गर्वाचे घर खाली | Best Katha Lekhan Garvache Ghar Khali 2023

गर्व हि मानवी आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक आहे. Katha Lekhan Garvache Ghar Khali हि अशी बोधकथा आहे ज्यात गर्वाचे दुष्परिणाम गोष्टीतून सांगितलेले आहेत.

Katha Lekhan Garvache Ghar Khali

एका शाळेमध्ये दिनू नावाचा मुलगा राहत होता .तो अतिशय हुशार होता. गणित विषय त्याचा आवडीचा आणि गणितामध्ये वर्गांमधून तो सर्वात हुशार होता. शिक्षक देखील त्याची प्रशंसा करत असायचे ,कारण त्याला गणित हा विषय अगदी मनापासून आवडायचा . त्या विषयाचा तो अभ्यास देखील करायचा. दिनूच्या वर्गामध्ये अगदी शेवटच्या बाका वर बसणारा रमेश ही होता. तो वर्गामध्ये अभ्यासात झिरो होता. त्याला अभ्यास अजिबात जमत नव्हता.तो अभ्यासही करायचा नाही म्हणून, दिनू त्याच्याशी बोलायला नेहमीच नाक वर करायचा .तो त्याच्यासोबत बोलायचा देखील नाही .

दिनूला हुशार असल्याचा स्वतःवर गर्व करत होता. त्यामुळे जो विद्यार्थी अभ्यासात कमजोर आहे तो त्यांना कधीच मदत करायचा नाही. बस “मी आहे तर कोणीच नाही “अशी त्याची भावना होती. एक दिवस शिक्षक वर्गात आले , त्यांनी फळ्यावर त्यांच्या पाठ्यपुस्तकातील एक गणित दिले शिक्षक सोडवायचे आधीच दिनू म्हणाला, सर हे गणित सांगायची गरज नाही मला येत शिक्षक म्हणाले तुला येत, पण बाकीच्यांना तर शिकवायचे ना! स्वतःला येण्याचा तू गर्व करू नकोस! वर्गामध्ये विद्यार्थी आहेत. तर दिनू म्हणाला सर एवढं सोप्प गणित माझ्या मते सगळ्यांनाच यायला पाहिजे. त्याचा तो गर्व पाहून शिक्षकांनी त्याला धडा शिकवण्याच ठरवलं.

Katha Lekhan Garvache Ghar Khali

दिनू हा हुशार होता पण तो स्वतःला वर्गामध्ये अतिशय हुशार समजायला लागला होता. मागच्या बाकावर असलेल्या रमेश याला शिक्षकांनी जवळ बोलावले. आणि त्याला एक महिना वेळ घे असे म्हणाले, तो एक महिना वेळ कशासाठी ?हे जेव्हा रमेशने शिक्षकांना विचारले तेव्हा त्यांनी सांगितलं कि , तू अतिशय हुशार आहेस, तुला माहिती आहे मी तुझा पेपर चेक केला तुझे लिहितोस ना ते अगदी अचूक होतं .आणखी थोडा अभ्यास कर तुझं नाव आणि आई वडिलांचे नाव मोठ कर बस थोडी मेहनत कर .रमेशने शिक्षकांचे बोलणे मनावर घेतले. आणि ठरवले की आजपासून आपणही दिनू सारखे बनायचे.

रमेश आता पहिल्या बाकावर बसायला लागला .गुरुजींनी सांगितलेला संपूर्ण अभ्यास करू लागला. स्वतःला परिपूर्ण करण्यासाठी तो रात्र दिवस मेहनत करू लागला. गणितामध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी तो न समजलेला पार्ट गुरुजींना वारंवार विचारू लागला. त्याची ती प्रगती पाहून गुरुजीला खूप आनंद झाला. पण गुरुजींनी त्याच्याविषयी एकही शब्द वर्गामध्ये बोलले नाही, दिनूला काय करायचे कळत नव्हते पण त्याला नेहमी वाटायचे की ,हा कितीही अभ्यास करेल तरी माझ्या मागेच राहणार. म्हणून दिनू त्याच्याकडे जास्त लक्ष देत नव्हता. रमेश दिनूकडे जर काही विचारायला गेला तर तो त्याला काही सांगायचं नाही.

Katha Lekhan Garvache Ghar Khali

रमेश जेव्हा वर्गामध्ये ब्रेकच्या वेळी अभ्यास करायचा तेव्हा दिनू बाहेर फिरायचा, रमेश एकही क्षण सोडत नव्हता. रमेश आता रात्र जागून अभ्यास करायला लागला , वर्गामध्ये गुरुजींनी शिकवलेल्या सिल्याबस वर टेस्ट घ्यायचे ठरवले. दिनूला वाटले की या वेळेला ही आपण वर्गामध्ये सर्वप्रथम असणार ,म्हणून त्यांनी त्या टेस्टला हलक्यात घेतले ,पण मात्र रमेश ने संपूर्ण रात्र जागून काढली तो त्या टेस्टमध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी सतत अभ्यास करू लागला ,दिनूला वाटले हा अभ्यास करतो आहे. पण याच्या डोक्यामध्ये काहीच बसणार नाही . आणि हा नेहमी सारखाच शेवट असणार असं त्याला वाटलं म्हणून मला टक्कर देणार या वर्गात कोणीच नाही.

Katha Lekhan Garvache Ghar Khali

असा त्याचा गैरसमज होता म्हणून त्यांनी अभ्यास केला ना त्या टेस्ट ला सीरियस घेतले. सर्व विद्यार्थी घरी गेले रमेश कडे आता फक्त एकच दिवस उरलेला होता त्याने घरी आल्यानंतर आंघोळ केली ,तो थोडा फ्रेश झाला बाहेर फिरायला गेला ,आणि लगेच सात वाजता घरी आला. जेवण केलं आणि लगेच तो अभ्यासाला बसला अभ्यास करत असताना त्याला फक्त त्या गुरुजींनी सांगितलेले शब्द आठवत होते .आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करायची त्याच्यामध्ये जिद्द उमललेली होती. तो सतत अभ्यास करत राहिला ,त्याला माहीतच पडले नाही की रात्रीचे तीन कधी वाजले,

Katha Lekhan Garvache Ghar Khali

दुसऱ्या दिवशी सर्व विद्यार्थी वर्गामध्ये बसले ,गुरुजी देखील आले रमेश ची झोप झालेली नव्हती, रमेश चे डोळे सुजलेले होते, गुरुजीं च्या लक्षात आले की रमेश रात्रभर जागलेला आहे. पण त्यांनी तेव्हा त्याला काहीच म्हटले नाही .गुरुजींनी सर्वांना टेस्ट पेपर दिले दिनू हसत होता त्याला वाटलं की या वेळेला सुद्धा मीच प्रथम येईल. दिनू उत्तरे सोडवायला लागला पण त्याला काही प्रश्नांची उत्तरे आली नाही. कारण त्याने अभ्यास केलेला नव्हता तेच तिकडे रमेश स्वतःच्या मेहनतीने संपूर्ण प्रश्नाचे उत्तर सोडवू लागला, कारण त्याने खरंच अभ्यास केलेला होता .पेपर मध्ये असलेले प्रत्येकच प्रश्न त्याने इझीली सॉल्व केले .आणि पेपर सोडवून गप्प बसला दिनू ने टेस्ट पेपर गुरुजींकडे नेऊन दिला. आणि सर्वात शेवट रमेशने पेपर गुरुजींकडे दिला.

