Marathi Recipe Palak Paneer:पालक पनीर

हिरव्या भाज्या मुलांना खाऊ घालणे खूप कठीण काम आहे. हे त्या घरातील आईलाच माहित असते. आपण कितीही समजुत घातली आणि कितीही त्या भाजीतील पोषणमुल्यांचे महत्व समजावुन सांगितले . तरीही मुलं आवडीने हिरव्या भाज्या खातीलच असं नाही. मुलांना बटाटा , जंक फूड खूप आवडते ,ते रोज जरी दिले तरी त्यांची कोणतीही तक्रार नसते.पण तेच जर आपण पालक ,शेपू किंवा मेथी खाऊ घालाल तर मुल नक्कीच नाक मुरडतात. लहान मुलांना चांगलं आणि तेवढच पौष्टीकतेने परीपुर्ण असं अन्न खाऊ घालणं .तसं अवघडच काम आहे . आणि त्यातही पालक भाजी मनलं की मुलं आधीच तोंड वाकड करतात .आम्ही तुमच्या या समस्येवर उपाय शोधलाय. तो म्हणजे तुम्हाला अगदी घरबसल्या आणि सोपी अशी पालकपनीरची रेसिपी सांगुन.पालक पनीर ही भारतीय हॉटेल्स मध्ये आढळुन येणारी एक प्रसिध्द अशी डिश आहे. Marathi Recipe Palak Paneer

ही डिश पालक आणि पनीर याचा उपयोग करून बनवली जाते.आणि आपण ही तेवढ्याच मोठया आनंदाने या डिश चा आनंद घेतो.पालकामध्ये जसे लोह असते .तसेच पनीरमध्ये प्रोटीनची भरपूर मात्रा असल्यामुळे या डिशचा हेल्दी रेसिपीजमध्ये समावेश केला जातो.ही डिश नान, पराठा आणि जीरा राईस सोबत सर्व्ह केली जाते.भारतामध्ये पनीरपासून बनवल्या जाणा-या पाककृतींमध्ये पालक – पनीर ही डिश अतिशय लोकप्रिय आहे. ही पाककृती उत्तर भारतातील रेसिपी म्हणून ओळखली जाते.Marathi Recipe Palak Paneer

पालक पनीर साहित्य:

२ जुडी पालक,३५० ग्रॅम पनीर, १ मध्यम आकाराचा (बारीक चिरलेला) कांदा.२ टोमॅटोची प्युरी,२ हिरव्या मिरच्या,१–२ मोठे चमचे तेल,१ लहान चमचा जीरे,२–३ लवंगा,चिमुटभर हिंग,१ मोठा चमचा आले — लसणाची पेस्ट.चवीनुसार मीठ,१ लहान चमचा लाल मिरची पावडर,१/४ लहान चमचा हळद पावडर.१ लहान चमचा धणे पावडर,१ लहान चमचा गरम मसाला.३/४ लहान चमचा साखर,१ लहान चमचा कुस्करलेली कसुरी मेथी (सुकविलेली मेथी),२ मोठे चमचे ताजी साय (आवडीनुसार).Marathi Recipe Palak Paneer

पालक पनीर कृती :

पालकाची पाने देठापासून वेगळी करुन स्वच्छ धुवून घ्यावीत . थोडे पाणी मीठ घालून उकळून घ्यावे, पालकाची पाने त्यात टाकून २–३ मिनिटे ठेवून आंच बंद करावी,गरम पाण्यातून पाने बाजूला काढावीत. आणि शिल्लक राहिलेलं पाणी नंतर वापरण्यासाठी बाजूला ठेवावे.उकडलेला पालक थंड झाल्यावर त्यामध्ये हिरव्या मिरच्या घालून त्याची प्युरी बनवावी.
पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवावे . त्यात हिंग ,जीरे व लवंगा टाकाव्यात, नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा व आले- लसणाची पेस्ट घालावी. मंद आचेवर चांगले परतवून घ्यावे .
कांदा व्यवस्थित परतल्यावर त्यात मसाला पावडर (गरम मसाला सोडून) व मीठ घालून चांगले परतवून घ्यावे, जास्त कोरडे वाटल्यास त्यामध्ये थोडेसे पाणी शिंपडावे .Marathi Recipe Palak Paneer


मसाला शिजल्यावर टोमॅटोची प्युरी टाकावी आणि कच्चेपणाचा वास जाईपर्यंत व मिश्रणाला तेल सुटेपर्यंत शिजवून घयावे . नंतर थोडे पाणी टाकून उकळी येऊ द्यावी.नंतर त्यात पालकाची प्युरी व साखर टाकून व्यवस्थित मिसळून घ्यावे. रस्सा १ ते २ मिनिटे शिजवून घ्यावा आणि गरम मसाला टाकून चांगले एकजीव करून घ्यावे.रस्सा तयार करत असताना दुसरीकडे पनीर कोमट पाण्यात ५ते १० मिनिटे भिजवून ठेवावे. त्यानंतर पनीरचे तुकडे करून ते रश्यात टाकावेत.आपल्या इच्छेनुसार रस्सा घट्ट किंवा पातळ करायचा ते ठरवावे .आणि त्यासाठी पालकाच्या उकडलेल्या पाण्याचा वापर करावा.पनीर घातल्यानंतर रस्सा २ते ३ मिनिटे शिजवावा. कसूरी मेथी व ताजी घट्ट साय टाकून व्यवस्थित मिसळून घ्यावे आणि नंतर आच बंद करावी.Marathi Recipe Palak Paneer

टिप्स :

पालक जास्त शिजू नये यासाठी सावधगिरी घ्यावी. नाहीतर रस्सा गडद हिरवा होण्याऐवजी तो काळा होईल आणि त्यातील महत्वाचे पोषकतत्त्वे निघून जातील.पनीर गरम पाण्यात भिजवण्यापेक्षा , पनीर रश्यात घालण्यापूर्वी ते थोड्याशा तेलात शॅलो फ्राय करून घेऊ शकता. साय घालणे हे ऐच्छिक आहे, परंतु त्यामुळे चव चांगली होते .त्यामुळे रस्सा जास्त मलाईदार बनतो. साय घालण्यापूर्वी आपण थोडेसे दूध देखील त्यामध्ये घालू शकतो . कांदा व लसणाची पेस्ट न घालता ही डीश बनवता येते.साखर घातल्याने टोमॅटोमुळे होणार्‍या पित्ताचे संतुलन आपण करू शकतो . ताज्या पालकाचा हिरवा रंग ही आपलयाला टिकवून ठेवण्यासाठी मदत मिळते.Marathi Recipe Palak Paneer

Author:-Mrs. Swati Dhas Kshirsagar

शेती नावावर करून घेताना – आजची वास्तवता

पहिलं प्रेम भाग १ वाचण्या साठी क्लीक करा पहिलं प्रेम भाग १

Click to read- The Power Of Relationships

Swati

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

1 month ago

आभासी प्रेम | Best love poem on rain in marathi in 2024

श्री विजय तानाजी पाटील यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem on rain in marathi in…

1 month ago

दिखाव्याला भुलला | Best cute love poem in marathi in 2024

श्री.मच्छिंद्र रत्नाकर झुरंगे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत cute love poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

ऑनलाईन प्रेम | best love poem for her in marathi in 2024

जयद्रथ आखाडे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem for her in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

खरचं हे प्रेम आहे का | best love athavan poem in marathi in 2024

प्रतिक्षा परमेश्वर थोटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love athavan poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

आभासी ओढ | Best funny love poem in marathi in 2024

अनंत वा तेलंग यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत funny love poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago