Categories: लेख

बहिणीला भेटवस्तू काय द्यावी ? टॉप १० रक्षाबंधन Gift

रक्षाबंधन हा सण म्हटलं की आपल्या बहिणीला काय गिफ्ट द्यायचं हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच येत असेल. यासाठी काही टिप्स आम्ही तुम्हाला या लेखाच्या आधारे सांगणार आहोत.भाऊ आणि बहिणीचं हे नातं अगदी अतूट असतं. ‘तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना’ . हे वाक्य प्रत्येक भाऊ-बहिणीच्या नात्याला अगदी शोभेल असं आहे.या नात्यामध्ये छोटे-मोठे वाद, भांडण , विवाद तर असतातच पण त्यापेक्षाही अधिक असतं ते प्रेम. एखाद्या छोट्याशा कारणामुळे देखील तुम्ही तुमच्या बहिणीशी किंवा भावाशी जोरदार भांडण करता. त्यानंतर काही वेळानंतर तुम्हालाच याची जाणीव होते. आपण उगीचच चुकीच्या आणि वेगळ्याच कारणासाठी भांडत आहोत. भाऊ-बहिणीच्या या निरागस नात्याबाबत बोलावं तेवढं कमीच आहे.

बहिणीला भेटवस्तू काय द्यावी ? टॉप १० रक्षाबंधन Gift Raksha bandhan rakhi gift in marathi for sister

क्षणभराचा राग तर क्षणात प्रेम असं काहीसं असतं. रक्षाबंधन म्हणजे भाऊ आणि बहिणीसाठी सुखाचा , आनंदाचा दिवस. या दिवशी आपल्या लाडक्या बहिणीला काय गिफ्ट द्यायचं या चिंतेत जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी काही खास टिप्स आम्ही घेऊन आलो आहोत. या टिप्स नेमक्या कोणत्या हे या लेखाच्या आधारे आपण जाणून घेऊयात .

भेटवस्तू काय द्यावी ?
1) ओ. टी . टी :

सध्याचा जमाना हा डिजिटलचा आहे. वर्क फ्रॉम होममुळे फक्त घरात राहूनच बहुतांश लोकांना काम करावं लागत आहे. अशा परिस्थितीमुळे बहुतांश लोक मनोरंजनसाठी ओटीटी प्लॅटफॉर्मकडे वळले आहेत. रक्षाबंधनानिमित्त तुम्ही पण तुमच्या बहिणीला ओटीटी सब्सक्रिप्शन देऊ शकता. गिफ्टच्या स्वरुपात हा अगदी उत्तम आणि कमी खर्चाचा पर्याय आहे. तिच्यासाठी हे गिफ्ट अधिक फायदेशीर ठरू शकतं. तसेच तिच्या चेहऱ्यावरील हा आनंद पाहून तुम्हालाही खूप समाधान वाटेल.

2) मेकअप किट :

बऱ्याच मुलींना नटून-थटून तयार होण्याची एक वेगळीच आवड असते. तुमच्या बहिणीला पण अशा प्रकारची आवड असेल तर तुम्ही एक उत्तम ज्वेलरी सेट , बांगडी सेट ,मेकअप किट असे वेगवेगळे गिफ्ट देऊ शकता.याची ऑनलाइन किंवा एखाद्या शॉपमध्ये जाऊन तुम्ही ही खरेदी करू शकता. ऑनलाइन ज्वेलरीसाठी उत्तम असे पर्याय उपलब्ध आहेत.

3) डिजिटल वॉच :

रक्षाबंधन जवळ आलं तरी मुलं बहिणीला गिफ्ट निवडण्याच्या गोंधळातच असतात. काय गिफ्ट द्यावं हा मोठा प्रश्न पडतो .तुम्ही डिजिटल वॉचचा पर्याय देखील निवडू शकता. सध्या बऱ्याच नामांकित कंपनीचे डिजिटल वॉच बाजारात तसेच ऑनलाइन सुद्धा उपलब्ध आहेत.तुम्ही गिफ्टच्या स्वरुपामध्ये डिजिटल वॉच तुमच्या बहिणीला रक्षाबंधनादिवशी देऊ शकता. खिशाला परवडणारे डिजिटल वॉच बाजारामध्ये उपलब्ध आहेत.हे वॉच पाहून तुमच्या बहिणीला आनंद नक्कीच होईल.

बहिणीला भेटवस्तू काय द्यावी ? टॉप १० रक्षाबंधन Gift Raksha bandhan rakhi gift in marathi for sister

4) रक्षाबंधन शुभेच्छा पत्र :

तसेच एक गिफ्ट कार्ड तयार करून बहिणीबाबत कौतुकास्पद मॅसेज लिहून हे कार्ड ती सकाळी उठण्यापूर्वी तिच्या बेडवर अथवा रुममध्ये तुम्ही कुठेही ठेऊ शकता. त्यामुळे तिच्या दिवसाची सुरुवात अगदी आनंदी होईल.यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. बहिणीच्या आवडी-निवडी ओळखून तिला कोणते खाद्यपदार्थ आवडतात हे तुम्ही बाहेरुन ऑर्डर करू शकता.तसेच बहिणीबद्दल कौतुकास्पद मॅसेज लिहून एक गिफ्ट कार्ड (Greeting Card) तयार करा. हे कार्ड ती सकाळी उठण्यापूर्वी तिच्या बेडवर अथवा रुममध्ये तुम्ही कुठेही ठेऊ शकता. यामुळे तिच्या दिवसाची सुरुवातच अगदी आनंदी होईल.

