Kavita In Marathi

दानशूर कर्ण | Best Marathi Kavita Maharathi in 2024

अब्दुल करीम शमशोद्दीन सय्यद यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Marathi Kavita Maharathi in 2024 विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

Marathi Kavita Maharathi in 2024

काव्यतालिका
रविवारीय काव्यस्पर्धा

दिनांक : ०३|०३|२०२४

दानशूर कर्ण | Marathi Kavita Maharathi in 2024

अखंड महाभारत आहे
मानव जातीस पुर्ण शिकवण
कोणत्याही परिस्थितीत द्यावे
मानवाने पुर्ण समर्पण…. १

एक एक पात्र महाभारताचे
मोठी शिकवण देऊन जाते
आधी करावे कर्तव्य आपले
मग संभाळा खुशाल नाते… २

कौरव आणि पांडव भलेही
बंधू होते एकमेकांचे सख्खे
पण कौरव देत राहीले
पांडवांना भरभरून दु खे.. ३

भले मला आवडते बाजू
पांडवांची न्यायिक अन् खरी
पण कौरवांबरोबर एक
रत्न होते एक नंबरी. ४

कौरव होते दुष्ट खरे
पण काही तयांचे कैवारी
शेकडो योध्यावर सुध्दा
पडत होते लई भारी. ५

दुर्योधन आणि कर्ण यांची
मैत्री होती खुप घनिष्ठ
म्हणून कर्णाने साथ दिली
जरी कौरव होते दुष्ट… ६

मैत्री सारखे नाते नसते
दाखवून देत होता कर्ण
कौरवांच्या बाजूने उभे राहून
दाखवी श्रेष्ठ मैत्रीचा वर्ण… ७

महाभारतात सर्वशक्तिमान
योध्दा फक्त कर्ण होता
अर्जुनाशी दोन हात करून
स्वभाव तयाचा दानधर्म होता. ८

कुंती आणि सूर्याचा पुत्र, कर्ण
शर्थीने होता जोरात लढत
हिंमत नव्हती कुणा मध्येही
समोर कर्णाच्या आडवे पडत.. ९

जोवर कवच कुंडले आहेत
कर्ण अमर कृष्णास समजले
दान मागे इंद्र कर्णास…
देऊन कुंडले मरण उमजले… १०

तरी दान देऊनही कर्ण
जगी या दानी सारथी झाला
युध्द जिंकले पांडवांनी पण
कर्ण मात्र महारथी झाला… ११

महाभारत कौरव पांडवांचे
कर्णाने कमावले दानी नाव
अर्जुन भलेही शूरवीर होता
कर्ण खाऊन गेला भाव… १२

अब्दुल करीम शमशोद्दीन सय्यद पंढरपूर
7038313235

Marathi Kavita Maharathi in 2024

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Ashutosh R

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

2 months ago

आभासी प्रेम | Best love poem on rain in marathi in 2024

श्री विजय तानाजी पाटील यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem on rain in marathi in…

2 months ago

दिखाव्याला भुलला | Best cute love poem in marathi in 2024

श्री.मच्छिंद्र रत्नाकर झुरंगे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत cute love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

ऑनलाईन प्रेम | best love poem for her in marathi in 2024

जयद्रथ आखाडे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem for her in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

खरचं हे प्रेम आहे का | best love athavan poem in marathi in 2024

प्रतिक्षा परमेश्वर थोटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love athavan poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

आभासी ओढ | Best funny love poem in marathi in 2024

अनंत वा तेलंग यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत funny love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago