पुढच्या वर्षी लवकर या By सौ.भारती गाडगिलवार | Best Anant Chaturdashi Var Kavita 2023

काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी सौ.भारती गाडगिलवार यांची -पुढच्या वर्षी लवकर या – हि कविता -Anant Chaturdashi Var Kavita- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे

पुढच्या वर्षी लवकर या By सौ.भारती गाडगिलवार | Best Anant Chaturdashi Var Kavita 2023

पुढच्या वर्षी लवकर | Anant Chaturdashi Var Kavita 2023

*काव्यबंध समुह आयोजित सप्टेंबर २०२३* *मासिक दिर्घ कविता लेखन स्पर्धा १४*
*विषय : गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला*
*दि : १४/९/२३ ते २१/९/२३*
*शिर्षक : पुढच्या वर्षी लवकर या*

भाद्रपद मास येता वेध लागते गणेशाचे
सानथोर साऱ्यांच्याच मनात वाहे उत्साहाचे वारे
गृह स्वच्छता, मखर सजावटीत एकत्र होऊन
भावभक्तीने बाप्पाच्या स्वागतास सज्ज होती सारे..

चतुर्थीला बाप्पा तुझे आगमन होता माझ्या घरी
आतुरता मनाची संपली तृप्तावले नेत्र पाहता तुज
तू सुखकर्ता तू दुःखहर्ता, शूर्पकर्णा, लंबोदरा,
नावे किती तुझी विघ्नहर्ता कौतुक वाटे मज…

डोईवर मखमली फेटा सोबत रत्नजडीत तुरा
गौरवर्ण, भाळी त्रिशूळ टिळा, मनमोहक नयन
चतुर्भुज स्वरूप, हाती त्रिशूळ, कमळ, मोदक
जरतारी शेला नि पितांबर पाहून तृप्त होई मन…

मूर्तीच्या उजव्या बाजूला कलश स्थापिला
चांदीचे निरांजन, दुर्वा, जास्वंद, शमीपत्र
तांबूलपत्र, फळं, फुलं, मिष्ठान्नाची आरास
ढोल ताशे टाळ मृदंगाचा स्वर गुंजतो सर्वत्र…

गणरायाच्या आगमनाने संपूर्ण घरात
चैतन्य, उत्साह नि मांगल्याचे वातावरण
सकाळ संध्याकाळ धूप, दीप, नैवेद्य, आरतीने
आत्मिक सुखाने भरून पावले सर्व सेवा क्षण…

गिरिजात्मका, गजवदना, शिवसुता तुज नमाया
जमती सारे गणगोत तव चरणी शिश झुकवती
तुझ्या निमित्ताने आप्त भेटीगाठीला येती उधाण
अष्टविनायक स्वरूपांवर स्तुती सुमने उधळती…

मयुरेश्वर, चिंतामणी, सिद्धिविनायक, महागणपती,
विघ्नेश्वर, गिरिजात्मक, वरदविनायक, बल्लाळेश्वर
साकारत बहू रूपं नि आकार जागृत स्वरूपात
अष्टविनायक रूपात स्वयंभू अवतरले गुणेश्वर…

हर्ष उल्हासात दहा दिवस कसे जाते कळतच नाही
एकेक क्षण सहवासाचे हृदयात कोरले गेले
गजानना तू गणराया गणपती बाप्पा मोरया
म्हणता म्हणता सर्वेश्वरा डोळे तू ओले केले…

जाण्याची वेळ येता कंठ दाटून आज आला
प्रत्येकाच्या मुखावर विरह भाव दिसु लागला
ना होई मन निरोप तुजला द्याया गणराया
आपल्या सहवासाचा धागा सुटू लागला…

आठवांचे क्षण नयनी तरळून गेले
हर्ष, उत्साह, प्रसन्नतेने सुखावलेले चेहरे
सुख, समाधानाने ओतप्रोत सर्वांचे अंतरंग
घरादाराला लागलेले मांगल्याचे पहरे…

आठवता पुन्हा गणराया हर्षित झाले
निरोप देण्या तुजला कर जोडीले
पुढच्या वर्षी लवकर या म्हणत
हात जोडत शिश तुझ्या चरणी नमिले…

ढोल ताशांच्या गजरात विसर्जन केले
घरी आल्यावर रिक्त मखराकडे पाहताना
सुनं सुनं वाटलं, मन पुन्हा उदास झाले
वाटे बाप्पा आहे तेथे जागा न्याहाळताना…

*गणपती गेले गावाला, चैन पडेना आम्हाला*
साऱ्यांच्याच मनाची होती हिच स्थिती
मनोमनी साद घालती सारे गजानना
*पुढच्या वर्षी लवकर या* ऐकावी आमची विनंती..

सौ. भारती गाडगिलवार, चंद्रपूर

पुढच्या वर्षी लवकर या By सौ.भारती गाडगिलवार | Best Anant Chaturdashi Var Kavita 2023

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

पुढच्या वर्षी लवकर या By सौ.भारती गाडगिलवार | Best Anant Chaturdashi Var Kavita 2023

mazablog

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

2 months ago

प्रेमाची हमी | best marathi love poem for gf in 2024

अरविंद कुळकर्णी यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem for gf in 2024 विषयावर रजिस्टर…

2 months ago

ऑनलाईन प्रेम | best Fb love poem in marathi in 2024

सौ. संघमित्रा सोरटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Fb love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

फेक आयडी | Best Facebook love poem in marathi in 2024

प्रवीण मारुती कसबे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Facebook love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

खरं की खोटं | Best Social Media love poem in marathi in 2024

सौ. रेखा पिंगळे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Social Media love poem in marathi in 2024…

2 months ago

प्रेम | Best love poem marathi online pdf in 2024

शालिनी सदाशिव पवार यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem marathi online pdf in 2024 विषयावर…

2 months ago