बहिणीला भेटवस्तू काय द्यावी ? टॉप १० रक्षाबंधन Gift Raksha bandhan rakhi gift in marathi for sister

5) वर्कआउट किट :

रक्षाबंधन हा सण आणि बहिणीला दिल जाणार गिफ्ट यामध्ये वर्कआउट किट हे गणित काही जमत नाही . असा विचार तुमच्या मनात नक्कीच येत असेल .पण जर तुमची बहीण फिटनेसच्या (Health Conscious) बाबतीत अगदी परफेक्ट आहे . तर तिच्याकडे ज्या वस्तू नाहीत किंवा ज्या वस्तू खराब झाल्या आहेत त्या तुम्ही गिफ्टच्या स्वरुपात तिला देऊ शकता. उदा. योगा मॅट, शूज, स्किपिंग रोप, वॉटर बॉटल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तुंचं एक किट तयार करून तुम्ही तुमच्या बहिणीला देऊ शकता.अशा प्रकारचं गिफ्टमुळे तुमची बहीण अधिक खूश होऊ शकते.

6) हेडफोन :

गिफ्ट देण्यासाठी सगळ्यात कमी खर्चाचा असा हा पर्याय आहे. हेडफोन हा सध्या प्रत्येकाच्या जीवनातील अतिशय महत्वाचा घटक बनला आहे. प्रवासामध्ये , ऑफिसमध्ये तसेच अगदी मित्रांबरोबर बोलण्यापासून ते ऑनलाईन लेक्चर या सर्वच ठिकाणी हेडफोन फार उपयोगी पडतात. दुकानात जाऊन किंवा ऑनलाईन पण तुम्ही हेडफोन मागवू शकता .

7) हँड बॅग :

आकर्षक रंग आणि वेगवेगळा पॅटर्न अश्या बॅग्स म्हणजे फॅशनप्रेमी मुलींचा आवडीचा विषय. त्यामुळे व्यक्तिमत्त्व आणखी खुलून दिसतं. सध्याच्या तरुणींमध्ये वेस्ट बॅगची प्रचंड क्रेझ आहे. कंबरेला लावण्यासाठी तयार केलेल्या या बॅगेला आता खूप मागणी आहे. स्लिंग बॅग, क्लच , हँड बॅग यांना पर्याय म्हणून वेस्ट बॅगचा स्टायलिंगमध्ये समावेश केला जातो . वेस्ट बॅग्सना फॅनी बॅग, हिप बॅग, बेल्ट बॅग, वेस्ट पाऊच या नावानेही ओळखले जाते .

8) रक्षाबंधन चॉकलेट :

चॉकलेट हा सगळ्यांनाच आवडणारा पदार्थ . तुम्ही पण या रक्षाबंधन दिवशी तुमच्या बहिणीला तिच्या आवडीचा चॉकलेट बॉक्स गिफ्ट देऊ शकता .ऑनलाईन किंवा दुकानात जाऊन तुम्ही खरेदी करू शकता .

बहिणीला भेटवस्तू काय द्यावी ? टॉप १० रक्षाबंधन Gift Raksha bandhan rakhi gift in marathi for sister

9) रक्षाबंधन फोटो फ्रेम :

या मध्ये तुम्ही तुमच्या बहिणीचे छान फोटो लावून तिला हे गिफ्ट देऊ शकता . त्याने तिला हि खूप आनंद होईल .

10) आवडीचे खाद्यपदार्थ :

सरप्राइज गिफ्ट म्हटलं , की मुलींच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद , उत्साह पाहायला मिळतो. रक्षाबंधन या सणाचं औचित्य साधून तुम्ही पण तुमच्या लाडक्या बहिणीसाठी एखादं सरप्राइज प्लॅन करू शकता. यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. बहिणीच्या आवडी-निवडी ओळखून बहिणीला कोणते खाद्यपदार्थ आवडतात . हे तुम्ही बाहेरुन ऑर्डर करू शकता.

रक्षाबंधन Wallpaper Download करण्यासाठी या Link वर क्लीक करा. 

आषाढी वारीची आकर्षक चित्रे पहा

Swati

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

1 month ago

आभासी प्रेम | Best love poem on rain in marathi in 2024

श्री विजय तानाजी पाटील यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem on rain in marathi in…

1 month ago

दिखाव्याला भुलला | Best cute love poem in marathi in 2024

श्री.मच्छिंद्र रत्नाकर झुरंगे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत cute love poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

ऑनलाईन प्रेम | best love poem for her in marathi in 2024

जयद्रथ आखाडे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem for her in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

खरचं हे प्रेम आहे का | best love athavan poem in marathi in 2024

प्रतिक्षा परमेश्वर थोटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love athavan poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

आभासी ओढ | Best funny love poem in marathi in 2024

अनंत वा तेलंग यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत funny love poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago