Categories: Kavita In Marathi

प्रेम | Best love poem marathi online pdf in 2024

शालिनी सदाशिव पवार यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem marathi online pdf in 2024 विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

love poem marathi online pdf in 2024

काव्यबंध समूह आयोजित
रविवारीय काव्य स्पर्धा
दिनांक – १०/३/२०२४
विषय – ऑनलाइन प्रेम

प्रेम | love poem marathi online pdf in 2024

केले प्रेम राधेने
होवूनी बावरी कृष्णावर
केले प्रेम मीराने
भक्ती रसात गोविंदावर

केले प्रेम हरीने
आपल्या भक्तावर
भक्ताने केले प्रेम
आपल्या सवळ्या विठूवर

पत्नी करते प्रेम
पतीवर एकनिष्ठ ते
पती करतो प्रेम
खरे रामनिष्ठ ते

हे ही प्रेम होते
ऑनलाइन अंतर्मनाचे
नव्हते डिजिटल
सोंग करण्याचे

आला नवा जमाना
प्रेम जमते मोबाईलवर
प्रथम फोटो पाहून
मोबाईलच्या स्क्रीनवर

love poem marathi online pdf in 2024

रंगवलेला चेहरा
केस सोडलेले
उभी खुणवत
कपडे आखुडलेले

भुलली ती ही
पाहून युवकाला
सांगावे काय
जबरदस्त सजला

हाय हॅलो केले
प्रेम ते झाले
त्यात कसले नवल
नव्या जमानात बसले

घेतल्या आणा भाका
ऑनलाइन सगळं
भेटायचं ठरलं
तर रूपच वेगळं

आले समोरासमोर
तोंडात घातली बोट
केलं होतं काय
सारंच झालं खोटं

प्रेम अडीच अक्षर
नका भुलू रंगा
लावा जीव जीवाला
मुजवा मनाच्या भेगा

खरंच प्रेम ऑनलाईन
जोडा अंतर्मनाची तार
करा जर हलका
भावनांचा भार

भाषा प्रेमाची
निराळी प्रत्येकाची
घ्यावी जाणून
निर्मळ मनाची

प्रेम भाव
फुलतो मनी
रुजतो हृदयी
ऑनलाइन अंतर्मनी

शालिनी सदाशिव पवार प्राचार्या संकपाळ मॅडम
म्हापसा गोवा.

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Ashutosh R

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

2 months ago

आभासी प्रेम | Best love poem on rain in marathi in 2024

श्री विजय तानाजी पाटील यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem on rain in marathi in…

2 months ago

दिखाव्याला भुलला | Best cute love poem in marathi in 2024

श्री.मच्छिंद्र रत्नाकर झुरंगे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत cute love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

ऑनलाईन प्रेम | best love poem for her in marathi in 2024

जयद्रथ आखाडे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem for her in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

खरचं हे प्रेम आहे का | best love athavan poem in marathi in 2024

प्रतिक्षा परमेश्वर थोटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love athavan poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

आभासी ओढ | Best funny love poem in marathi in 2024

अनंत वा तेलंग यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत funny love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago