आधारस्तंभ | Best father daughter poems and quotes in 2023

अनिता मधुकर भोई यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत father daughter poems and quotes विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

father daughter poems and quotes

काव्यबंध समूह आयोजित उपक्रम काव्यलेखन

आधारस्तंभ | father daughter poems and quotes

बाबा माझेच लाडके
किती किती करी लाड
परिस्थिती ती बेताची
तरी पुरे करी लाड

आम्ही तीनच भावंडे
त्यात मी तीन नंबर
भाऊ बहिण आजोळी
मग माझीच कदर

हवे नको सारे दिले
इच्छे प्रमाणे शिक्षण
पण नियम कडक
असे बाबांची राखण

काळ फिरला माघारी
गेले चांगले दिवस
होत चालला कठीण
जीवनाचा तो प्रवास

कष्ट करी रात्रंदिन
हाकी संसाराचा गाडा
काही वेळा व्यसनाने
असे ते घालित राडा

आई असायची गप्प
तिला जमेल तसेच
आम्हा करुन घालील
पण घडे नेमकेच

नाही कमी पडू दिले
पुढे शिक्षणा धाडले
मोठी शिक्षकच होणे
स्वप्न मनीच धरले

माझ्या मामा मामींचीही
भाऊ व बहिणीची ही
नित्य असे मला साथ
यात बाबा ते आग्रही

दिले लग्न ते लाऊन
स्वप्न पूर्ण करी माझे
माझा नवरा मनाने
असे कमी होत ओझे

असा आशिर्वाद लाभे
नेहमीच या बाबांचा
आज तुम्ही नाही तात्या
पण भास हा तुमचा

नाव असे मधुकर
ज्ञानाचेच ते भांडार
शांत सरळ स्वभाव
माया ती आमच्यावर

अनिता मधुकर भोई कुरूंदवाड (कोल्हापूर)

father daughter poems and quotes

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Ashutosh R

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

2 months ago

प्रेमाची हमी | best marathi love poem for gf in 2024

अरविंद कुळकर्णी यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem for gf in 2024 विषयावर रजिस्टर…

2 months ago

ऑनलाईन प्रेम | best Fb love poem in marathi in 2024

सौ. संघमित्रा सोरटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Fb love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

फेक आयडी | Best Facebook love poem in marathi in 2024

प्रवीण मारुती कसबे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Facebook love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

खरं की खोटं | Best Social Media love poem in marathi in 2024

सौ. रेखा पिंगळे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Social Media love poem in marathi in 2024…

2 months ago

प्रेम | Best love poem marathi online pdf in 2024

शालिनी सदाशिव पवार यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem marathi online pdf in 2024 विषयावर…

2 months ago