जय अंबे आणि नवरात्री | 2 Best navratri marathi shayari

शालिनी सदाशिव पवार आणि सौ. राधा खानझोडे यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत navratri marathi shayari विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

navratri marathi shayari

काव्यबंद समूह
आयोजित (काव्य लतिका)
दर रविवारी होणारी
दीर्घ काव्य स्पर्धा

जय अंबे | navratri marathi shayari

जय अंबे जगदंबे
भाळले तुझजवर मी अंबे
जय अंबे जगदंबे
व्याघ्रारूढ हाती खड्ग घेऊनी
पितांबरी वस्त्र धारीणी
नाना अलंकार लिवूनी

जय अंबे जगदंबे
भळले तुजवर मी आंबे
तूच तू विद्या देवते
तूच ती अन्नपूर्णा माते
लक्ष्मी तू पार्वती माते

जय अंबे जगदंबे
भाळले तुजवर मी अंबे
तूच रेणुका तू भवानी
तूच तू हंस वाहिणी़
शिवदाशिसी तू ब्रह्मचरणी

जय अंबे जगदंबे
भाळले तुझ्यावर मी अंबे
कमला तू विष्णू शक्ती होशी
आनंदी वरदान देऊनी तारसी
भक्ता तू अभय दान देशी

जय अंबे जगदंबे
भाळले तुजवर मी अंबे
नवरात्रीचे दिवस नऊ
रूपे तुझे स्वानंदे पाहू
तुजला आरती, गाणे गाऊ

जय अंबे जगदंबे
भाळले तुजवर मी आंबे
नऊ रंगाचे नवं वस्त्र तुजला
फळा ,फुलांची आरास तुला
तुझ्या उपवासाचा हर्ष मला
जय अंबे जगदंबे
भाळले तुजवर मी आंबे

शालिनी सदाशिव पवार/प्राचार्या संकपाळ मॅडम कोल्हापूर/ निपाणी
९४२३०२०२२१

navratri marathi shayari

काव्यबंध समूह आयोजित साप्ताहिक काव्य लतिका स्पर्धा…
दिनांक:-८/१०/२०२३

नवरात्री | navratri marathi shayari

नवरात्रीचा उत्सव सजला
अश्विन शुद्ध प्रतिपदा
मनोभावे पूजन करावे
टळेल सारी विपदा…!!१!!

नवरात्री नऊ दिवस
चाले देवीचे जागरण
उत्सव हा जल्लोषाचा
भजन ,पूजन ,कीर्तन…!!२!!

शैलपुत्री, ब्रह्मचारिणी
चंद्रघंटा ,कुष्मांडा देवी
जागर करू भवानीचा
सर्वांना सुखी ठेवी…!!३!!

दैदीप्यमान तेज देवीचे
दाही दिशा उजळती
भक्ती भावे पूजा करावी
मिळेल आरोग्य ,यश शक्ती…!!४!!

यथोचित पूजा केल्यास
तणाव चिंता दूर होते
महान शक्ती देवीची
ऊर्जेचा स्त्रोत मानते….!!५!!

देवीच्या उपासनेने
प्रगट होते आत्मिक शक्ती
यश प्रगती कीर्ती साठी
करावी एकाग्रचित्ते भक्ती…!!६!!

असुरांचा धुमाकूळ
अतिशय तांडव माजले
दिनी दशमीला
या दैत्यास ठार मारले..!!७!!

कृपा हस्त सदैव राही
व्याधी पासून मुक्त करी
यश समृद्धी प्रगतीच्या
सदैवच वाट धरी…!!८!!

सौ. राधा खानझोडे ,नागपूर..

navratri marathi shayari

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Ashutosh R

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

2 months ago

प्रेमाची हमी | best marathi love poem for gf in 2024

अरविंद कुळकर्णी यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem for gf in 2024 विषयावर रजिस्टर…

2 months ago

ऑनलाईन प्रेम | best Fb love poem in marathi in 2024

सौ. संघमित्रा सोरटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Fb love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

फेक आयडी | Best Facebook love poem in marathi in 2024

प्रवीण मारुती कसबे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Facebook love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

खरं की खोटं | Best Social Media love poem in marathi in 2024

सौ. रेखा पिंगळे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Social Media love poem in marathi in 2024…

2 months ago

प्रेम | Best love poem marathi online pdf in 2024

शालिनी सदाशिव पवार यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem marathi online pdf in 2024 विषयावर…

2 months ago