Categories: Kavita In Marathi

आंतरिक तळमळ By सौ.रोहिणी अमोल पराडकर | Best ganpati nirop status in marathi 2023

काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी सौ.रोहिणी अमोल पराडकर यांची -आंतरिक तळमळ – हि कविता -ganpati nirop status in marathi- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे

आंतरिक तळमळ By सौ.रोहिणी अमोल पराडकर | Best ganpati nirop status in marathi 2023

आंतरिक तळमळ | ganpati nirop status in marathi

गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हांला
गणपती बाप्पा मोरया, हुरहुर ती मनाला //धृ //

कधी येणार माझ्या घरा ,लागे दर्शनाची आस
सत्संग भक्ती मनी धरा ,नाम स्मरणाचा ध्यास
गणेश गणेश मुखात, अखंडित जप माला !!१!!

गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हांला
गणपती बाप्पा मोरया, हुरहुर ती मनाला //धृ //

रांगोळी सडा घाला दारी, विद्युत रोषणाईने
मंडपात आरास भारी, कर जोडूनी भक्तिने
मखरात गौराई संगे, देव शंकरोबा आला !!२!!

गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हांला
गणपती बाप्पा मोरया, हुरहुर ती मनाला //धृ //

धूप दिपांचा परिमळ , दरवळे घरभर
लाडू मोदकांचा नैवेद्य, प्रसाद द्या भरभर
भजन कीर्तनातं जरा, नाचू गाऊ द्या आम्हांला !!३!!

गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हांला
गणपती बाप्पा मोरया, हुरहुर ती मनाला //धृ //

गौराई माहेरवाशीण ,पाहुणी तीन दिवसा
नांदे सुख शांती जगात ,भरा तिचा सौख्य वसा
भाजी भाकरी नैवेद्याचा , प्रसाद तो दाखवला !४!!

गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हांला
गणपती बाप्पा मोरया, हुरहुर ती मनाला //धृ //

ज्येष्ठा आणि कनिष्ठा दोघी, बहिणींचे पहा रूप
गौरवर्णीय अंगकांती, लावण्यवती स्वरूप
रात्र जागवत नाचता , प्रेम उधाण नात्याला !!५!!

गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हांला
गणपती बाप्पा मोरया, हुरहुर ती मनाला //धृ //

निरोपाची घटिका येता, थरारे अंतःकरण
दुर्वांकुंराची कंठी माळा, शुभंकरोती चरण
टाळ्यांच्या गजरात घ्यावा, निरोप विसर्जनाला !!६!!

गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हांला
गणपती बाप्पा मोरया, हुरहुर ती मनाला //धृ //

मूर्ती दान करून रोखू ,जल प्रदूषण सारे
निसर्ग सौंदर्याचे रुप ,जन जागृतीचे वारे
रिकामी मखर बघून,अश्रू धारा नयनाला !!७!!

गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हांला
गणपती बाप्पा मोरया, हुरहुर ती मनाला //धृ //

आंतरिक तळमळ By सौ.रोहिणी अमोल पराडकर | Best ganpati nirop status in marathi 2023

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

आंतरिक तळमळ By सौ.रोहिणी अमोल पराडकर | Best ganpati nirop status in marathi 2023

mazablog

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

2 months ago

आभासी प्रेम | Best love poem on rain in marathi in 2024

श्री विजय तानाजी पाटील यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem on rain in marathi in…

2 months ago

दिखाव्याला भुलला | Best cute love poem in marathi in 2024

श्री.मच्छिंद्र रत्नाकर झुरंगे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत cute love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

ऑनलाईन प्रेम | best love poem for her in marathi in 2024

जयद्रथ आखाडे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem for her in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

खरचं हे प्रेम आहे का | best love athavan poem in marathi in 2024

प्रतिक्षा परमेश्वर थोटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love athavan poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

आभासी ओढ | Best funny love poem in marathi in 2024

अनंत वा तेलंग यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत funny love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago