Katha Lekhan Ek Anath Mulgi

अनाथ मुलगी झाली IPS अधिकारी | Best Katha Lekhan Ek Anath Mulgi 2023


म्हणतात न कि अनाथ मुलांना आई वडिलांचे महत्व जरा जास्तच कळते. किंमत हि नसल्यावरच जास्त अधोरेखित होते. वाचूया Best Katha Lekhan Ek Anath Mulgi 2023.

Katha Lekhan Ek Anath Mulgi

अनाथ मुलगी

एका गावामध्ये एक मुलगी राहत होती तिचे नाव गीता होते.ती खूप कष्ट करणारी ,होतकरू होती.वडिलांचं सायकल रिपेरिंग दुकान होतं. वडिलांचे अतोनात कष्ट पाहून ती ही आयपीएस अधिकारी बनण्याचे स्वप्न पाहत होती. वर्गामध्ये अतिशय हुशार असल्याने आणि दिवस रात्र मेहनत केल्याने ती वर्गामध्ये नेहमीच पहिला नंबर पटकावत होती. तिची काहीतरी करण्याची जिद्द आणि मनामध्ये असलेल स्वप्न पूर्ण करण्यासाठी नको ते ती प्रयत्न करायची.

वडिलांना तिचा अभिमान वाटायचा म्हणून वडील देखील रात्र दिवस कष्ट करायचे. नको त्या कामाला जायचे. आणि तिच्या स्वप्नांकडे लक्ष द्यायचे ,कधी कधी त्यांच्याकडे एक वेळेच जेवणही नसायच. पण त्या गोष्टीची काळजी न करता ,ती फक्त आणि फक्त अभ्यासावर जोर द्यायची ,माझ्याकडे कुठली गोष्ट नाही अशी कधीच तिने तक्रार केली नाही. तिला त्या गोष्टीची अपेक्षाही नव्हती .ती सहा महिन्याची असताना तिची आई देवा घरी . गेली पण आई ही नेहमी आपल्या सोबतच असते, आणि ती नेहमी आपल्या सोबतच आहे .असं समजून ती आईच्या फोटो सोबत बोलायची. वर्गामध्ये घडलेल्या प्रत्येक गोष्टी ती तिच्या आईच्या फोटोला सांगायची सर्व मुलाकडे असलेली बॅग. टिफिन बॉक्स, आणि लिहायला असलेली बुक पाहून तिचीही कधी कधी इच्छा व्हायची .

Katha Lekhan Ek Anath Mulgi

Katha Lekhan Ek Anath Mulgi 2023

ती वडिलांना म्हणायची बाबा मलाही या गोष्टी हव्या आहे. पण घरी जेवणाची सुविधाही नसल्यामुळे वडील विचारात पडायचे, तिच्या आशा अपेक्षा ते पूर्ण करू शकत नव्हते. वडिलांच्या डोळ्यांमध्ये नेहमीच पाणी यायचे की, आपण आपल्या मुलीला कुठल्याही गोष्टी उपलब्ध करून न देता ती क्लासमध्ये फर्स्ट आहे . त्या गोष्टीचा त्यांना नेहमीच अभिमान वाटायचा. गीता मोठी झाली तिने दहावी बोर्ड एक्झाम पास केली. आणि पुढील शिक्षणासाठी, दुसऱ्या शहरात जाण्यासाठी वडिलांची परवानगी घेऊ लागली. वडीलही तयार झाले. तिची ऍडमिशन त्यांनी मोठ्या शहरांमध्ये असलेल्या एका कॉलेजमध्ये केली. ती मन लावून शिकू लागली ,आणि ते शिकत असताना देखील जॉब करत होती. आणि तिचा खर्च ती भागवत होती.

Katha Lekhan Ek Anath Mulgi

वडिलांचे अतोनात कष्ट आणि तिने केलेली मेहनत तिला नक्कीच तिच ध्येय पूर्ण करण्यासाठी आणि यशाची पायरी चढण्यासाठी मदत करत होत. वडील हे कालांतराने आजारी राहायला लागले. त्यांचे हात सुजू लागले, वडील आजारग्रस्त झाले. त्यांच्याकडून आता कुठलाच काम होत नव्हत. हातावर नेहमी सुजन राहत होती . त्यामुळे ते सायकल रिपेरिंग चे कामही करू शकत नव्हते .गीता त्यांना तिच्या कमावलेल्या पैशातून काही पैसे वडिलांकडे पाठवायची त्या पैशातूनच वडील खाण्याची सोय करायचे. वडिलांची बिघडती तब्येत पाहून गीताने वडिलांना तिच्याकडे नेण्याचा निर्णय घेतला.

__________________________

वाचा गोष्ट :- Short Katha Lekhan in Marathi

वाचा गोष्ट :- आईची आत्मा गोष्ट | Aatma Story in Marathi 2023

__________________________

गीता वडिलांना घेऊन शहरात गेली. आता गीता कमावू लागली, आणि वडील घरी राहू लागले पण दिवसांन दिवस वडिलांची तब्येत आणखीच बिघडत होती. त्यामुळे गीता कमजोर झाली. एक दिवस वडील झोपून असताना गीताला आवाज देतात, आणि म्हणतात ,बेटा इकडे ये वडिलांची खराब झालेली तब्येत पाहून गीता घाबरली. आणि तिच्या डोळ्यांमध्ये पाणी आलं वडिलांनी तिचा हात हातात घेतला. आणि तिला म्हणत होते “आयुष्यामध्ये जर तुला यशस्वी व्हायचे असेल, तर अतोनात कष्ट कर, प्रयत्न कर, आणि तोपर्यंत थांबू नको जोपर्यंत तुझे ध्येय पूर्ण होत नाही.”

Katha Lekhan Ek Anath Mulgi

Katha Lekhan Ek Anath Mulgi

जीवनामध्ये कोणी सोबतीला नसतो. सोबत असतो तर तो आपला आत्मविश्वास! आणि आत्मविश्वास असला तर माणूस कुठल्याही यशाला सहज गाठू शकतो. त्यासाठी तुला फक्त आणि फक्त मेहनत करावी लागेल. आज मी असेल उद्या नाही .पण तू कधी हिम्मत हारू नकोस .बस नेहमी प्रयत्न कर मी तुझ्यासोबत शरीराने नसेल पण माझी आत्मा ही नेहमीच तुझ्यासोबत असेल, मला आता तुझ्या आईकडे जावं लागेल. आणि असं म्हणत गीताच्या वडिलांनी शेवटचा श्वास घेतला. गीता “अनाथ” झाली गीताजवळ आता आई होती ,ना बाबा गीता खूप रडली तिला कळतच नव्हतं की तिने काय करायला पाहिजे.

Katha Lekhan Ek Anath Mulgi

पण बाबांनी सांगितलेले शब्द हे तिने हृदयात कोरले होते. करायचं म्हणजे करायचं असं तिने ठरवलं होतं. गीता त्या मोठ्या शहरांमध्ये एकटीच राहायची.जॉब करायचे पैसे कमवायचे, आणि स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अतोनात प्रयत्न करायची . गीताने पाहिलेले स्वप्न अस्तित्वात आल .गीता आयपीएस अधिकारी झाली .वडिलांचे स्वप्न तिने पूर्ण केल. आणि आयपीएस अधिकारी झाल्यानंतर तिने असंख्य अनाथ मुलांना शिकवण्याचा ठरवलं. ती मुलांना शिकवू लागली. त्यांच्या शाळेचा संपूर्ण खर्च ती उचलत होती. ज्या गोष्टी तिला मिळाल्या नाही. त्या सर्व गोष्टी ती त्यांना पुरवत होती. अशाप्रकारे गीताने तिचं स्वतःच आणि आई-बाबांचे स्वप्न पूर्ण केलं तिची एक ओळख बनवली.

Katha Lekhan Ek Anath Mulgi

Author :- मिस. प्रतिक्षा गजानन मांडवकर

Pratiksha

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
12 × 7 =