Kavita In Marathi

खरं की खोटं | Best Social Media love poem in marathi in 2024

सौ. रेखा पिंगळे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Social Media love poem in marathi in 2024 विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

Social Media love poem in marathi in 2024

काव्यबंध समुह आयोजित,
काव्यलतिका काव्यस्पर्धा
दि.१०/३/२४
विषय..आँनलाईन प्रेम

खरं की खोटं | Social Media love poem in marathi in 2024

प्रेमाची आज व्याख्याच बदलली
सारच कसं झालं आँनलाईन
नवीन पिढी म्हणते हसून
ओके इट्स फाईन..१

किती खरे किती खोटे
कळत नाही सारे वरवर
जुने ते सोने कळत असते मनाला
पण वळत नाही असं असत खरतरं..२

फ्रेंड रिक्वेस्ट येता त्याची
पोरगी लगेच हुरळून जाते
फोटो त्याचा फेसबुकवर बघून
प्रेमगीत गात फिरते…३

त्याचेही आँनलाईन प्रेम सेमच असते
पोरगी गोरी की काळी कळत नसते…४

आँनलाईन प्रेमात खरतर फसवणूक जास्त
फाँरवर्ड झाली तरुणाई
काही फारच बिनधास्त..५

स्मार्टफोन चा गैरवापर
कटाक्षाने टाळावा
पुढे होणारा अनर्थ
विवेकाने जाणावा…६

प्रत्येक वेळी आँनलाईन प्रेमात
नसते जरी फसवणूक
प्राधान्य द्यावे स्वभावाला
त्यात होऊ नये चूक…७

फोनचा वापर गरजेपुरता करावा
वडिलधाऱ्यांचा सल्ला
आचरणात आणावा..८

जपून टाकावी पाऊले
कर्तृत्व मुलाचे बघावे
मुलानेही गुणवान
मुलीला प्राधान्य द्यावे…९

प्रेम म्हणजे प्रेम असत
असत़ जरी तुमच़ आमच़ सेम
विचार करावा सारासार
नाही तर होईल बर का गेम…१०

सो.रेखा पिंगळे
लाखनी

Social Media love poem in marathi in 2024

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Ashutosh R

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

2 months ago

आभासी प्रेम | Best love poem on rain in marathi in 2024

श्री विजय तानाजी पाटील यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem on rain in marathi in…

2 months ago

दिखाव्याला भुलला | Best cute love poem in marathi in 2024

श्री.मच्छिंद्र रत्नाकर झुरंगे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत cute love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

ऑनलाईन प्रेम | best love poem for her in marathi in 2024

जयद्रथ आखाडे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem for her in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

खरचं हे प्रेम आहे का | best love athavan poem in marathi in 2024

प्रतिक्षा परमेश्वर थोटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love athavan poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

आभासी ओढ | Best funny love poem in marathi in 2024

अनंत वा तेलंग यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत funny love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago