Categories: लेख

अजिंठा लेणी भारताच्या समृद्धतेच प्रतिक | Ajintha Leni Information in Marathi Best 2023

भारतातील ऐतिहासिक पर्यटन स्थळ म्हणून Ajintha Leni Information in Marathi पाहूया. २९ लेण्या बनवण्यसाठी गेली ६०० वर्षे वाचा काय आहे रहस्य.

Ajintha Leni Information in Marathi

भारतीय संस्कृतीमध्ये बौद्ध धर्माचा वारसा पुढे चालवणारी ऐतिहासिक कालखंडाची पार्श्वभूमी लाभलेली अजिंठा येथील लेणी. भारतामध्ये अतिशय सुंदर आणि पर्यटकांचे मन जिंकून घेणार हे ठिकाण. अजिंठा हे आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यटक स्थळ म्हणून देखील ओळखल्या जाते. आजूबाजूला असलेले घनदाट जंगल ही या लेणीची शोभा वाढवते. या लेण्यांमधील चित्रांपैकी एका लेण्याच चित्र भारतीय चालनातील 20 रुपयाच्या एका नोटेवर आहे. अजिंठा येथे एकूण 20 लेणी आहेत. या सर्व लेण्या वाघुर नदीच्या आसपास आणि दूरवर पसरलेल्या आहेत. वाघुर नदीच्या पात्रा पासून 15 ते 30 मीटर उंचीवर आहेत. फुट याचा विचार केला तर 40 ते 100 फूट इतका येईल. या लेणीमध्येच काही चैत्रगृहे देखील आहेत. हीनयान कालखंडातील काही लेणीन पैकी 9 व 10 क्रमांकाची लेणी चैत्रगृह म्हणून प्रसिद्ध आहे.

लेणी म्हणजे काय?

लेणी हे डोंगर , दर्या खुर्या ,पर्वत, टेकडी,खडक, यांना आत मध्ये कोरून बनवली जात असतात. लेणी चा उपयोग हे महर्षी संन्यासी हे लोक ,मोठ्या प्रमाणे तपस्येसाठी करत असतात. लेणी चा शोध राजवंशाच्या काळापासून सुरू झाला. राजवंशयांच्या काळात सर्वप्रथम लेणी कोरल्या गेली.

अजिंठा लेणीची माहिती

अजिंठा लेणी ही महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात येते.

अजिंठा लेणीची वैशिष्ट्ये काय?

अजिंठा लेणी चे ऐतिहासिक वैशिष्ट्ये जर जाणून घेतले तर ही लेणी पूर्व दुसरे शतक ते इसवी सन पूर्व चौथे शतक अशा प्रदीर्घकाळात निर्माण झालेल्या एकूण 29 लेण्या या कोरल्या गेल्या. पर्यटकांना सांगायचे झाले असल्यास एकूण 29 लेण्या आहेत पण फक्त 26 लेण्यांना पाहण्याची आणि तिथे जाण्याची परवानगी भारत सरकारने दिली आहे. कारण बाकी असलेल्या चार लेण्या यांचे काम पूर्ण झालेले नसल्यास तिथे जाण्याची किंवा येण्याची कुणालाच परवानगी नाही.

अजिंठा लेणी ही जळगाव पासून 52 किलोमीटर तर औरंगाबाद पासून १०० किलोमीटर दूर अंतरावर येते. ही गौतम बुद्धांचा वारसा जपणारी आणि त्यांच्याबद्दल सखोल माहिती देणारी त्यां चित्राच्या आधारे मानवी जीवनाचे सार्थक जोपासणारी ही लेणी आहे. सर्वांना आवडणारी म्हणजे सर्वाधिक प्रिय लेणी म्हणून १,२,१०, १७,१६ या क्रमांकाच्या लेण्या सर्वाधिक प्रिय आहेत.

अजिंठा लेणीचा शोध कोणी लावला?

ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथ वाघाच्या शिकार करण्यासाठी जात होता ,तेव्हा तो नकळत एका गुफेत गेला तेव्हा 28 एप्रिल 1819 रोजी या लेणी चा शोध लागला. स्मित तिथे गेल्यानंतर दहाव्या क्रमांकाच्या एका लेणीवर त्याने स्वतःचे नाव कोरले ते नाव आजही स्पष्टपणे तिथे जाणाऱ्या पर्यटक लोकांना दिसते.


येथे हनुमानजी दिसतील त्यांच्या पत्नी सोबत | Is Lord Hanuman Married Free Secret Information

Computer Engineering Information In Marathi| कॉम्पुटर इंजिनीरिंग माहिती | Top 10 Colleges, Branches, Salary


रॉबर्ट गिल कोण आहेत ?आणि त्याचा अजिंठा लेणीशी काय संबंध आहे?

हा ब्रिटिश साम्राज्यातील एक महान छायाचित्रकार ,सैन्याधिकारी आणि चित्रकार अशी त्याची इतिहासामध्ये ओळख निर्माण आहे. अजिंठा येथील चित्रशिल्पाचे महत्त्व लक्षात घेऊन इंग्रजांनी त्या लेणीची प्रतिकृती तयार करण्यासाठी 1844 मध्ये या महान चित्रकार आणि छायाचित्रकाराची नेमणूक केली.

अजिंठा लेणी कधी बंद असते?

लेणी बंद राहण्याचा दिवस म्हणजे “सोमवार “बाकी मंगळवार, बुधवार ,गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या कुठल्याही दिवशी तुम्ही लेणी या बघण्यासाठी जाऊ शकता.
लेणी सुरू किंवा पाहण्यासाठी मंगळवार ते रविवार सकाळी नऊ वाजेपासून तर सहा वाजेपर्यंत असते. या वेळेला तुम्ही उत्कृष्ट लेणी पाहण्याचा आनंद घेऊ शकता.

अजिंठालेणी पाहण्यासाठी योग्य वातावरण कोणते?

१)अजिंठा लेणी पाहण्यासाठी सर्वोत्तम वातावरण म्हणजे पावसाळा असतो.

२)पावसाळा सुरू असताना सप्टेंबर ते ऑक्टोबर या काल यामधील तुम्ही लेणी पाहू शकता.

अजिंठा येथील बोधिसत्त्व पद्मपाणि म्हणजे काय? याबद्द्ल संपूर्ण माहिती.

बोधिसत्व बौद्धांच्या अगिनत रूपांपैकी बोधिसत्व पद्मपाणि आणि बोधिसत्व वज्रपाणी या दोघांना नेहमीच माणसाच्या रूपात बौद्ध प्रतिमेजवळ दाखवले जातात. अजिंठा लेणी जेव्हा तुम्ही पाहायला जाल, तेव्हा तिथे असलेल्या प्रत्येक किंवा अधिकाधिक लेणीमध्ये तुम्हाला या दोघांचा समावेश होताना दिसतो.

Author :- मिस. प्रतिक्षा गजानन मांडवकर

mazablog

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

2 months ago

प्रेमाची हमी | best marathi love poem for gf in 2024

अरविंद कुळकर्णी यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem for gf in 2024 विषयावर रजिस्टर…

2 months ago

ऑनलाईन प्रेम | best Fb love poem in marathi in 2024

सौ. संघमित्रा सोरटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Fb love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

फेक आयडी | Best Facebook love poem in marathi in 2024

प्रवीण मारुती कसबे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Facebook love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

खरं की खोटं | Best Social Media love poem in marathi in 2024

सौ. रेखा पिंगळे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Social Media love poem in marathi in 2024…

2 months ago

प्रेम | Best love poem marathi online pdf in 2024

शालिनी सदाशिव पवार यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem marathi online pdf in 2024 विषयावर…

2 months ago