Kavita In Marathi

ऑनलाईन प्रेम | best Fb love poem in marathi in 2024

सौ. संघमित्रा सोरटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Fb love poem in marathi in 2024 विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

Fb love poem in marathi in 2024

काव्य बंध समूह आयोजित काव्य लतिका रविवारीय काव्य स्पर्धा.
दि.१०/३/२०२४.
विषय..ऑनलाईन प्रेम.

शीर्षक..पाऊल नव्या युगाचे | Fb love poem in marathi in 2024

जगभर पसरले मोबाईलचे वारे
ऑनलाईन प्रेम सगळीकडे चाले
तरुणाई झाली नकळत धुंद
वाटे नव्याने नवे युग आले

जी .एफ,जी .एल चे पेव सगळीकडे
अगणित झाले मोबाईलमधे नंबर
ऑनलाईन रोज भेटी अन्
ओठात प्रेमळ गोड स्वर

काळा,गोरा कुरूपही
दिसायला सारे लागले सुंदर
ऑनलाईन होताच प्रेमही
ठरू लागले स्वयंवर

शब्दावाचून कळू लागल्या
मनातील भाव,भावना
कला गुणांची न उरली पारख
ऑनलाईनच स्वप्न कल्पना

कमी झाले वाटे या प्रेमानं
जातीपातीतील जुने अंतर
सर्व धर्म समभाव या मधील
ऐकू येऊ लागले ऐकीचे स्वर

थोडी आंबट तर थोडी गोड
वाटे ऑनलाईन प्रेम कहाणी
हरवल्या तरू तळीच्या भेटी
विसरली प्रेमाची सगळी गाणी

जुन्या रुढी परंपरांचा सगळया
पडला विसर वाटे नव्या पिढीला
ऑनलाईन प्रेमाची लागता गोडी
तरुण,तरुणी वर्ग प्रेमात बुडाला

ऑनलाईन प्रेमाचीच जादू
घेरतेय साऱ्या तरुण तरुणींना
सरला जुन्या काळाचा पडदा
मोडला रीती रीवाज यांचा कणा

बदललेल्या काळा बरोबर
बदलत गेली आता नवी पिढी
जुन्या विचार शृंखलाची
झाली आपोआपच सैल कडी

ऑनलाईन प्रेमच अवघे
होऊ पाहतय श्रेष्ठ सगळीकडे
आधुनिकतेच्या नावाखाली
पाऊल नव्या युगाचे पुढे पडे.

सौ .संघमित्रा राहुल सोरटे.
माळशिरस.सोलापूर.

Fb love poem in marathi in 2024

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Ashutosh R

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

1 month ago

आभासी प्रेम | Best love poem on rain in marathi in 2024

श्री विजय तानाजी पाटील यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem on rain in marathi in…

1 month ago

दिखाव्याला भुलला | Best cute love poem in marathi in 2024

श्री.मच्छिंद्र रत्नाकर झुरंगे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत cute love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

ऑनलाईन प्रेम | best love poem for her in marathi in 2024

जयद्रथ आखाडे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem for her in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

खरचं हे प्रेम आहे का | best love athavan poem in marathi in 2024

प्रतिक्षा परमेश्वर थोटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love athavan poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

आभासी ओढ | Best funny love poem in marathi in 2024

अनंत वा तेलंग यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत funny love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago