Categories: Kavita In Marathi

आली गौराई आणि तीन दिवसांची पाहुनी | 2 Best gauri ganpati wishes in marathi

गोविंद शिवराम कुलकर्णी आणि रवी आटे यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत gauri ganpati wishes in marathi विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

आली गौराई | gauri ganpati wishes in marathi

स्पर्धेसाठी
काव्य बंध समुह आयोजित
साप्ताहिक चित्र चारोळी स्पर्धा
दिनांक. ७/९/२०२३
विषय : गौराई आली घरा
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
शीर्षक: – आली गौराई – स्वरचित
दशाक्षरी
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

गणपती येऊन बसले
घर प्रसन्नतेने भारले
गौराईची वाट पाहता
स्वागता साठी मोद दाटले….१

तुळसी उभ्या वृंदावनात
गौराई आल्यात अंगणात
तुळस मंजिरी अतोनात
दिसती सुंदर प्रांगणात ….२

शुचिष्मंत वातावरणात
माहेर वाशिणीचा आवास
गणेशाला भेटण्या उत्सुक
गौराई येतात सप्तमीस…३

उभ्याच्या,खड्याच्या, तेरड्याच्या
विवीध प्रकारच्या गौराई
सोन पावलांनी येती घरा
स्वागतास येती ताई आई…४

गौराईच्या आवाहना साठी
नवीन साड्या नेसवतात
दाग दागिन्यांनी सजवती
गौराईला विवीध फुलात….५

कनिष्ठा जेष्ठा येती घरा
गोड लाडूनी पोट जमवा
गौराईची आरती करता
तांदुळानीच ओटी भरवा…..६

ज्येष्ठा कनिष्ठेच्या गौराईला
अष्टमीच्या दिनी पुजतात
पुरणपोळीच्या नैवेद्याने
सुवासिनीला गौरवितात…७

अदुःख नवमीच्या दिवशी
दावे कानवला दहीभात
माहेरवाशी माहेराहून
मानपान घेत निघतात…८

गौराईला निरोप देताना
सर्वजण दुखी भासतात
पुनरागमनाय च नमो
जेष्ठा कनिष्ठा बोळवतात…९
(शुचिष्मंत – मंगलमय)

(C)(R)
गोविंद शिवराम कुलकर्णी
नौपाडा ठाणे

आली गौराई आणि तीन दिवसांची पाहुनी | 2 Best gauri ganpati wishes in marathi

तीन दिवसांची पाहुनी | gauri ganpati wishes in marathi

काव्यबंध समूह आयोजित
काव्य लतिका स्पर्धा
विषय-गौराई आली घरा
शीर्षक-‘तीन दिवसांची पाहुणी’

सजावट केली रंगबिरंगी मांडला रुपेरी सोनेरी आरास
गौरा आईच्या आगमनाचा चोहीकडे सुवासच सुवास

माहेरी येताच करताना माहेरवाशीनेचे मनोभावे पूजन
सृष्टीच्या कणाकणातून घडते कला कौशल्याचे सृजन

नागपंचमी सुखावून गेली झिम्मा झिम्मा खेळीत होतो
गौरा मातेला आर्त होऊन नखशिखांत विनवित होतो

घरी दारी चोहीकडे दाटून आले कसे आनंदाला उधाण
घरात वैभव सुख शांतीचे माई सदैव देतच असते दान

देव्हाऱ्यात कापराच्या जळती वाती नैवेद्य गोडधोडाचा
आईचा करतो सांभाळ जसा तळ हातावरील फोडाचा

गौराई आली घरा गुणदोषांची मनोभावे समीक्षा करू
फुलवू फुलबाग मनाची मगच भवानीची प्रतीक्षा करू

सारा आसमंत सारी दुनिया व्यापली असे शिवभक्तीने
जागृत करा आपल्या ठायी तिचा अल्पांश तरी भक्तीने

तू पण दे तुझा प्रसाद मिळो आशीर्वाद महादेवाचाही
मग या माया नगरीत कोणालाही खेद नसे कशाचाही

विश्वाचा जरी केंद्र गणपती गौराई लाडकी परिघाहुनी
आली आली आपली पार्वताई तीन दिवसांची पाहुणी

रवी आटे
सानपाडा
-नवी मुंबई

gauri ganpati wishes in marathi

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Ashutosh R

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

2 months ago

आभासी प्रेम | Best love poem on rain in marathi in 2024

श्री विजय तानाजी पाटील यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem on rain in marathi in…

2 months ago

दिखाव्याला भुलला | Best cute love poem in marathi in 2024

श्री.मच्छिंद्र रत्नाकर झुरंगे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत cute love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

ऑनलाईन प्रेम | best love poem for her in marathi in 2024

जयद्रथ आखाडे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem for her in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

खरचं हे प्रेम आहे का | best love athavan poem in marathi in 2024

प्रतिक्षा परमेश्वर थोटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love athavan poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

आभासी ओढ | Best funny love poem in marathi in 2024

अनंत वा तेलंग यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत funny love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago