Marathi Ukhane for New Couple – मोठे उखाणे मराठी

मराठी परंपरेनुसार बहुतेक सर्वच जाती धर्मांमध्ये नवीन ठिकाणी पाहुण्यांमध्ये भेटायला गेल्यावर उखाणे घ्यायची परंपरा आहे. नवरा किंवा बायको आपल्या जोडीदाराचे नाव वैशिट्यपूर्ण काव्यात्मक रचनेतून घेतात. काही उखाणे गमतीशीर तर काही बोधपर असतात. अश्याच काही उखाण्यांचा संग्रह खाली दिलेला आहे. जो तुम्हाला अडचणीच्या वेळी नक्कीच उपयोगी पडेल…….Marathi Ukhane – मोठे उखाणे मराठी

नव्या नवरीसाठी उखाणे – Marathi Ukhane

1)पतिव्रतेचे व्रत घेऊन सर्वांशी प्रेमाने वागेन

.. रावांचे नाव घेताना तुम्हा सर्वांचे आशीर्वादच मागेन

2)ताजमहाल बांधायला; कारागीर होते कुशल,

… रावांचे नांव घेते, तुमच्या साठी स्पेशल

3)कृष्णाने पण केला, रुक्मिणीलाच वरीन,

… रावां सोबत जगताना आदर्श संसार करीन.

Marathi Ukhane / मोठे उखाणे मराठी / नव्या नवरीसाठी उखाणे/ उखाणे मराठी नवरीचे दाखवा

4)शुभमंगल झाले अक्षदा पडल्या माथी

.. राव आता मी तुमची सात जन्मासाठी

5)अंगणी होती तुळस, तुळशीला घालत होती पाणी,

आधी होती आई बाबाची तान्ही, आता आहे..रावांची राणी.

6) नील नभाच्या तबकात नक्षत्रांचा हार,

… राव मला आवडतात फार

7) गोऱ्या गोऱ्या हातावर रेखाटली मेहंदी,

…रावांचे नाव घेण्याची वारंवार येवो संधी.

Marathi Ukhane / मोठे उखाणे मराठी / मराठी नवरीचे दाखवा

गृह्प्रवेशाला घ्यायचे उखाणे

1)स्वर्गीय नंदनवनात सोन्याच्या केळी

.. रावांचे नाव घेते गृह्प्रवेशाच्या वेळी

2)तिन्ही लोकात श्रेष्ठ ब्रम्ह, विष्णू, महेश

.. रावांचे नाव घेऊन करते गृहप्रवेश

गृह्प्रवेशाला घ्यायचे उखाणे

3)घरी टाकले पाऊल नववधू बनून

सर्वांच्या भीतीने जीव गेला बावरुन,

…रावांची साथ आणि सासरच्यांचा पाठिंबा पाहून

भीती.. छे केव्हाच गेली पळून!

4)1.. 2… 3… .. रावांचं नाव घेते करा मला फ्री……………

Marathi Ukhane / मोठे उखाणे मराठी

मोठे उखाणे

1)हंड्यावर हंडे सात

त्यावर ठेवली परात

परातीत होते सातू

सातूचा केला भात

भातावर वरण, वरणावर तुपाची धार

तुपासारखं रूप, रूपासारखा जोडा

जोड्यात हलगडी, हलगाडीत बलगडी

बलगडीत पिंजरा, पिंजर्यात रघु

राघूच्या तोंडी उंबर… रावांचं नाव ऐकलंत ना, मग काढा रुपये शंभर..

2)सासरचा गाव चांगला

गावामध्ये बंगला

बंगल्याला खिडकी, खिडकीत द्रोण

द्रोणात तूप, तुपासारखं रूप

रूपासारखा जोडा, चंद्रभागेला पडला वेढा

चंद्रभागेची पाच नाव, नावेत बसावं

आणि.. रावांनी देहू, आळंदी, पंढरपूर फिरवावं

Marathi Ukhane / मोठे उखाणे मराठी

शेती नावावर करून घेताना – आजची वास्तवता

पहिलं प्रेम भाग १ वाचण्या साठी क्लीक करा पहिलं प्रेम भाग १

Click to read- The Power Of Relationships

mazablog

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

2 months ago

प्रेमाची हमी | best marathi love poem for gf in 2024

अरविंद कुळकर्णी यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem for gf in 2024 विषयावर रजिस्टर…

2 months ago

ऑनलाईन प्रेम | best Fb love poem in marathi in 2024

सौ. संघमित्रा सोरटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Fb love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

फेक आयडी | Best Facebook love poem in marathi in 2024

प्रवीण मारुती कसबे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Facebook love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

खरं की खोटं | Best Social Media love poem in marathi in 2024

सौ. रेखा पिंगळे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Social Media love poem in marathi in 2024…

2 months ago

प्रेम | Best love poem marathi online pdf in 2024

शालिनी सदाशिव पवार यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem marathi online pdf in 2024 विषयावर…

2 months ago