Gajar Halwa Recipe in Marathi | थंडीसाठी स्पेशल गाजर हलवा रेसिपी

गाजर हलवा हा एक लोकप्रिय आणि सगळ्यांचा आवडता असा भारतीय पदार्थ आहे. याला विशेषतः हिवाळ्यामध्ये जास्त पसंती दिली जाते. ही रेसिपी आपण कोणत्याही खास प्रसंगी किंवा सणाच्या दिवशी ही बनवू शकता. ही सगळ्यात सोपी आणि झटपट अशी बनणारी रेसिपी लहान मुलांना तर आवडतेच पण मोठ्यांना देखील आवडते.
Recipe of gajar halwa in marathi sweets recipe how to make gajar halwa

आवश्यक लागणारे साहित्य :

१ कि. ग्रॅ . गाजर
२५० ग्रॅ . खवा
पावशेर दूध (आवडीनुसार )
२०० ग्रॅ . साखर
४ चमचे साजूक तूप
१० ते १२ काजू
१० ते १२ बादाम
वेलची पूड
व्हॅनिला एसेन्स ५ ते ६ थेंब (ऐच्छिक)
recipe of gajar halwa in marathi sweets recipe how to make gajar halwa

Gajar Halwa कृती :

१. सगळ्यात आधी गाजर स्वच्छ धुवून घ्यावेत . त्यानंतर सोलून त्याचा किस करून घ्या.

२. कढईमध्ये कमी आचेवर साजूक तूप गरम करून त्यामध्ये किसलेले गाजर टाकावे. मोठ्या चमच्याने चांगले परतावे . त्यावर झाकण ठेवून ५ मिनिटे शिजवावे.

३. ५ मिनिटांनी झाकण काढून त्यामध्ये साखर टाकून मिक्स करा . आणि परत ३-४ मि. झाकण ठेवून शिजवा.

४. परत ४ ते ५ मिनिटांनी झाकण उघडे ठेवून शिजवा, रसरसितपणा कमी होईपर्यंत अधूनमधून ढवळत राहा.

५. गाजराचा रस कमी झाला की त्यात दूध टाका व हलवा घट्ट होईपर्यंत शिजवा . चमच्याने सारखे ढवळत राहा.

६. मंद गॅस करून दुसऱ्या गैसवर एक कढईत किसलेला खवा (मावा) ठेवा. सतत चमच्याने ढवळत राहा. त्याचा रंग थोडा बदलेपर्यंत .

७. परतलेला खवा गाजराच्या हलव्यामध्ये टाका . चमच्याने सतत २ मिनिटे ढवळा आणि गॅस बंद करा.

८. मावा (खवा) परतलेल्या पॅनमध्येच काजू आणि बदाम २ मिनिटे तळून घ्या.
recipe of gajar halwa in marathi sweets recipe how to make

९. भाजून घेतलेले काजू, वेलची पावडर आणि इच्छेनुसार व्हॅनिला इसेन्स घालून चांगले मिक्स करा.

१०. अतिशय चविष्ट अश्या गाजरचा हलवा तयार झाला आहे. तुम्ही ते गरम गरम किंवा थंड जसे तुम्हाला आवडेल तसे सर्व्ह करू शकता.

महत्त्वाच्या सूचना :

१. चवदार गाजराचा हलवा बनवण्यासाठी गोड, रसाळ आणि लालसर गाजर निवडा.

२. गाजर किसताना पिवळ्या भागाचा वापर करू नका.

३. हलव्याला चव चांगली येण्यासाठी माव्यासोबतच दूध वापरा.

४. व्हॅनिला इसेन्स हे ऐच्छिक आहे पण त्यामुळेच हलव्याची चव अधिक चांगली येते.

५. या रेसिपीमध्ये खवा , काजू-बदाम यांचे काप हे भाजून घेतले आहेत. तुमच्या आवडीनुसार ते न भाजताही घालू शकता.

recipe of gajar halwa in marathi sweets recipe how to make

स्वादिष्ट बासुंदी घरी बनवायची आहे ? रेसिपी वाचण्यासाठी क्लिक करा.

पुरणपोळीचा बेत अस्सल महाराष्ट्रीयन रेसिपी शिवाय पूर्ण होणारच नाही. क्लिक करा.

बाळगुटी म्हणजे काय ? आणि त्याचा वापर कसा करावा ?

Swati

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

1 month ago

आभासी प्रेम | Best love poem on rain in marathi in 2024

श्री विजय तानाजी पाटील यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem on rain in marathi in…

1 month ago

दिखाव्याला भुलला | Best cute love poem in marathi in 2024

श्री.मच्छिंद्र रत्नाकर झुरंगे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत cute love poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

ऑनलाईन प्रेम | best love poem for her in marathi in 2024

जयद्रथ आखाडे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem for her in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

खरचं हे प्रेम आहे का | best love athavan poem in marathi in 2024

प्रतिक्षा परमेश्वर थोटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love athavan poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

आभासी ओढ | Best funny love poem in marathi in 2024

अनंत वा तेलंग यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत funny love poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago