Categories: Kavita In Marathi

राधेय | Best Suryaputra karn poem in 2024

प्रमोद प्रवासी सावरकर यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Suryaputra karn poem in 2024 विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

Suryaputra karn poem in 2024

काव्यबंध समूह आयोजित काव्यलतिका रविवारीय काव्य स्पर्धेसाठी
दि.३मार्च२०२४ रविवार
विषय- महारथी कर्ण

राधेय | Suryaputra karn poem in 2024

कौन्तेय तू असताना
झाला तू राधेय
अधर्माचा सोबतीला
केलास धर्माचा विजय

चूक आईची असताना
फळ भोगले आयुष्यभर
ज्येष्ठ कौन्तेय असताना
प्रेम न मिळाले तिळभर

कानात कुंडल, कवच
शूरवीर तू महावीर
इंद्राला दान करणारा
महाभारतातला दानवीर

जरी असे अर्जुन धनुर्धर
असे गुरुची कृपा त्यावर
अपमान गुरुने करताना
थकला नव्हता तू विद्याधर

जसा युधिष्ठिर धर्माचा
कृष्ण होता प्रेमाचा
शकुनी झाला शत्रुतेचा
कर्ण तू असा मित्रतेचा

मित्रतेचे उदाहरण घेता
महाभारताची तू शान होता
तू सुत नाही, सूर्यपुत्र होता
अंगराज तू दिग्विजय होता

शिष्य तू परशुरामाचा
महान धनुर्धर कौरवाचा
वचनासाठी लढणारा
जिवलग मित्र दुर्योधनाचा

सूर्यपुत्र वाढला अंधारात
कौन्तेय सोबतच तू लढला
निशस्त्री तू पराभवी ठरला
कर्ण तू मृत्युंजय बनला

जरी सुदामा असेल तरी
मी कर्णालाच निवडणार
युधिष्ठिर पेक्षा वचना करिता
कर्णाला कमी का आखणार

महाभारत संपविण्यात
तू एकटाच भारी असता
कुंतीला दिलेल्या वचनात
जर तू अडकला नसता

भीष्म आणि द्रोणानंतर
तू एकटाच वीर राहिला
खात्री होती दुर्योधनाला
तू तो अभिमान पाळला

नमन करी तुझ्या वीरतेला
जय तुझी ग्रंथात असे
न मिळणार तुझा पर्याय
खरा महानायक तूच असे

प्रमोद प्रवासीसावरकर, 7000339423

Suryaputra karn poem in 2024

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Ashutosh R

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

2 months ago

आभासी प्रेम | Best love poem on rain in marathi in 2024

श्री विजय तानाजी पाटील यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem on rain in marathi in…

2 months ago

दिखाव्याला भुलला | Best cute love poem in marathi in 2024

श्री.मच्छिंद्र रत्नाकर झुरंगे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत cute love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

ऑनलाईन प्रेम | best love poem for her in marathi in 2024

जयद्रथ आखाडे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem for her in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

खरचं हे प्रेम आहे का | best love athavan poem in marathi in 2024

प्रतिक्षा परमेश्वर थोटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love athavan poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

आभासी ओढ | Best funny love poem in marathi in 2024

अनंत वा तेलंग यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत funny love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago