Categories: Kavita In Marathi

आयुष्याची भूमिती आणि आयुष्यातील संघर्ष | 2 Best marathi poem on life

उज्वला सहस्रबुद्धे आणि प्रा. शुभांगी सुभाष धुमाळ यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi poem on life विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

marathi poem on life

काव्य बंध समूह आयोजित स्पर्धा,
विषय – आयुष्य
शीर्षक – आयुष्याची भूमिती
शब्द संख्या – ११४
१ आॅक्टोबर २०२३*

आयुष्याची भूमिती | marathi poem on life

आयुष्याच्या गणितामध्ये ,
एक भाग असे भूमिती !
प्रमेय त्यातील सोडवताना,
येई कठीणतेची प्रचीती!…..१

समानतेच्या संधी शोधी,
त्रिकोणाची संगती लावता!
दोन त्रिकोण जोडताना,
लक्षात घे एकरूपता !…..२

वर्तुळाच्या त्रिज्या न् जीवा,
एकीपेक्षा दुसरी दुप्पट !
लक्षात आपल्या येते तेव्हा,
संसाराची सारी खटपट !….३

त्रिकोण चौकोन काढून जाता,
मध्यबिंदू तो गाठावा लागे
क्षेत्रफळाचे मापन करता,
जोडून घ्यावे लागती धागे !…..४

समांतर रेषा शिकता शिकता,
आठवते मज कसरत माझी!
न जुळणारी नाती दिसती ,
रेषांसम त्या डोळ्यापुढती !….५

अंशात्मक या रेषा काढता,
कोन अन् कोन् मापून काढते!
काही नाती अंतरावरती ,
ठेवून मी संसार साधते !…..६

माया, प्रेम नात्यांचे बिंदू ,
वेगवेगळे मनास भासती !
त्यांची जागा त्यांना देता ,
गुंग होत असे माझीच मती!….७

आयुष्याची भूमिती होती,
काहीशी किचकट अन् अफाट!
प्रमेय त्यातील सोडवत होते,
जिंकण्या संसाराचा सारीपाट!…८

उज्वला सहस्रबुद्धे, पुणे
८०८७९७४१६८

marathi poem on life

काव्यबंध समूह आयोजित

काव्यलतिका स्पर्धा स्पर्धेसाठी

दिनांक:- ०१/१०/२०२३

विषय :- आयुष्य

आयुष्यातील संघर्ष | marathi poem on life

आयुष्य आहे एकदा
जगून घे स्वच्छंद…
वेळ काढ हवा तेवढा
जप तुझे अगणित छंद…!

जन्मापासून शेवट पर्यंत
आयुष्यात असतो संघर्ष…
संघर्षानेच होत असतो
आपल्या आयुष्याचा उत्कर्ष…!

आयुष्यात दिवसा मागून दिवस जातात
संघर्ष काही संपत नाही…
खडतर प्रवास केल्याशिवाय
हा काही पाठ सोडत नाही….!

आयुष्याच्या या प्रवासात
कधी कधी येते नैराश्य….
पुन्हा उभा राहतो सामोरा
जाण्यासाठी मनुष्य….!

नवचैतन्य, नवीन आशा घेऊन
एक दिवस सूर्य उगवतो…
आनंदाने उत्साहाने
दिवस त्याचा मावळतो….!

आणि रात्री मनात विचार येतो
या संघर्षामुळेच आपला
दिवस आनंदात जातो….
आयुष्याच्या प्रवासात उत्साह पुन्हा वृद्धिंगत होतो…!

अस्तित्वाची लढाई तुझी
तुलाच लढायची आहे….
आयुष्यात बरोबर कोणी असो नसो
तुलाच जिंकायचे आहे…..!

थांबू नको चालत रहा
मागे वळून पाहू नको….
लढ स्वतःच्या अस्तित्वासाठी
आयुष्य जगताना धीर तुझा सोडू नको…..!

प्रा. शुभांगी सुभाष धुमाळ -रानवडे
उरुळी कांचन, पुणे .

marathi poem on life

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Ashutosh R

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

2 months ago

आभासी प्रेम | Best love poem on rain in marathi in 2024

श्री विजय तानाजी पाटील यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem on rain in marathi in…

2 months ago

दिखाव्याला भुलला | Best cute love poem in marathi in 2024

श्री.मच्छिंद्र रत्नाकर झुरंगे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत cute love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

ऑनलाईन प्रेम | best love poem for her in marathi in 2024

जयद्रथ आखाडे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem for her in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

खरचं हे प्रेम आहे का | best love athavan poem in marathi in 2024

प्रतिक्षा परमेश्वर थोटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love athavan poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

आभासी ओढ | Best funny love poem in marathi in 2024

अनंत वा तेलंग यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत funny love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago