Categories: लेख

Post Office Vima फक्त ₹ 399 ची विमा योजना

देशातील गरीब , गरजू आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी पोस्ट ऑफिसने नवीन योजना सुरू केली आहे. ३९९ रुपयांमध्ये ही नवीन विमा योजना सुरू केलेली आहे. या योजने मार्फत १० लाख रुपयांचे विमा संरक्षण प्रदान करण्यात येणार आहे. Post Office Vima yojana पोस्ट विमा Post Vima 399 फक्त ₹ 399 ची विमा योजना

या विमा योजनेत लाभार्थीचा १० लाख रुपयांचा विमा एका वर्षात केवळ ३९९ रुपयांच्या प्रीमियमसह काढला जाईल. एक वर्ष संपल्यानंतर पुढील वर्षी या विम्याचे नूतनीकरण (renewal )करावे लागेल.यासाठी पोस्ट विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंट या बँकेत लाभार्थीचे खाते (अकाउंट) असणे बंधनकारक आहे.

थोडं कामाचं :

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक आणि टाटा ए. आय. जी यांच्यातील करारानुसार, १८ ते ६५ वर्षे वयोगटातील लोकांना अपघात विमा संरक्षण मिळेल.या अंतर्गत अपघाती मृत्यू,कायमचे किंवा अपंगत्व, अंगविच्छेदन किंवा अर्धांगवायू झाल्यास दोन्ही प्रकारचे विमा संरक्षण १० लाख रुपयांचे मिळेल.पोस्टाच्या योजनेच असा घेऊ शकाल लाभ .
Post Office Vima yojana पोस्ट विमा Post Vima 399 फक्त ₹ 399 ची विमा योजना

पोस्ट ऑफिस :

महागड्या प्रीमियममध्ये विमा काढू न शकणार्‍या गरीब आणि गरजू लोकांसाठी विभागाने “सुरक्षा का पहला कदम ” नावाची विमा योजना आणली आहे. या विमा योजनेत, लाभार्थीला वर्षभरात फक्त ३९९ रुपयांच्या प्रीमियमसह १० लाख रुपयांचा विमा उतरवला जाईल.एक वर्ष संपल्यानंतर पुढील वर्षी लगेच या विम्याचे नूतनीकरण करावे लागेल. हा लाभ घेण्यासाठी पोस्ट विभागाच्या इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत लाभार्थीचे खाते असणे बंधनकारक आहे.

३०० रुपयांचा विमा अपघाती मृत्यू, कायमचे अपंगत्व किंवा आंशिक अपंगत्व यावर १० लाख रुपयांचे संरक्षण प्रदान करेल. यासोबतच उपचारासाठी ६०००० रुपयांपर्यंतचा IPD खर्च आणि OPD क्लेममध्ये ३०००० रुपयांपर्यंतचा खर्च उपलब्ध होणार आहे.दोन मुलांच्या शिक्षणासाठी १ लाख रुपयांपर्यंतचा समावेश आहे. तसेच कुटुंबाचा वाहतूक खर्च रु. २५००० पर्यंत, अंत्यविधीचा खर्च रु. ५००० पर्यंत दिला जाईल . वरिष्ठ डाक विभाग प्रमुख हमीरपूर नरेंद्र कुमार यांनी सांगितले की,हि योजना ३० जूनपासून सुरू केली आहे.

अर्ज कसा कराल.?

पोस्ट ऑफिस ३९९ रुपयांचा विमा योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे इंडिया पोस्ट पेमेंट बँक येथे खाते असणे आवश्यक आहे. ते नसेल तर तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आधी काढून घ्यावे लागेल. यासाठी तुम्ही पोस्टमन आणि पोस्ट ऑफिसमधील कर्मचाऱ्यांची मदत घेऊ शकतात.
Post Office Vima yojana पोस्ट विमा Post Vima 399 फक्त ₹ 399 ची विमा योजना

ही योजना नेमकी काय आहे ?

१) विमाधारक व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यास १० लाख रुपये त्याच्या कुटूंबियाला प्रदान करण्यात येतात.
२) विमाधारक व्यक्तीस कायमचे अपंगत्व आल्यास त्याला १० लाख रुपये प्रदान करण्यात येतात.
३) या विमा योजनेत दवाखान्याचा खर्च करण्यासाठी ६० हजार रुपये देण्यात येतात.
४) या पोस्ट ऑफिस च्या अपघात विमा योजना अंतर्गत विमाधारकाच्या किमान दोन मुलांच्या शिक्षणासाठी १ लाख रुपये प्रदान करण्यात येतात.
५) विमाधारकास हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असेल तर ,दाखल केल्या नंतर दररोज १ हजार रुपये प्रति दिवस असे १० दिवसांपर्यंत देण्यात येतात.
६) विमाधारकास ओपीडी खर्च हा ३०००० रुपये प्रदान करण्यात येतो.
७) विमाधारकास पॅरालिसीस झाल्यास त्यास १०लाख रुपये प्रदान करण्यात येतात.
८) विमाधारक व्यक्तीच्या कुटुंबास दवाखान्यात येण्यासाठी प्रवास खर्च म्हणून २५००० रुपये प्रदान करण्यात येतात.

अपघात झाला तर ह्या विम्याचे फायदे मिळणार आहेत . पण देव करो आणि अशी वाईट वेळ कोणावरही न येवो . पण आलीच तर आपल्या कुटुंबातील व्यक्तींना याचा फायदा नक्कीच मिळणार आहे

रक्षाबंधन Wallpaper Download करण्यासाठी या Link वर क्लीक करा. 

आषाढी वारीची आकर्षक चित्रे पहा

Swati

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

1 month ago

आभासी प्रेम | Best love poem on rain in marathi in 2024

श्री विजय तानाजी पाटील यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem on rain in marathi in…

1 month ago

दिखाव्याला भुलला | Best cute love poem in marathi in 2024

श्री.मच्छिंद्र रत्नाकर झुरंगे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत cute love poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

ऑनलाईन प्रेम | best love poem for her in marathi in 2024

जयद्रथ आखाडे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem for her in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

खरचं हे प्रेम आहे का | best love athavan poem in marathi in 2024

प्रतिक्षा परमेश्वर थोटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love athavan poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

आभासी ओढ | Best funny love poem in marathi in 2024

अनंत वा तेलंग यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत funny love poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago