Categories: Kavita In Marathi

Navra Bayko Nate In Marathi | नवरा बायको नाते सांगणारी सुंदर कविता

Navra Bayko Nate Kavita In Marathi | नवरा बायको नाते सांगणारी सुंदर कविता

नवरा बायकोचं नातं जणू, टॉम अँड जेरीचं आहे….

कितीही भांडलं तरी शेवटी, एकाच ताटात जेवायचं आहे….

भांड्याला भांडा लागतो तसा, त्यांच्यातही कुरबुर अपेक्षित आहे….

रुसनं फुगनं झालं की लगेच, एकमेकांना मनवायचं आहे….

आणि एकमेकांना साथ देत, सात जन्माची सप्तपदी चालायचं आहे…..

सप्तपदी चालत असतांना, कित्येक संकटांना सामोरे जावे लागेल….

एकमेकांच्या मदतीशिवाय, संकटांना सामोरे जाणे कसे जमेल….

नवरा बायकोचं नातं जणू, गाड्याच्या दोन चाकांप्रमाने काही आहे…

एका चाकाने वाट सोडली, तर दुसऱ्या चाकाची शास्वती नाही आहे….

Navra Bayko Nate Kavita In Marathi | नवरा बायको नाते सांगणारी सुंदर कविता

नवरा रागावला तर, बायकोने समजून घ्यावं….

बायको रुसली तर, नवऱ्याने मनवून घ्यावं….

आणि संसाराच्या या गाड्याला, असच चालवून न्यावं….

दिवसभर बायकोचे काम, तीला सरत नाही

स्वयंपाकापासून तिला, वेळ कधी मिळत नाही

रोज च कामाला लागलेली असते, म्हणून नवऱ्याने ही थोडं समजून घ्यावं

आठवड्यातून एक दिवस सुट्टी घेऊन, तिला ही बाहेर खायला घेऊन जावं

आणि संसाराच्या गाड्याला, असच चालवून न्यावं….

नवरा दिवसभर काम करून, पैसे कमविण्यासाठी कष्ट करून

Navra Bayko Nate Kavita In Marathi | नवरा बायको नाते सांगणारी सुंदर कविता

थकून भागून घरी येते, म्हणून बायकोने ही थोडं समजून घ्यावं

त्याला पाण्यासाठी विचारून, दोन गोष्टी प्रेमाच्याही बोलून घ्यावं

आणि संसाराच्या गाड्याला, असच चालवून न्यावं….

कधी बायकोने फिरायला जाऊ म्हटलं, तर तिला तू कधी नाही म्हणू नको

तिच्या इच्छा आकांक्षांना कधी, धुळीला मिळू देवू नको

दिवसभर एकच ठिकाणी राहून राहून, तिलाही कोंडल्यासारखं वाटतं

म्हणून तिला कुठं तरी, फिरायला जावसं वाटतं

Navra Bayko Nate Kavita In Marathi | नवरा बायको नाते सांगणारी सुंदर कविता

म्हणून नवऱ्यानेही तिला समजून घ्यावं….

आणि तिला ही कुठं तरी फिरायला घेऊन जावं…..

ती ही काटकसरीने घर चालवून, एक एक पैसे वाचवित असते

तुझ्या सोबतच आपल्या, मुलाबाळांचा सांभाळ करीत असते

कारण तिला तुझ्याही कष्टाची जाणीव असते

एकाच ठिकाणी काम करून, तुलाही कोंडल्यासारखं वाटत असेल

म्हणून तुझ्यासाठीही ती फिरायला जाऊ म्हणते,

म्हणून तू ही त्रागा न करता, तिला ही समजून घ्यावं….

परदेशी जायची एवढी हाऊस नाही तिला, जवळच्या हिल स्टेशन लाच घेऊन जावं

आणि आणि संसाराच्या गाड्याला, असच चालवून न्यावं….

Navra Bayko Nate Kavita In Marathi | नवरा बायको नाते सांगणारी सुंदर कविता

कवी आशु छाया प्रमोद (रावण)

बाप कविता | माझा बाप | Baap Kavita Marathi

वाचण्यासाठी क्लिक करा>>>>.रागावलेल्या आपल्या माणसाला मानवाण्यासाठी कविता >>>>.

भीमसेनी कपूर कशासाठी वापरतात ?

mazablog

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

1 month ago

आभासी प्रेम | Best love poem on rain in marathi in 2024

श्री विजय तानाजी पाटील यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem on rain in marathi in…

1 month ago

दिखाव्याला भुलला | Best cute love poem in marathi in 2024

श्री.मच्छिंद्र रत्नाकर झुरंगे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत cute love poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

ऑनलाईन प्रेम | best love poem for her in marathi in 2024

जयद्रथ आखाडे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem for her in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

खरचं हे प्रेम आहे का | best love athavan poem in marathi in 2024

प्रतिक्षा परमेश्वर थोटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love athavan poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

आभासी ओढ | Best funny love poem in marathi in 2024

अनंत वा तेलंग यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत funny love poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago