खरी उपासना | Best marathi Poem On Soldiers In 2024

अरविंद कुळकर्णी यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi Poem On Soldiers in 2024 विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

marathi Poem On Soldiers in 2024

काव्यबंध समूह आयोजित काव्यलतिका रविवारीय काव्यस्पर्धा दि.२५/०२/२०२४

विषय – सैनिकासाठी कविता

खरी उपासना | marathi Poem On Soldiers in 2024

तिरंगा झेंडा देतो खरी प्रेरणा
आम्हां भारतीयांना अभिमान
जन गण मन हे प्रिय राष्ट्रगीत
इथे सैनिकांचा सदैव सन्मान…(१)

भारतमाता तुझ्याच चरणी
सैनिक अर्पण करतात प्राण
शत्रूंशी देती निकराचा लढा
करून सर्वस्वाचे बलिदान…(२)

आम्हां भारतीयांची ही परंपरा
मातृभूमीशी जननीसम नाते
फासावर लटकवले जरी कधी
असे काय त्यांचे अपराध होते…(३)

सीमेवरती लढले सैनिक
जीवन त्यांचे झाले कृतार्थ
भारतभूचे रक्षण करण्यास
कधी,कुठे अन् कसला स्वार्थ…(४)

दऱ्या खोऱ्यातून दूर सर्वत्र
भारत माता कि जय,गर्जना
समानतेचा धागा जोडूनच
देशभक्ती हीच खरी उपासना…(५)

सैनिक हो तुमच्यासाठी उघडा
भारतीयांच्या हृदयाचा दरवाजा
प्रामाणिकपणे तुम्ही कार्य करता
न करता कोणताही गाजावाजा…(६)

भारतासाठी तूमचा मोठा त्याग
खंत त्याची नसते मनाला कधी
स्वार्थ साधण्यास आम्ही अपुरे
देशासाठी आम्हां मिळेल अवधी ?..(७)

वंदन मातृभूमीस हा नित्यक्रम
जगणे केवळ फक्त तुझ्यासाठी
वाकड्या नजरेने पाहता कुणी
तुझ्या कपाळावर पडते आठी…(८)

घरदार,मुलेबाळे हे सारे तर
सामान्य माणसाचेच जगणे
सैनिक हे असामान्य व्यक्ती
देशाच्या गौरवात सारे शोधणे…(९)

देशाच्या सीमेवर उभे असता
बिनधास्त खरे भारतीय सारे
विजयी पताका फडकविता
आम्ही लावतो देशासाठी नारे…(१०)

देवदुर्लभ भारतीय सैनिक
आम्हां आहे सार्थ अभिमान
तूमच्या कर्तृत्वामुळे सतत
वाढतोय भारताचा सन्मान…(११)

सामान्य जगण्यापेक्षा वाटते
शहीद होणे जास्त गौरवशाली
कारण सैनिका सोबत नेहमीच
विश्वविजयी तिरंगा भोवताली…(१२)

*अरविंद कुळकर्णी*
*मलकापूर*
*जिल्हा – बुलडाणा*

marathi Poem On Soldiers in 2024

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Ashutosh R

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

2 months ago

प्रेमाची हमी | best marathi love poem for gf in 2024

अरविंद कुळकर्णी यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem for gf in 2024 विषयावर रजिस्टर…

2 months ago

ऑनलाईन प्रेम | best Fb love poem in marathi in 2024

सौ. संघमित्रा सोरटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Fb love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

फेक आयडी | Best Facebook love poem in marathi in 2024

प्रवीण मारुती कसबे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Facebook love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

खरं की खोटं | Best Social Media love poem in marathi in 2024

सौ. रेखा पिंगळे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Social Media love poem in marathi in 2024…

2 months ago

प्रेम | Best love poem marathi online pdf in 2024

शालिनी सदाशिव पवार यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem marathi online pdf in 2024 विषयावर…

2 months ago