Categories: लेख

Salmon Fish In Marathi | मराठी अर्थ साल्मोन मासा खाण्याचे फायदे

आजच्या या लेखामध्ये आपण Salmon Fish In Marathi साल्मन माश्याच्या प्रजाती , साल्मन माश्याची दुसरी नावे कोणती? साल्मन माश्यामध्ये कोणते महत्वाचे घटक आढळतात? साल्मन माश्यापासून आपल्याला कोणते व कसे फायदे मिळतात ? अश्या शंकांचे समाधान करून घेणार आहोत. 

आपले आरोग्य चांगले राहावे यासाठी काही लोक शाकाहार तर काही लोक मांसाहार याचे सेवन करतात. मग जेव्हा आपण मांसाहाराविषयी बोलतो तेव्हा (Sea Food) समुद्री अन्न हे अतिउत्तम मानले जाते. त्यात मुख्यत्वे साल्मन माशाची तर गोष्टच वेगळी आहे.

What is salmon fish called in marathi ?

मग आता साल्मन हा मासा आहे तरी काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल? साल्मन या माश्याला मराठीमध्ये “रावस मासा” असे देखील म्हटले जाते. हा मासा प्रामुख्याने नदीमध्ये अंडी देतो . नंतर ते अंडी पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून समुद्रात जातात . त्यापासून साल्मन मासे तयार होऊन ते जास्त काळ समुद्रात आपले जीवन जगतात. रावस माश्यालाच जगभरात “Indian Salmon Fish” या नावाने ओळखले जाते. याशिवाय वेगवेगळ्या ठिकाणी सापडल्यामुळे त्यांना त्यानुसार नावे देण्यात आली आहेत . जसे हवाईयन सॅल्मन ,ऑस्ट्रेलियन सॅल्मन, आणि डॅन्यूब सॅल्मन.

मुळात साल्मन मासा हा सॅल्मोनिडे या कुटुंबातीलच एक मासा आहे. तसेच Salmonidae या कुटुंबात आणखी काही वेगवेगळे मासे आहेत त्यांची नावे ग्रेलिंग,ट्राउट आणि व्हाईट फिश अशी आहेत.जास्त करून पॅसिफिक महासागर आणि उत्तर अटलांटिक च्या उपनद्यांमध्ये साल्मन मासा आढळतो. तसेच साल्मन माश्याची काही भागामधील लोक शेती सुद्धा करतात त्यालाच फिश फार्मिंग असे देखील म्हटले जाते. 

What is salmon fish called ? name & images In Marathi

साल्मन मासे हे विशिष्ट्य प्रकारच्या प्रजातीमधून येतात . त्याला च “अ‍ॅनाड्रॉमस” म्हटले जाते. यामध्ये हे मासे खा ऱ्या आणि गोड्या पाण्यामध्ये राहू शकतात. हे मासे समुद्रातील पाण्यात राहतात आणि जेव्हा ते अंडी देतात तेव्हा ते नदीच्या पाण्यामध्ये प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने येऊन नदीमध्ये अंडी देतात. 

भारतामध्ये साल्मन मासे हे ओडिसा आणि पश्चिम बंगाल या ठिकाणी आढळतात. तसेच महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये पश्चिमेला समुद्रकिनारी आढळतात. भारतातील लोक महत्वाच्या प्रथिनांसाठी आणि पौष्टिक आहारासाठी मांसाहाराला प्राधान्य देत असतात. साल्मन मासा हा प्रामुख्याने यात समाविष्ट केला जातो. 

What is salmon fish called ? name & images In Marathi

साल्मन हा शब्द “साल्मो” या लॅटिन शब्दापासून तयार झाला आहे. साल्मन हे मासे विविध रंगांचे , वजनाचे तसेच विविध लांबीचे आढळतात . 
 साल्मन माश्याचे जास्तीत जास्त वजन ९.४ किलो पासून १४५ किलो पर्यंत सापडले आहे.

लांबीमध्ये रावस मासा हा जास्तीत जास्त ८९ से.मी. पासून ते २०० से.मी. पर्यंत लांब असतात.

 जाणून घेऊयात साल्मन माशामध्ये कोणते पोषक तत्व आढळतात. 

पोषक तत्त्वे : Salmon Fish In Marathi

१) प्रोटीनची कमतरता पूर्ण करणे:

आपल्या शरीरासाठी प्रोटीन हे फार महत्वाचे असते. आपल्या शरीरातील प्रोटीन कमी झाल्याने आपल्याला त्वचेसंबंधी व हाडांसंबंधीत वेगवेगळे आजार होऊ शकतात. 
अश्या स्तिथीमध्ये डॉक्टरांकडून जास्त प्रोटीन असणाऱ्या पदार्थांचे सेवन करण्यास आपल्याला सांगितले जाते. त्यामुळे प्रोटीन ची कमी भरून काढण्यासाठी साल्मन या माश्याचे सेवन हे फार फायदेशीर ठरते . 

