Kavita In Marathi

बिनधास्त कर | best Online Love Poem Marathi in 2024

भक्ती केंजळे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Online Love Poem Marathi in 2024 विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

Online Love Poem Marathi in 2024

काव्यबंध समूह आयोजित उपक्रम
विषय -ऑनलाइन प्रेम
दिनांक- 10 मार्च 2024

बिनधास्त कर | Online Love Poem Marathi in 2024

बदलली प्रेमाची भाषा
आता आहे डिजिटल चा जमाना
प्रेम करूया खुल्लम खुल्ला
या मंत्राचा भरुया रकाना

लाईनीत माझ्या असंख्य प्रेमिका
एकाच वेळी साधूया निशान
डिजिटल युगाने खरंच केली क्रांती
म्हणूनच करतो मी त्याला नमन

तरुणाई करते ऑनलाइन प्रेम
कोणीच कोणाला
दिसत नाही समोरासमोर
तरीही हजर सगळे सवाल जवाबाला

सोशल मीडियावर तुफान कल्लोळ
पोस्टर प्रेमाला येतो उत
गर्दीत साऱ्या मिसळूया
प्रेमाला घालूया पाणी नी खत

इथे नाही वयाचे बंधन
फक्त येऊ द्या मनात प्रेम
एकमेकांना मग जपतो नित्य
मनात सगळ्यांच्या फक्त फोटो फ्रेम

हजारोंच्या गर्दीत तुम्ही मिसळता
परस्पर परिचय नसला तरीही
तुम्ही सहज आपले होता
म्हणूनच याला म्हणतात ऑनलाइन सही

इथे सगळं सोपं होतं
मनात कडवट भावना असली तरी
मित्र नातीगोती सगे सोयरे
एकमेकांच्या मनातल्या भावनांना वरी

ऑनलाइन प्रेम असले तरीही
मनाने मने जुळली जातात
इथे दिसण्याला बंधने येत नाही
फक्त विचार जुळावे लागतात

विचारआचार एक झाले की
गरीब श्रीमंताची दरी दूर होते
धर्म जातिभेदही पाळले जात नाही
इथे फक्त मनांची भाषा पाळली जाते

मला तर ऑनलाईन प्रेम खूप आवडले
इथे डोळ्यात रोखून बघितले जात नाही
पण मनात मात्र रोखून बघितले जाते
आणि कसलीच परीक्षा घेतली जात नाही…

भक्ती केंजळे
करंजे पुणे

Online Love Poem Marathi in 2024

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Ashutosh R

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

2 months ago

आभासी प्रेम | Best love poem on rain in marathi in 2024

श्री विजय तानाजी पाटील यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem on rain in marathi in…

2 months ago

दिखाव्याला भुलला | Best cute love poem in marathi in 2024

श्री.मच्छिंद्र रत्नाकर झुरंगे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत cute love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

ऑनलाईन प्रेम | best love poem for her in marathi in 2024

जयद्रथ आखाडे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem for her in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

खरचं हे प्रेम आहे का | best love athavan poem in marathi in 2024

प्रतिक्षा परमेश्वर थोटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love athavan poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

आभासी ओढ | Best funny love poem in marathi in 2024

अनंत वा तेलंग यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत funny love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago