Categories: Kavita In Marathi

बाबांवर मराठी कविता | Maze baba marathi kavita for father

बाबांवर मराठी कविता | Maze baba marathi kavita for father | Baba var Kavita | Majhe Baba Kavita

आईची जरी असली वेडी माया

बाबा तुम्ही आहात संपूर्ण कुटुंबाचा पाया

बाबा तुमचे वागणे आहे नारळासारखे

बाहेरून कठिण पण आत स्वच्छ खोब्र्यासारखे

तुम्ही आम्हा सर्वांसाठी राब राब राबतात

जशी दिव्याची वात झिजते तसे जळतात

ढाल बनून तुम्ही उभे आहात दारात

संकट कसे करेल मग हिम्मत यायला घरात

तुमचे प्रेम आहे बाबा कस्तुरी सारखे

दिसत नसले तरी ज्याचा सुगंध दरवळे

तुम्ही काळजी करू नका बाबा तुमच्यासाठी

मोठी झाली की मी होईल आधाराची काठी

बाबांवर मराठी कविता | Maze baba marathi kavita for father | Baba var Kavita | Majhe Baba Kavita

2

रांगत होते मी तुम्ही चालायला शिकवले

थोडसं काही छान केलं की तुम्ही सर्वांना बोलून दाखवले

मला काही कमी पडू नये म्हणून

तुम्ही रोज कामावर घाम गाळतात जाऊन

सगळं काही करतात तुम्ही फक्त माझ्यासाठी

थोडा वेळ काढा कामातून आता तरी स्वतःसाठी

दिवसभर आईशी मी काही ना काही बोलत असते

तुमच्यावर किती प्रेम आहे हे मात्र सांगायचे राहून जाते

थांबून ऐकून घ्या थोडे , आज आता वेळ मिळाला

जगातील सर्वात सुंदर असा देवाने बाबा मला दिला

बाबांवर मराठी कविता | Maze baba marathi kavita for father | Baba var Kavita | Majhe Baba Kavita

3

तुमची सावली सुद्धा माझे अस्तित्व पूर्णत्वास नेते

कोणत्याही धनाने भरणार नाही असा खजिना मला देते

जोपर्यंत तुमचे छत्र माझ्या डोक्यावर असेल

तोपर्यंत मला जगात कोणताच ताप कसा भासेल

कोणी कितीही मोठा झाला तरी आहे तो निरक्षर

जर बाबा या शब्दातील त्याला कळलेच नाही दोन अक्षर

पहिला बा बांधणीचा बनवी कुटुंबास जबाबदार

दुसरा बा बागेचा ज्यात कर्तृत्वाचा दरवळ अपार

बाबांवर मराठी कविता | Maze baba marathi kavita for father | Baba var Kavita | Majhe Baba Kavita

4

हजार दुःख झेलत असता , तरी बाबा तुम्ही अखंड उभे

आधार देऊ तुम्हा की कौतुक करू , हे न मजला कळे

आम्हा गादीवरती निजवूनी , अंथरूण तुमचे का खाली दिसे

कितीही सेवा केली तरीही , या जन्मात नाही हे ऋण फिटे

बाबांवर मराठी कविता | Maze baba marathi kavita for father | Baba var Kavita | Majhe Baba Kavita

5

बाबा म्हणजे त्याग आपल्या असंख्य स्वप्नांचा

अविरत प्रयत्न करून कुटुंबाला सुख देण्याचा

सर्व नात्यांमधून अव्वल समुद्र प्रेमाचा

दुनियादारी मध्ये असे हात निस्वार्थ आधाराचा

6

बाप ही दोनच अक्षरे आहे पण त्यात किती गोडवा

जणू वर्षा ऋतूत मोराने पिसारा फुलवावा आपला

काळजीने माणूस जपतो तळ हातावरील फोड जसा

बाप प्रत्येक क्षणाला माझ्यावर लक्ष ठेवून असतो तसा

बाबांवर मराठी कविता | Maze baba marathi kavita for father | Baba var Kavita | Majhe Baba Kavita

बाप कविता | माझा बाप | Baap Kavita Marathi

वाचण्यासाठी क्लिक करा>>>>.रागावलेल्या आपल्या माणसाला मानवाण्यासाठी कविता >>>>.

भीमसेनी कपूर कशासाठी वापरतात ?

mazablog

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

1 month ago

आभासी प्रेम | Best love poem on rain in marathi in 2024

श्री विजय तानाजी पाटील यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem on rain in marathi in…

1 month ago

दिखाव्याला भुलला | Best cute love poem in marathi in 2024

श्री.मच्छिंद्र रत्नाकर झुरंगे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत cute love poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

ऑनलाईन प्रेम | best love poem for her in marathi in 2024

जयद्रथ आखाडे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem for her in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

खरचं हे प्रेम आहे का | best love athavan poem in marathi in 2024

प्रतिक्षा परमेश्वर थोटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love athavan poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago

आभासी ओढ | Best funny love poem in marathi in 2024

अनंत वा तेलंग यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत funny love poem in marathi in 2024 विषयावर…

1 month ago