२) डोळ्यांचे उत्तम आरोग्य:

डोळा म्हणजे नेत्र हे मानवाच्या अनमोल अवयवांपैकी एक आहे . आणि त्याचे स्वास्थ्य चांगले ठेवणे हे त्यापेक्षाही महत्वाचे आहे. साल्मन माशामध्ये पुरेश्या प्रमाणात ओमेगा-३ फॅटी ऍसिड तसेच अमिनो ऍसिड उपलब्ध आहे. 

 माश्याचे सेवन केल्याने डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहते हे आपल्या सगळ्यांना माहीतच आहे . आणि तसा सल्लाही तज्ञांकडून देण्यात येतो. 

डोळ्यांमधील रेटिना हा भाग खूपच महत्वाचा असतो . त्या भागामुळेच आपल्याला सर्वकाही दिसते. रेटिनाला मजबूत ठेवण्याकरता आणि वेगवेगळ्या रोगांपासून त्याला दूर ठेवण्याकरिता ओमेगा-३ फॅटी ऍसिड आणि अमिनो ऍसिड यांचे सेवन महत्वाचे आहे. 

यासाठी साल्मन माश्याचे सेवन हे फार महत्वाचा मानले जाते.

What is salmon fish called ? Salmon fish In Marathi name & images

३) Salmon त्वचेसाठी उपयुक्त:

त्वचेच्या आरोग्यासाठी सुद्धा साल्मन माश्याचे सेवन हे गुणकारी आहे . साल्मन मध्ये ओमेगा-३ ऍसिड सापडते . यामुळे त्वचेला मऊ, चमकदार आणि गोरा बनवण्यास हे मदत करते. योग्य प्रमाणात सेवन करणे महत्वाचे असल्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे .

४) केसांचे आरोग्य :

 योग्य प्रमाणामध्ये साल्मन माशामध्ये ओमेगा फॅटी ऍसिड, लोह, व्हिटॅमिन बी- १२ असते. हे केसांसाठी अतिशय उत्तम मानले जाते. याचे योग्य प्रमाणात सेवन केल्याने केसांच्या विविध समस्या पासून दूर राहण्यास मदत करते. केस पांढरे होणे, केस कोरडे पडणे, केस गळणे, अश्या अनेक केसांच्या समस्येवर साल्मन उपयोगी आहे. 

५) मेंदूची कार्यक्षमता वाढवणे :

 साल्मन मासे हे प्रथिनांचे भांडार आहे. यात लोह, ओमेगा ऍसिड, व्हिटॅमिन हे पुरेशा प्रमाणात उपलब्ध असते . ही सर्व प्रथिने आपली बुद्धिमत्ता वाढवण्यास तसेच मेंदूशी संबंधित सर्व मासपेशींचा योग्य विकास करण्यास लाभदायक ठरतात.

What is salmon fish called ? Salmon fish In Marathi name & images

६) वजन कमी करणे :

 भरपूर प्रमाणात पाणी आणि फायबर साल्मन माशामध्ये उपलब्ध आहे . यामध्ये कॅलरीचे प्रमाण सुद्धा कमी आहे. आणि आपल्याला भूकही लागत नाही . त्यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते.

७) Salmon हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्यास:

आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल चे प्रमाण वाढल्यामुळे बऱ्याच लोकांना हृद्यासंबंधी आजार होत आहेत. साल्मन माशामध्ये योग्य प्रमाणात ओमेगा-३ फॅटी ऍसिड आढळते त्यामुळे हे ऍसिड आपल्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते . त्यामुळे आपला रक्तदाब नियंत्रित राहतो. 

ही प्रथिने आपल्या रक्तवाहिन्या अधिक मजबूत करण्यास आणि हृदयाची कार्यप्रणाली सुधारण्यास मदत करतात. म्हणून यासंबंधित आपण आपाल्या डॉक्टरांशी सल्ला घेऊन या माश्याचे सेवन करू शकता.

What is salmon fish called ? Salmon fish In Marathi name & images

आम्हाला आशा आहे कि या माहिती मधून तुमचे सर्वच प्रश्न दूर झाले असणार. या माहितीबद्दल तुम्ही आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया Comment करून नक्की कळवा आणि हा लेख तुमच्या जवळच्या व्यक्तींमध्ये Share करायला विसरू नका.

तुम्हाला माझी “आठवण” हि कविता नक्कीच आवडेल. वाचण्यासाठी क्लिक करा.

रागावलेल्या आपल्या माणसाला मानवाण्यासाठी कविता राग रुसवा

झाशीची राणी लक्ष्मी बाई कश्या होत्या ?

Swati

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

1 month ago

आभासी प्रेम | Best love poem on rain in marathi in 2024

श्री विजय तानाजी पाटील यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem on rain in marathi in…

1 month ago

दिखाव्याला भुलला | Best cute love poem in marathi in 2024

श्री.मच्छिंद्र रत्नाकर झुरंगे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत cute love poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

ऑनलाईन प्रेम | best love poem for her in marathi in 2024

जयद्रथ आखाडे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem for her in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

खरचं हे प्रेम आहे का | best love athavan poem in marathi in 2024

प्रतिक्षा परमेश्वर थोटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love athavan poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

आभासी ओढ | Best funny love poem in marathi in 2024

अनंत वा तेलंग यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत funny love poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago