Marathi Kavita : आठवण
हृदयाच्या कप्प्यात केली
भूतकाळाची साठवण…..
शब्दात सांगायचे झालें तर
त्याला आपण म्हणतो आठवण……
गतकाळातील अनुभवातून
मिळते जगण्याची शिकवण……
स्वप्नांच्या दुनियेत रमणाऱ्या मनाला
वास्तवाची जाण करून देते ती आठवण……
कधी आनंद, कधी दुःख
संघर्षमय हे असे जीवन…..
अपयशाने खचलेल्या मनाला
उभारी देते ती आठवण…… Marathi Kavita : आठवण
परमोच्च आनंदाचे काही क्षण
जीवनाच्या पुस्कातील सोनेरी पान…..
आयुष्याच्या संध्याकाळी एकटेपणात
साथ देते ती आठवण……
प्रेमाच्या अन रक्ताच्या नात्याचे
कुण्या दूर गावी असतात आप्तजन…..
विरहाच्या दुःखात त्यांच्या
आधार देते ती आठवण….
आयुष्याच्या सागरात
होते सुखदुःखाची साठवण…..
शब्दात सांगायचे झालें तर
त्याला आपण म्हणतो आठवण……
Marathi Kavita : आठवण
असे असावे प्रेम

नको करू प्रेम वेड्यासारखा,आवर तुझ्या वेड्या भावनेला
नको करू अतिरेक भावनेचा, मुकशील प्रेमाच्या अस्तित्वाला
वाटते भिती प्रेमाच्या भरतीची, वाहुनी जाईन त्या महापूरात
असूदे प्रेम निर्झरा खळखळणारा,धुंद होईन त्याच्या संगीतात
भयभित करते तूफान प्रेमाच, होऊन जाईन मी त्यात उध्वस्त
असूदे प्रेम धुंद मंद वारा, जाईन शहारूनी त्या सुखद स्पर्शात
थरकाप करे आग प्रेमाची, वणवा होऊनी करेल मज भस्मसात
असूदे प्रेम समईतली ज्योत, जाईन न्हाऊनी त्या मंद प्रकाशात
थिजवी प्रेमाची अतिवृष्टी, होऊनी जलमय गुदमरेल जीव त्यात
असूदे प्रेम श्रावणी जलधारा, भिजुनी जाईन इंद्रधनुच्या रंगात
प्रेम असूदे स्पटिकासम नितळ, सप्त सूरांचं सुरेल गाणं
अविचारांचा स्पर्श न ज्याला ते बाळ निरागस गोड शहाणं
Marathi Kavita : असे असावे प्रेम
Marathi Kavita : तुझी आठवण

तुझ्या आठवणी मनाच्या पुस्तकात
गुलाबाची फूल बनून राहिल्या
जाई जुईचा गजरा माळून
त्या मलाही फुलवत राहिल्या
कधी कंगनांची किणकिण
कधी पैंजणांची छुमछुम
कधी स्पंदनांचे नाद बनून
मनामध्ये वाजत राहिल्या
त्या आठवणींच्या झुल्यावर
मग मी झुलत राहिले
आकाशी उंच झेप घेता घेता
नभीचे चंद्र तारे वेचत राहिले
कुणास ठाऊक काय झाले
आकाशी त्या मेघ दाटून आले
वादळाच्या त्या वावटळीत
सर्व नादच विरून गेले
आता मी आहे आणि तुझी
आठवण आहे
माझ्या विरक्त जीवनात
तेवढीच आता साठवण आहे
Marathi Kavita : तुझी आठवण
Author : Shubhangi

खालील लेख वाचा
चैतन्य यांचे आणखी लिखाण वाचा – रक्षाबंधन २०२०
Made In India Smartphone Review वाचण्या साठी क्लिक करा
Pingback: आठवण कविता : जगणं अवघड करणारी हि आठवण : मराठी कविता - Maza Blog