Katha Lekhan Garvache Ghar Khali

__________________________

वाचा गोष्ट :- Short Katha Lekhan in Marathi

वाचा गोष्ट :- आईची आत्मा गोष्ट | Aatma Story in Marathi 2023

————————–

दिनू हसला आणि त्याने मनात विचार केला, यांनी एवढा अभ्यास करूनही शेवट पेपर दिला याचा अर्थ याने काहीच लिहिलेल नसेल .वर्गामध्ये सगळ्यात शेवट बसणारा हा काय माझ्यासोबत स्पर्धा करेल, असा तो विचार करत होता. पेपर झाल्यानंतर त्यांचे रेगुलर क्लास सुरू झाले. आणि नंतर सर्व विद्यार्थी घरी गेले रमेश देखील घरी गेला. त्याची झोप न झाल्याने तो अस्वस्थ होता. कारण याआधी त्याने इतका अभ्यास कधीच केलेला नव्हता. पण पेपर दिला रात्र दिवस जागून अभ्यास केल्यानंतर पेपर देण्याची वेगळीच मज्जा आहे. असं त्याला वाटलं, म्हणून तो अभ्यासाकडे आता आणखी जोर द्यायला लागला .दुसरा दिवस निघाला सर्व विद्यार्थी वर्गामध्ये बसले, आणि आता झालेल्या पेपर मध्ये प्रथम कोण याचा विचार करू लागले.

Katha Lekhan Garvache Ghar Khali

दिनू म्हणाला गुरुजी या वेळेला देखील मीच प्रथम ना! आणि स्वतःच्या शर्टच्या कॉलरला हात लावत तो बसला, गुरुजी दोन मिनिटांसाठी त्याच्या चेहऱ्याकडे पाहायला लागले. आणि म्हणाले बस खाली बस या वेळेला प्रथम असा विद्यार्थी आहे ज्याच्याकडून मी फक्त एक छोटीशी मागणी केली होती. आणि ती मागणी देखील त्यांनी पूर्ण केली. वर्गामध्ये सगळ्यात शेवटच्या बाकावर बसणारा रमेश आज वर्गामध्ये सर्वात प्रथम क्रमांक पटकावू लागला. याचा अर्थ की जर तुम्ही मनात काही ठरवलं तर ते तुम्ही काहीही करू शकता.qदिनू वर्गामध्ये सगळ्यात हुशार होता परंतु त्याला गर्व होता की, माझ्यापेक्षा हुशार कोणीच नाही ,त्याला दाखवण्यासाठी गुरुजींचा हा सर्व खेळ होता. आणि गुरुजींच्या विचाराप्रमाणे तसेच घडलं रमेशने मन लावून अभ्यास केला ,आणि वर्गामध्ये प्रथम क्रमांक पटकावला.

Katha Lekhan Garvache Ghar Khali

दिनुला त्याची लाज वाटली आणि त्याला समजले की ,आपण इथे चुकतोय ,अभ्यास केल्याशिवाय मी काहीच नाही ,असं दिनूला वाटले .गुरुजींच्या कल्पनेप्रमाणे तसेच घडले . आणि दिनूला त्याची चूक समजली आता रमेश नेहमीप्रमाणे रोज अभ्यास करू लागला .दिनेश देखील अभ्यास करत होता आणि त्याने कधीच स्वतःवर गर्व केला नाही .

तात्पर्य – गर्वाचे घर खाली

Author :- मिस. प्रतिक्षा गजानन मांडवकर

mazablog

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

2 months ago

प्रेमाची हमी | best marathi love poem for gf in 2024

अरविंद कुळकर्णी यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem for gf in 2024 विषयावर रजिस्टर…

2 months ago

ऑनलाईन प्रेम | best Fb love poem in marathi in 2024

सौ. संघमित्रा सोरटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Fb love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

फेक आयडी | Best Facebook love poem in marathi in 2024

प्रवीण मारुती कसबे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Facebook love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

खरं की खोटं | Best Social Media love poem in marathi in 2024

सौ. रेखा पिंगळे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Social Media love poem in marathi in 2024…

2 months ago

प्रेम | Best love poem marathi online pdf in 2024

शालिनी सदाशिव पवार यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem marathi online pdf in 2024 विषयावर…

2 months ago