसावा हे सर्व मिश्रण गॅस मंद असताना ढवळून घ्या या मिश्रणावरती पाव चमचा कॉर्नफ्लोर शिंपडा त्याच्यामुळे सॉसला चमकदारपणा येतो

लगेचच पाव चमचा काळी मिरी पावडर आणि गरजेनुसार मीठ टाका आणि पुन्हा हे सगळं एकजीव करून घ्या. कॉर्नफ्लोर मुळे सॉस आता घट्ट व्हायला लागेल म्हणून ह्या सगळ्या प्रक्रिया झटकन कराव्या

Gobi Veg Dry Manchurian Gravy recipe in Marathi

मंचुरियन बॉल्स आणि सॉस एकत्र करणे

नंतर याच्यात मंचुरियन बॉल्स टाकावे आणि गॅस बंद करून अर्धा चमचा तांदळाचे व्हिनेगार किंवा रेगुलर टाकावे अशा प्रकारे तुमचा मंचुरियन सॉस रेडी होईल

मंचुरियन रेसिपी टिप्स

  • मंचुरियन सॉस बनवताना मीठ घालताना थोडीशी काळजी घ्यावी कारण की सोया सॉस टोमॅटो केचप किंवा मध्ये आधीच मीठ असते
  • मंचुरियन बॉल्स बनवताना मिश्रणात अजिबात पाणी घालू नका कारण सर्व चिरलेल्या भाज्यांचे पाणी सुटण्यास तयार झाले की मिश्रणाचे बॉल्स तेवढ्या पाण्यात व्यवस्थित होतात
  • जर भाज्यांच्या पाण्याने व्यवस्थित बॉल्स बनवता येत नसतील तरच एक किंवा दोन चमचे पाणी घाला त्यापेक्षा जास्त घालू नका
  • रेसिपी तयार झाल्यानंतर तुम्ही गोल कापलेला कांदा म्हणजे स्प्रिंग ओनियनने रेसिपीला छानपणे सजवू शकता

स्वादिष्ट बासुंदी घरी बनवायची आहे ? रेसिपी वाचण्यासाठी क्लिक करा.

पुरणपोळीचा बेत अस्सल महाराष्ट्रीयन रेसिपी शिवाय पूर्ण होणारच नाही. क्लिक करा.

बाळगुटी म्हणजे काय ? आणि त्याचा वापर कसा करावा ?

mazablog

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

2 months ago

आभासी प्रेम | Best love poem on rain in marathi in 2024

श्री विजय तानाजी पाटील यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem on rain in marathi in…

2 months ago

दिखाव्याला भुलला | Best cute love poem in marathi in 2024

श्री.मच्छिंद्र रत्नाकर झुरंगे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत cute love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

ऑनलाईन प्रेम | best love poem for her in marathi in 2024

जयद्रथ आखाडे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem for her in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

खरचं हे प्रेम आहे का | best love athavan poem in marathi in 2024

प्रतिक्षा परमेश्वर थोटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love athavan poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

आभासी ओढ | Best funny love poem in marathi in 2024

अनंत वा तेलंग यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत funny love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago