Kavita In Marathi

असे पांडवा पहिला | Best Angraj Karn Mahiti Kavita in 2024

श्री. पद्माकर दत्तात्रेय वाघरुळकर यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Angraj Karn Mahiti Kavita in 2024 विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

Angraj Karn Mahiti Kavita in 2024

काव्यबंध समूह आयोजित काव्यलतिका रविवारीय काव्य स्पर्धेसाठी
दि.३मार्च२०२४ रविवार
विषय- महारथी कर्ण

असे पांडवा पहिला | Angraj Karn Mahiti Kavita in 2024

इतिहास पानोपानी
गाथा महान शुरांची
नित्य वाचना श्रवणा
कार्ये पहावी विरांची

ग्रंथ जो महाभारत
मानवाला वरदान
दिसे स्वभाव वैशिष्ट्ये
वृत्ती मानवाची छान

कुंती कुमारी अवस्था
ऋषी दुर्वास जी शिष्या
पुत्रप्राप्ती वरदाने
तिला मिळाली भविष्या

सूर्यदेवा प्रार्थियले
कुंतीसाठी प्रकटले
दिला कवच कुंडली
कर्ण ते अवतरले

लोकलज्जा भयास्तव
जला मध्येच सोडला
पुत्रप्रेम विरहात
अख्खा जन्म घालविला

राधा अधिरथ पुत्र
महारथी कर्ण झाला
दुर्योधन मित्र भेटे
अंगराज करी त्याला

दानशूर उपाधीने
ख्याती जगी पसरली
दान कवच कुंडला
मृत्यूदशा ओढवली

देव इंद्र प्रसन्नाने
शक्ती वासवी मिळाली
घटोत्कच वधासाठी
दुर्योधना साह्य झाली

संगतीचा दोष लागे
दुर्योधन दुःशासनी
जेव्हा तो वस्त्रहरणी
द्रौपदीस दुर्वचनी

होता परशुरामाचा
शिष्य प्रतापी महान
मृत्यूंजयी जगी झाला
वाटे सर्वां अभिमान १०

क्षत्रियत्व असूनही
वेष ब्राह्मण धरला
परशुरामाचे शापे
सारी विद्या विस्मरला ११

वचनात जागलेला
कुंती माते जो दिला
तुझे पाच राहतील
असा पांडव पहिला १२

वीर असा गौरविला
कर्ण जगी भारताचा
कर्णार्जून महानच
ठेवा असे संस्कृतीचा १३

दुर्लक्षित व्यक्तिमत्त्व
पराक्रमी असूनही
महारथी दानशूर
अंगराज कर्णतोही १४

घ्यावा बोध आपणही
अशा चरित्रांमधून
राहू भ्रमरासमान
गुणग्राही ते राहून १५

✍️शीघ्रकवी श्री पद्माकर दत्तात्रेय वाघरूळकर (दत्तिंदुसुत) छत्रपती संभाजीनगर📱९७३०७९८२७९🤝

Angraj Karn Mahiti Kavita in 2024

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Ashutosh R

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

2 months ago

आभासी प्रेम | Best love poem on rain in marathi in 2024

श्री विजय तानाजी पाटील यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem on rain in marathi in…

2 months ago

दिखाव्याला भुलला | Best cute love poem in marathi in 2024

श्री.मच्छिंद्र रत्नाकर झुरंगे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत cute love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

ऑनलाईन प्रेम | best love poem for her in marathi in 2024

जयद्रथ आखाडे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem for her in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

खरचं हे प्रेम आहे का | best love athavan poem in marathi in 2024

प्रतिक्षा परमेश्वर थोटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love athavan poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

आभासी ओढ | Best funny love poem in marathi in 2024

अनंत वा तेलंग यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत funny love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago