Categories: Kavita In Marathi

दुपारची सावली आणि आयुष्य | 2 Best heart touching marathi kavita on life

प्रा. शरदचंद्र काकडेदेशमुख आणि अनुया काळे यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत heart touching marathi kavita on life विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

heart touching marathi kavita on life

काव्यबंध समूह आयोजित
काव्यलतिका साप्ताहिक स्पर्धा
रविवार दिनांक..१ /१० /२०२३ विषय:- आयुष्य

दुपारची सावली | heart touching marathi kavita on life

परोपकार ठेवा सदैव हृदयी
भावना आपुलकीची माऊली
निसर्गाचेच हे शाश्वत सत्य
आयुष्य म्हणजे दुपारची सावली ।।१।।

कशाला करायचा आटापिटा
नसतो देह सुद्धा रे आपला
नाही कशाचीच मालकी आपली
चराचरात परमात्माच व्यापला ।।२।।

कशास करावे माझे माझे
दुःख का ओढून घ्यावे पाठी
काय लागते अधिक तुजला
सुखी आनंदी आयुष्यासाठी ।।३।।

येताना तर एकटाच आलास
आता जातानाही तू एकटा
आंदन दिला देह परमात्म्याने,
कर मानवा प्रपंच नेटका ।।४।।

कोण भाऊ अन कसली बहीण
हे तर पोहतील फक्त काठावरती
येता तुजवरी महा बाका प्रसंग
क्षणात दोन्ही हात वर करती ।।५।।

कशाला धावतो मागे सुखाच्या
दे सोडून मोह माया आसक्ती
पुसावेस अश्रू दीनदुबळ्यांचे
हृदयी असू देत सेवा भक्ती ।।६।।

ध्यानी घे रे संत मुखाचे वाक्य
अस्तेय आणि अपरिग्रह महान
करता सत्कर्म आणि परोपकार
भागेल सुखी आयुष्याची तहान ।।७।।

,प्रा.शरदचंद्र काकडेदेशमुख
पुरंदर जि.पुणें ९४२२३०४०५५

heart touching marathi kavita on life

काव्यबंध समूह आयोजित
काव्यलतिका साप्ताहिक स्पर्धा
रविवार दि.1/10/2023
विषय :आयुष्य

आयुष्य | heart touching marathi kavita on life

चकवते झुकवते
नमवते रमवते
हरवते धडे पुन्हा पुन्हा गिरवते
रडवते घडवते निकोप वाढवते
…आयुष्य सुंदर असते !

कर्माचे वर्तुळ पूर्ण होते
या हाताचे त्या हाताला भोगणे येते
काळाच्या हाती वेसण जिंदगीची
मृत्यू या शाश्वत सत्यास वेळ बेसावध ठेवते
… तरी आयुष्य सुंदर असते

सृष्टीतील य:कश्‍चित जीव
निसर्गचक्रात आला गेला
केवळ जगला आणि संपला?
स्वतःसोबत चार आयुष्ये
समृद्धीने धन्य जाहला
…. तर आयुष्य सुंदर असते!

मानवतेचे मर्म कळावे
मीपणाचे वस्त्र गळावे
वळणावर आपसूक वळावे
अनपेक्षित ईप्सित मिळावे
…म्हणून आयुष्य सुंदर असते!

भगवंताच्या कृपाप्रसादे
शक्तिबुद्धी सन्मती लाभू दे
उभा जन्म सार्थक होऊ दे
सुखदुःखाच्या धाग्यांचे
वस्त्र कधी ना जीर्ण होऊ दे
…तर आयुष्य सुंदर असते!

ते अनुभवांची खाण असते
ओटीतले दान असते
नियतीचे वरदान असते!
बिलंदर मस्तकलंदर
जगजेता सिकंदर असते !
खरंच आयुष्य खूप सुंदर असते!!

अनुया काळे
मुरबाड जि. ठाणे

heart touching marathi kavita on life

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Ashutosh R

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

1 month ago

आभासी प्रेम | Best love poem on rain in marathi in 2024

श्री विजय तानाजी पाटील यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem on rain in marathi in…

1 month ago

दिखाव्याला भुलला | Best cute love poem in marathi in 2024

श्री.मच्छिंद्र रत्नाकर झुरंगे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत cute love poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

ऑनलाईन प्रेम | best love poem for her in marathi in 2024

जयद्रथ आखाडे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem for her in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

खरचं हे प्रेम आहे का | best love athavan poem in marathi in 2024

प्रतिक्षा परमेश्वर थोटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love athavan poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

आभासी ओढ | Best funny love poem in marathi in 2024

अनंत वा तेलंग यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत funny love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago