Categories: Kavita In Marathi

सुख आयुष्याचे आणि सुखी आयुष्य | 2 Best kavita on life in marathi

Ashu C P आणि अरविंद कुळकर्णी यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत kavita on life in marathi विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

kavita on life in marathi

काव्यबंध समूह आयोजित कविता स्पर्धा
विषय:- आयुष्य

सुख आयुष्याचे | kavita on life in marathi

मी पाहिले रात्रीस
एक सुंदर स्वप्न
डोळ्यात तिच्या चमक
अन् गळ्यात होते रत्न

मी छोट्याश्या झोपळीत राहणारा
अन् चटणी भाकर खाणारा
ती मोठ्या महालातील राजकुमारी
अन् साजुक तूप खाणारी

मला झोपळीत बघून तिनं विचारलं
सांग मला
छोट्याशा झोपळीत राहून
चटणी भाकर खाऊन
कसं तुझ्या चेहऱ्यावरचं हसणं
अन् मी महालात राहून
साजूक तूप खाऊन
आमचं रोजचंच रडणं
मलाही जगता येईल का?
तुझ्यासारखं सुखात जगणं

मी तिच्याकडे बघून म्हटलो
माणसाच्या तीनच गरजा
अन्न वस्त्र निवारं
यातच येतं आयुष्य सारं

झोप हवी असते
सुखात आयुष्य जगण्यासाठी
अन् काम करावं लागतं
गरजा पुर्ण करण्यासाठी

थकलेल्या भागलेल्या माणसाला
रात्री भांडायला वेळ मिळत नाही
अन् धन संपत्ती चोरी होईल
याची भीती आम्हाला लागत नाही
तुम्हाला याच भीती पोटी
शांत झोप लागत नाही
अन् म्हणून तुम्हाला
आयुष्याचं सुख लाभत नाही…

✍️आशु छाया प्रमोद (रावण)

kavita on life in marathi

काव्यबंध समूह आयोजित रविवारीय काव्यलतिका काव्य ‘स्पर्धेसाठी’
दि.१/१०/ २०२३ रविवार

विषय – आयुष्य

सुखी आयुष्य | kavita on life in marathi

काव्यप्रकार – अष्टाक्षरी
शब्दसंख्या – १२६

सुखी आयुष्य म्हणजे
आंतरीक समाधान
वरवर दाखवून
कसे दिसणार छान …(१)

सुखी आयुष्याचे कोडे
सोपे नाही सोडविणे
काहीतरी विधायक
आयुष्यात घडविणे …(२)

सुख आणि दुःख खरे
आहे हे मानण्यावर
दृष्टी ही सकारात्मक
खास उपाय त्यावर …(३)

आयुष्यात सुख किती
नाही होणार मोजणी
समाधान मानण्यात
खरी सुखाची पेरणी …(४)

खऱ्या सुखाची सावली
सापडते सर्वांकडे
लक्ष तुमचे असावे
जरा इकडे तिकडे …(५)

कष्ट करण्या आयुष्य
अशी मनाची तयारी
उरणार न वेदना
अंगी येईल उभारी …(६)

फक्त विचार करून
नका घालवू आयुष्य
काही कृती न केल्यास
अंधारात हे भविष्य …(७)

व्यस्त राहा आयुष्यात
दाखवावे सप्तरंग
नको कशाचा कंटाळा
हवे उत्साही तरंग …(८)

मानवाचे हे जगणे
काही क्षणाचे आयुष्य
हाती काहीच नसता
शोधा आपले भविष्य …(९)

खरी संजीवनी हाती
तीच उमेद नित्याची
पण प्रत्येक क्षणाला
बाजू घ्यायची सत्याची …(१०)

रमणीय मनोहर
अशी सभोवार सृष्टी
मात्र निरीक्षणासाठी
हवी नित्य नवी दृष्टी …(११)

अरविंद कुळकर्णी
मलकापूर
जिल्हा- बुलडाणा

kavita on life in marathi

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Ashutosh R

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

2 months ago

आभासी प्रेम | Best love poem on rain in marathi in 2024

श्री विजय तानाजी पाटील यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem on rain in marathi in…

2 months ago

दिखाव्याला भुलला | Best cute love poem in marathi in 2024

श्री.मच्छिंद्र रत्नाकर झुरंगे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत cute love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

ऑनलाईन प्रेम | best love poem for her in marathi in 2024

जयद्रथ आखाडे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem for her in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

खरचं हे प्रेम आहे का | best love athavan poem in marathi in 2024

प्रतिक्षा परमेश्वर थोटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love athavan poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

आभासी ओढ | Best funny love poem in marathi in 2024

अनंत वा तेलंग यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत funny love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago