माझा बाप्पा By सौ.सुवर्णा पवार| Best ganpati gele gavala in marathi 2023

काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी सौ.सुवर्णा पवार यांची -माझा बाप्पा- हि कविता -ganpati gele gavala in marathi- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे

माझा बाप्पा By सौ.सुवर्णा पवार| Best ganpati gele gavala in marathi 2023

माझा बाप्पा | ganpati gele gavala in marathi 2023

स्पर्धा करीता
काव्यबन्ध समूह आयोजित
सप्टेंबर २०२३ मासिक दीर्घ कविता लेखन स्पर्धा.
दि . १४ ते २१ सप्टें. २०२३
विषय = गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला .

स्वरचित
काव्यप्रकार = दशाक्षरी
शीर्षक = माझा बाप्पा
शब्दसंख्या = २९५

तूच सुखकर्ता दुःखहर्ता
विद्येची करी श्री सुरवात,
फलश्रुती पुत्र, धन,विद्या
जपे गणेश स्त्रोत्र मुखात…..१

आद्य गणपती वंदू सारे
मातापिता दैवत वंदन,
आशिर्वादांचा करी वर्षाव
माझा बाप्पा तुजला नमन…. २

साऱ्यांचा लाडका गजानन
एकदंताय…….मंगलमुर्ती ,
विघ्न विनाशक दर्शनाने
येई भक्तगणां नव स्फूर्ती ….३

प्रथम भालचंद्र दर्शन
गणेश चतुर्थी भाद्रपद,
श्री गणेशच्या आगमनाने
भरतो मनी खूप आनंद…..४

पार्वती नंदन, गौरीपुत्र
हेरंब, विनायक आरती,
घंटेचा नाद घुमतो मनी
लंबोदरा साऱ्यांचा सारथी …५

तूच धुम्रवर्ण , विघ्नहर्ता
दाखवती मार्ग तो सत्याचा,
चौसष्ट कलेचा अधिपती
नाश करी दुष्ट असत्याचा….६

पुरणपोळी , श्रीखंडपुरी
मोदक, खीरी चौसष्ट भोग,
श्रीफळ,केळी, लाडू पक्वान्न
नैवेद्याचा तुझ्याकडे ओघ……७

ढोल, झांज, लेझीम गजर
तालावरती मुले नाचती,
फटाकड्या नि आतिषबाजी
ताशा, नगारे ढोल वाजती…..८

भेदभाव विसरुनी सारे
तुझे गुणगाण भक्त गाती,
आबालवृध्द, लहान,मोठी
जागवती ती दिवस राती…….९

पुजा, अर्चा, धुप ,नंदादिप
बुध्दी देवता करू औक्षण ,
भक्त करी तुझी आळवणी
संकटकाळी करी रक्षण ….१०

वक्रतुंडा तूच विघ्नहर्ता
संकटात तू धावत येई ,
प्रथम नाम तुज वंदिता
भक्तांनाही संरक्षण देई….. .११

गणपती निघाले गावाला
चैन ना तुजविण आम्हाला ,
करूनी वायदा तो साऱ्यांना
कृष्णपिंगाक्ष चाले गावाला…१२

यातना होतात मज खूप
विघ्नहर्ता तुझ्या रे जाण्याला,
विनायकाचा निरोप घेता
दुःख होते आमच्या मनाला…१३

दहा दिवस असे उत्साह
रोज मिळतो खूप आनंद,
स्तुती सुमनांचा हा वर्षाव
लागे तुझाच मजला छंद …..१४

वाटेल आम्हांला सारे सुने
तुझ्या वाचून रे करमेना,
तू गेल्यावर गावास तुझ्या
तुज वाचून मज जमेना……१५

मिरवणूक निघते दारी
यातना होती खूप मजला,
गजमुखा तुझ्या रे जाण्याने
मंडप ही सुना सुना बसला….१६

पुढील वर्षी ये लवकरी
लंबोदरा वचन मी घेतो ,
गावाला जायची झाली वेळ
विसर्जनास श्री मुर्ती नेतो…..१७

क्षण हा आला विसर्जनाचा
येतो भरून आमचा ऊर,
गजानन गेले हो गावाला
अश्रूंचा नयनी दाटे पूर …१८

तुझ्याविना हे अंगण सुने
आनंदाचा जाईल हा क्षण,
गणपती बाप्पा मोरयाच्या
घोषात कधी नाचेल मन…..१९

आशिर्वाद देण्यास भक्तांना
लवकर तू परतुनी यावे,
तुझ्या भेटीला मन आतूर
करी विनवणी मनोभावे…..२०

गणपती गेले गावाला ,
चैन पडेना आम्हाला .

सौ . सुवर्णा पवार , इचलकरंजी
मो .नं. ९९६०३०१४०८

माझा बाप्पा By सौ.सुवर्णा पवार| Best ganpati gele gavala in marathi 2023

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

माझा बाप्पा By सौ.सुवर्णा पवार| Best ganpati gele gavala in marathi 2023

mazablog

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

2 months ago

प्रेमाची हमी | best marathi love poem for gf in 2024

अरविंद कुळकर्णी यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem for gf in 2024 विषयावर रजिस्टर…

2 months ago

ऑनलाईन प्रेम | best Fb love poem in marathi in 2024

सौ. संघमित्रा सोरटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Fb love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

फेक आयडी | Best Facebook love poem in marathi in 2024

प्रवीण मारुती कसबे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Facebook love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

खरं की खोटं | Best Social Media love poem in marathi in 2024

सौ. रेखा पिंगळे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Social Media love poem in marathi in 2024…

2 months ago

प्रेम | Best love poem marathi online pdf in 2024

शालिनी सदाशिव पवार यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem marathi online pdf in 2024 विषयावर…

2 months ago