आळशी कावळा बोधकथा | Marathi Katha Lekhan Alashi Kavla 2023

हि आहे मनोरंजक आणि गमतीदार कावळ्याची गोष्ट. Marathi Katha Lekhan Alashi Kavla मधून कष्टाचे महत्व सांगणारा छान असा बोध मिळणार आहे.

Marathi Katha Lekhan Alashi Kavla

एक होती चिमणी. आणि चिमणीच्या च झाडाच्या परिसरामध्ये एक कावळा राहत होता. चिमणी दिसायला अगदी देखणी होती. खूप सुंदर होती ,आणि ती कष्टाळू होती . कावळा मात्र दिवसभर इकडून तिकडे बस फिरायचा स्वतःच्या पोटाची काळजी देखील त्याला नव्हती. चिमणीने आणलेल्या दाण्याला आणि तिने तिच्या पिलांसाठी आणलेल्या चाऱ्याला तो चोरायचा आणि स्वतःची भूक भागवायचा. कावळा खूप आळशी होता, त्याला वाटायचं की ,आपल्याला सगळं मिळतच आहे ,मग कशाला काम करायचं ,त्यामुळे तो आजरीही राहायचा. कारण तो कुठलच काम करायचा नाही.

आळशी कावळा बोधकथा | Marathi Katha Lekhan Alashi Kavla 2023

चिमणीने आणलेले दाणे, चारा, पाणी हा बस घेऊन पळायचा चिमणीला हे सर्व माहिती होत. पण चिमणीने कधीच त्याला याबद्दल विचारले नाही की, तू माझा चारा, पाणी का घेऊन जातो? कावळा याच गोष्टीचा फायदा उचलत होता. चिमणी दिवसभर कष्ट करायची इकडून तिकडे फिरायची आणि चारा पाणी मिळवण्यासाठी लोकांचे दगडही खायचे पण स्वतःच्या पिल्ल्यांना उपाशी कसं ठेवायचं हा विचार तिच्या मनात यायचा आणि ती पूर्ण कामाला लागायची भर उन्हात तीच चारा घ्यायला जायची पडलेले तांदळाचे दाणे गहू हे सर्व उन्हाळ्यात आपल्या घरट्या मध्ये जमा करायची. तिला वाटायचं की हे सर्व धान्य आणि चारापाणी पावसाळ्यामध्ये माझ्या पिलांना खायला कामी येईल . कारण भर पावसात तिला चारापाणी कुठून मिळेल ?असा विचार तिच्या मनात यायचा!

आळशी कावळा बोधकथा | Marathi Katha Lekhan Alashi Kavla 2023

म्हणून ती भर उन्हात स्वतःच्या अंगावर ऊन झेलून, पिलांसाठी चारापाणी गोळा करायची. ती खूप कष्टाळू होती काव्याने तिचा चारा पाणी कितीही सोडलं ना तरीही ती त्याला एकही शब्द बोलायची नाही. चिमणीने तिचं घर बनवण्यासाठी जंगलात जाऊन बारीक काड्या आणल्या. एका आजीबाईच्या घरावर ठेवलेला थोडास मेन आणलं. आणि वाळलेले घराच्या आत मधून थोडा आधार मिळावा म्हणून पाने आणले. आणि खुप मेहनत करून एकटीने उन्हाळ्यामध्ये तिच्या घराला बनवलं. घर दिले खूप मोठे बनवलं होतं ज्यामध्ये चार-पाच चिमण्या सहज राहू शकेल आणि पिलांसाठी सुद्धा तुम्ही एक वेगळं घरट बनवलं होतं. ज्यामध्ये तिचे पिल्ले सुरक्षित राहणार. कावळा होता आळशी! त्याने उन्हाळ्यात फक्त फिरफेरी केली ना खाण्यापिण्याची सोय केली. पावसाळा सुरू झाला.

आळशी कावळा बोधकथा | Marathi Katha Lekhan Alashi Kavla 2023


——————————-

वाचा अनाथ मुलगी झाली IPS अधिकारी | Best Katha Lekhan Ek Anath Mulgi 2023

वाचा अति तिथे माती बोधकथा 2023 Ati tithe mati bodhkatha

——————————–


पहिले दोन दिवस पाऊस थोडा कमी होता. म्हणून कावळ्याने तेव्हाही मज्जा करून घेतली. आणि तो फक्त झाडाच्या फांदीवर उभा राहिला, त्यामुळे त्याला पाणी लागल नाही. काही दिवसानंतर पाऊस वाढायला लागला. पाऊस एवढ्या जोरात आला. की कावळ्याला तेव्हा काहीच सुचले नाही. चिमणी मात्र पावसाळ्यामध्ये तिच्या पिलांसोबत घरट्यात सुरक्षित होती .वीज कडकडत होती. खूप जोरात पाऊस पडत होता. कावळा आळशी असल्यामुळे त्याने तिच्या राहण्याची सोय केली नव्हती .म्हणून तो भर पाण्यात ओला झाला, चिंब भिजला. त्याचे पंख ही पूर्ण पाण्याने भिजून गेले .त्याला थंडी वाजू लागली. त्याला काही कळतच नव्हते की आता त्याने कुठे जायचं.

आळशी कावळा बोधकथा | Marathi Katha Lekhan Alashi Kavla 2023

ज्या मित्रांसोबत तो फेरफेरी करत राहायचं त्या मित्रांचे घर बांधलेले होते. आणि त्यांच्या घरात खाण्यापिण्याची सोय होती. म्हणून तो त्याच्या मित्राकडे गेला. आणि मित्राला म्हणाला, की मी तुझ्या घरी आजच्या दिवस राहू का ?मला तुझं अन्न खायला देशील का? त्याचा मित्र म्हणाला तू तर एवढा आळशी आहेस. तू माझ्या घरी आल्यानंतर उठणार ही नाही. आणि एकही काम करणार नाही. मी उन्हाळ्यात खूप कष्ट केले. आणि म्हणून हे घर उभं केलं. आणि हे घर फक्त माझ्या पुरतच आहे. म्हणून मी तुला या घरात जागा देऊ शकत नाही. त्याच्या मित्राच असं बोलणं ऐकून कावळा खचून गेला. त्याला वाटलं आता आपलं मरण निश्चितच आहे .म्हणून ज्या चिमणीचे अन्न तो चोरून खायचा त्या चिमणीकडे तो गेला. आणि तिला म्हणाला, “चिऊताई चिऊताई “दार उघडते का? चिऊताई म्हणाली कोण रे बाबा तू !आणि एवढ्या पाण्यात कसा काय आला? चिमणीने तिच्या घरट्याच्या खिडकीतूनच त्याला म्हटलं.

आळशी कावळा बोधकथा | Marathi Katha Lekhan Alashi Kavla 2023

कावळा म्हणाला अगं ये “चिऊताई “तुझ्या घराच्या बाजूलाच मी राहतो. तुझं अन्न चोरून खातो ,आज मला समजलं की आळस काय असते. आणि या आळसामुळे आज मी माझ्या मरणादारी उभा आहे. मला तुझ्या घरात थोडी जागा देते का? यानंतर मी असं कधीच वागणार नाही .त्याचं ते बोलणं ऐकून चिऊ ताईला थोडं वाईट वाटलं. आणि चिऊताई ने दार उघडलं कावळ्याला तिच्या घरात बोलावलं. आणि घरट्यामध्ये असलेलं कापसाचा गोळा त्यावर त्याला बसवलं. चिऊताईने थोडी आग पेटवली, आग पेटवून कावळ्याला शेकायला दिलं .कावळा खूप ओला चिंब झाला होता ,त्याचे डोळे मिटले होते, पंख सारे मरडले होते, चिऊताई ने त्याला शेकावा दिला. त्याला तेव्हा आधार दिला, तिने साठवून ठेवलेलं उन्हाळ्यातलं अन्न त्याला खायला दिलं.

आळशी कावळा बोधकथा | Marathi Katha Lekhan Alashi Kavla 2023

कावळ्याची तब्येत थोडी सुधारली. कावळ्याला त्याची चूक समजली. आणि नंतर कावळा तिला म्हणाला, तुला तर माहिती आहे मी अन्न तुझं चोरतो, तुझ्या पिलांना त्रास देतो, तरीसुद्धा तू माझी मदत केलीस !चिऊताई म्हणते नाही रे बाबा, मी तुझी मदत केली नाहीये! तुला आता अक्कल आली आहे, आणि तू नेहमीसाठी आळस सोडशील यापेक्षा मोठी गोष्ट काय असणार. बरं आणि मला माहितीये आता तू कष्टाने जगशील चिऊताईचे हे बोलणं ऐकून कावळ्याला त्याची लाज वाटली. आणि त्याने ठरवलं की आता आळस करायचं नाही. आणि ज्या मित्रांसोबत तो फेराफेरी करत होता त्या मित्रांच्या दूर राहायचं.

तात्पर्य- जो व्यक्ती आळस करतो, तो जीवनात काहीच मिळू शकत नाही आणि त्या व्यक्तीला दुसऱ्याचा नेहमी आधार घ्यावा लागतो.

तात्पर्य -आपल्या चांगुलपणाने आपण वाईट व्यक्तीला बदलू शकतो त्यासाठी त्यांच्यासोबत वाईटच वागले पाहिजे असे नाही

आळशी कावळा बोधकथा | Marathi Katha Lekhan Alashi Kavla 2023

Author :- मिस. प्रतिक्षा गजानन मांडवकर

mazablog

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

2 months ago

प्रेमाची हमी | best marathi love poem for gf in 2024

अरविंद कुळकर्णी यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem for gf in 2024 विषयावर रजिस्टर…

2 months ago

ऑनलाईन प्रेम | best Fb love poem in marathi in 2024

सौ. संघमित्रा सोरटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Fb love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

फेक आयडी | Best Facebook love poem in marathi in 2024

प्रवीण मारुती कसबे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Facebook love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

खरं की खोटं | Best Social Media love poem in marathi in 2024

सौ. रेखा पिंगळे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Social Media love poem in marathi in 2024…

2 months ago

प्रेम | Best love poem marathi online pdf in 2024

शालिनी सदाशिव पवार यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem marathi online pdf in 2024 विषयावर…

2 months ago