Kavita In Marathi

फेक आयडी | Best Facebook love poem in marathi in 2024

प्रवीण मारुती कसबे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Facebook love poem in marathi in 2024 विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

Facebook love poem in marathi in 2024

काव्यबंध साहित्य समूह आयोजित काव्यलतिका रविवारीय काव्य स्पर्धा..
दिनांक :- 10/3/2024
विषय :- ऑनलाईन प्रेम

फेक आयडी | Facebook love poem in marathi in 2024

चिठ्ठ्यांचा काळ जाऊन
नव मोबाईल युग आलं
ऑफलाईन प्रेमाचं रूपांतर
ऑनलाइन प्रेमात झालं..1

दिसली मला फेसबुकवर
स्टोरी पाहिली इन्स्टावर..
हळूहळू जडू लागलं
मन माझं तिच्या वर…2

हाय,हॅलो करता करता
जुळली आमची सेटिंग
रातभर करू लागलो
एकमेकांसोबत चॅटिंग…3

न पाहताच चेहरा तिचा
मी पडलो होतो प्रेमात..
खूप काही घडत होत
या मोबाइलच्या जमान्यात…4

चॅटिंग करता करता
वाढली आमची जवळीक
उगवू लागलं होत जोमाने
आमच्या प्रेमाचं पीक…5

नुसतंच चॅटिंग करायचो
कधी आम्ही बोललोच नाही..
कधी बोलायचं म्हणलं तर
सतत म्हणायची ती नाही नाही…6

स्वप्न पाहू लागलो प्रेमाची
आम्ही मिळून फेसबुकवर..
वाढू लागलं प्रेम आमचं
टायपिंग करून वरचेवर…7

एक दिवस मी तिच्या पाशी
केला माझ्याशी भेटीचा हट्ट..
दुर्लक्ष करून म्हणाली ती
अरे वेड्या आहेस का रे मठ्ठ..8

बदलतो सरडा रंग जसा
तशी हळूहळू बदलू लागली..
आहे काहीतरी गौड बंगाल
अशी थोडीशी भनक लागली..9

कळना माझ्या मनाला
अशी का वागते विचित्र
करावी म्हटलं तिची चौकशी
घेऊन सोबतीला माझे मित्र…10

फेक आय डी काढून माझी
हृदयातील जागा तिने चोरली
कळलं एकदा आहें तो मुलगा
आमची प्रेमाची हौस मात्र जिरली..11

नीट बघा आधी आयडी
ऑनलाईन प्रेम करा जपून..
मुलंच मॅसेज करू लागलेत
मुलींच्या नावाखाली लपून..12

प्रविण मारुती कसबे
माळशिरस जि. सोलापूर

Facebook love poem in marathi in 2024

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Ashutosh R

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

1 month ago

आभासी प्रेम | Best love poem on rain in marathi in 2024

श्री विजय तानाजी पाटील यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem on rain in marathi in…

1 month ago

दिखाव्याला भुलला | Best cute love poem in marathi in 2024

श्री.मच्छिंद्र रत्नाकर झुरंगे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत cute love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

ऑनलाईन प्रेम | best love poem for her in marathi in 2024

जयद्रथ आखाडे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem for her in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

खरचं हे प्रेम आहे का | best love athavan poem in marathi in 2024

प्रतिक्षा परमेश्वर थोटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love athavan poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

आभासी ओढ | Best funny love poem in marathi in 2024

अनंत वा तेलंग यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत funny love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago