Categories: Kavita In Marathi

सण दिव्यांचा आणि संस्काराची धरोहार | 2 Best poem of diwali in marathi

अनुया काळे आणि कु. उज्वला धांडे यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत poem of diwali in marathi विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

poem of diwali in marathi

काव्यबंध समूह आयोजित
साप्ताहिक काव्यलतिका स्पर्धा
दिनांक 29 /10 /2023
विषय :सण दिव्यांचा

सण दिव्यांचा | poem of diwali in marathi

चैतन्याचा समृद्धीचा
आला आला सण दिव्यांचा

स्नेहबंध हे घट्ट जपूनी
मनामनांना जोडायाचा
अंधाराला भेदून दूरवर
कानाकोपरा उजळायाचा
आला आला सण दिव्यांचा

रांगोळीचा थाट आगळा
दारोदारी शोभायाचा
फराळ शाही चविष्ट न्यारा
आप्तेष्टांसवे चाखायाचा
आला आला सण दिव्यांचा

काळ बदलला व्यस्त जाहलो
भेटकार्ड पत्रास विसरलो
आभासी जग गोड शुभेच्छा
आनंदाने देवघेवीचा
आला आला सण दिव्यांचा

सुट्टी लागेल वाट पाहणे
मामाचे येई बोलावणे
भावंडांचे भांडण लटके
वाटून घेऊ लवंगी फटाके
बालपणीच्या आठवणींचा
आला आला सण दिव्यांचा

बांबू शिमट्या रंगीत कागद
कलाकुसर ती नाजूक अलगद
आकाशदिवा उंच शोभतो
मैत्रभाव दरवर्षी स्मरतो
सर्जनातल्या आनंदाचा
आला आला सण दिव्यांचा

असो झोपडी शाही बंगला
आशीर्वाद लक्ष्मीचा लाभला
झळ दुःखाची नको कुणाला
प्रकाशवाटा लाभो सकला
माणसातल्या माणुसकीचा
आला आला सण दिव्यांचा

अनुया काळे
मुरबाड जि.ठाणे

poem of diwali in marathi

काव्यबंध समूह आयोजित
साप्ताहिक काव्य लतिका स्पर्धा
दिनांक: २९/१०/२०२३
विषय: सण दिव्यांचा

संस्काराची धरोहर | poem of diwali in marathi

सण दिव्याचा लखलखता
श्रद्धेचा शौर्य अन् आनंदाचा
थोर गोजिरे धाडसी शिवबासम
पूर्वजांनी दिलेल्या ज्ञानाचा

प्रत्येक दिवसाचे आगळे महत्त्व
सणाने नातीगोती सांभाळली
द्वेष मत्सरावर मात करूनी
आपुलकी प्रेम ओढ वाढवली

नकारात्मकतेचा कचरा घरातून
मोठ्या जोमाने खरडून काढला
मांडून दिव्याची आरास मोकळी
अविश्वासाचा काळोख पुसला

धनाच्या कमतरतेमुळे सख्यांनो
लाडावून फुलझड्या जपायचो
पाच दिवसाची शिदोरी म्हणून
काटकसरीने फटाके फोडायचो

किल्ला बांधून.. झाडे लावून
दिवाळीसण भातुकलीत खेळायचो जेवणावळी उठवण्या आधी
खाऊचा नैवेद्य देवापुढे मांडायचो

स्वस्त कपडे घालून मिरविणे
त्यातच सोनेरी आठवांच्या साठवणी सुवाशिनीला कोऱ्या साडीत
भाऊ करायचा वात्सल्याने पाठवणी

दिवाळी सण संस्काराची धरोहर
औक्षण करून पाया पडतो
ऐकुनी जातक कथा तेव्हा आजीच्या
आजही स्मरुन प्रत्येक क्षण उपभोगतो

बालपणाची दिवाळी आजही
मनात आठवून सजवतो
एक एक घटना डोळ्यापुढे ठेवून
आम्ही दिवाळी साजरी करतो

कु. उज्वला धांडे
नागपूर

poem of diwali in marathi

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Ashutosh R

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

2 months ago

आभासी प्रेम | Best love poem on rain in marathi in 2024

श्री विजय तानाजी पाटील यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem on rain in marathi in…

2 months ago

दिखाव्याला भुलला | Best cute love poem in marathi in 2024

श्री.मच्छिंद्र रत्नाकर झुरंगे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत cute love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

ऑनलाईन प्रेम | best love poem for her in marathi in 2024

जयद्रथ आखाडे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem for her in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

खरचं हे प्रेम आहे का | best love athavan poem in marathi in 2024

प्रतिक्षा परमेश्वर थोटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love athavan poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

आभासी ओढ | Best funny love poem in marathi in 2024

अनंत वा तेलंग यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत funny love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago