सौ. सुनिता जयदीप पाटील आणि विद्या प्रधान यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत gauri ganpati kavita lyrics in marathi विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.
काव्य बंध समूह आयोजित,
काव्य लेखन स्पर्धा
दिनांक :-7/9/ 2023
काव्यप्रकार :- मोदकाव्य
विषय :- गौराई आली घरा
शीर्षक:- गौरीचे स्वागत
सण
आहे मोठा
गौरी गणपती
भारतीयांच्या हृदयात !!1!!
पाट
मांडूनिया
गौरीची आरास
करूया घराघरात !!2!!
वाण
माहेराच
सौभाग्याच लेन
हळदी आणि कुंकूच !!3!!
ओटी
गौराईची
भरतात नारी
परंपरा असे भारी !!4!!
हार
घालुनिया
करूया आरास
दारी रांगोळी काढून !!5!!
नथ
गौराईस
नाकात शोभते
साडीत रूप खुलते !!6!!
प्रिय
माझा सण
गौराई सोहळा
नाचते उत्साही मन !!7!!
गौरी
आल्या घरी
खूप दिवसांनी
सोनियाच्या पावलांनी !!8!!
करा
आनंदात
गौरीचे स्वागत
सुख नांदेल घरात !!9!!
✍️सौ.सुनीता जयदीप पाटील
कल्याण मुंबई
काव्यबंध समुह
काव्य लतिका आयोजित काव्यलेखन स्पर्धा
स्पर्धेसाठी स्वरचित कविता
७/९/२०२३
विषय:- गौराई आली घरा
शीर्षक:- औक्षण
काव्यप्रकार:- मोदकाव्य
गौरी
आली घरा
कुंकू पाऊलाने
सण सोहळा साजरा १
छान
स्वागताने
करूया औक्षण
आनंदात उत्साहाने २
चांदी
तबकात
साहित्य पूजेचे
नक्षी रांगोळी दारात ३
विधी
गुरूजींनी
सांगितले छान
गौरी पूजनाच्या दिनी. ४
फूले
गंधाळली
हिरव्या पत्रींनी
गौरी छान सजवली ५
वस्त्र
कापसाचे
गळ्यात घातले
धूप दिप सूवासाचे ६
पूजा
सजे छान
तेरड्याची फूले
वाहूनिया देऊ मान ७
मन
आनंदित
घरात प्रसन्न
भजन सूर संगीत. ८
ओटी
पदरात
मागणे मागूया
पाठी राही संकटात ९
प्रार्थू
वंदूनिया
ओवाळू आरती
दोन्ही कर जोडूनिया. १०
विद्या प्रधान
ठाणे
गौरीचे स्वागत आणि औक्षण | 2 Best gauri ganpati kavita lyrics in marathi
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.
आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…
श्री विजय तानाजी पाटील यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem on rain in marathi in…
श्री.मच्छिंद्र रत्नाकर झुरंगे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत cute love poem in marathi in 2024 विषयावर…
जयद्रथ आखाडे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem for her in marathi in 2024 विषयावर…
प्रतिक्षा परमेश्वर थोटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love athavan poem in marathi in 2024 विषयावर…
अनंत वा तेलंग यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत funny love poem in marathi in 2024 विषयावर…