आदिमाया आदिशक्ती आणि नऊ रंग नवरात्रीचे | 2 Best navratri marathi whatsapp status

छाया नाळे आणि गोविंद शिवराम कुलकर्णी यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Jivan Gane Marathi Poem विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

navratri marathi whatsapp status

काव्यबंध समूह आयोजित काव्य लतिका स्पर्धा
दिनांक- 8 ऑक्टोबर 2023
विषय-नवरात्र

आदिमाया आदिशक्ती | navratri marathi whatsapp status

आदिमाया शक्ती जागृत झाली
दृष्टांचा संहार कराया ती धावली

नऊ दिवसांचा घट स्थापिला
नवरात्री जागर केला

बळीराजाचे स्मरण करूनी
तो अर्पिला परमेशा चरणी

स्त्री शक्तीची नऊ रूपे
उद्धरिती जणू कलियुगे स्वरूपे

मनामनातील शुंभ निशुंभाचा
नाश करुनी उद्धार जगाचा

घट प्रतिक आपल्या जन्माचे
अंकुरे बीज सार्थक्याचे

नवनिर्मिती सवे दुःख विसरूनी
पुन्हा नव्याने उमलु जीवनी

संस्कृतीची महान प्रचिती
वृत्त वैकल्यासवे मोक्ष प्राप्ती

जागवूनी मनी ती भक्ती
आदिमाया तू आदिशक्ती

महिषासुरमर्दिनी नमन तुला
कृपा आशिष सदा दे मला

संसाररूपी मायेतून सदा
घडो न विस्मृती मज कदा

उत्सव नवरात्रीचा केला
आनंदाचा सण दसरा आला

दाही दिशा प्रफुल्लित होऊनी
सर्वजण हर्षती ते मनी

सांगता आनंदाने होता
लाभली जीवनी सार्थकता

स्मरण करूनी जगदंबेचे
समर्पण ते अंतरीचे
समर्पण ते अंतरीचे

छाया नाळे( भुजबळ)सातारा

navratri marathi whatsapp status

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
काव्य बंध समुह आयोजित
साप्ताहिक काव्य लतिका स्पर्धा
दिनांक. ८/१०/२०२३
विषय : नवरात्री
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

नऊ रंग नवरात्रीचे | navratri marathi whatsapp status
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

शारदीय नवरात्रीचे
नऊ रंग ,नऊच दिन,
नवरात्रीची नऊ रूपे
नववधूचा असे मान……१

केशरी वस्त्र पांघरूनी
दुर्गा माता अवतरली.
दुर्गा मातेच्या पूजनाने
अथेति ऊर्जा उपाधली….२

पांढरा रंग शुद्धतेचा
साधेपणाच दर्शवतो.
देवीच्या आशीर्वाचनाने
शांत मुद्रा अवलंबतो….३

उत्साह प्रेमाचे प्रतीक
दुर्गा मातेला लाल वस्त्र,
भक्ती शक्ती फुलवतात
हातामध्ये असते अस्त्र…४

गडद निळा रंग देतो
अतुलनीय अनुभूती.
सुख समृद्धी शांततेची
विलोभनीय प्रतिकृती…५

पिवळा रंग आशावादी
दुर्गा मातेला दिसे भारी ..
आईचे संस्कार ,वास्तल्य
प्रेम रूपे दिसते न्यारी….६

हिरवा रंग नैसर्गिक
स्थिरता वाटे अचानक .
मांगल्याचे दिसे प्रतीक
मातेच्या रूपात अथक…७

राखाडी रंग संतुलित
साधे होण्यासाठी प्रेरीत .
फुलोरा असे सप्तमीस
दुर्गा मातेच्या आनंदात…८

जांभळा रंग राजेशाही
कुमारिकांच्या आठवणी ..
हळदी कुंकू अष्टमीस
सुख , समृद्धी, अक्षवाणी…९

निळ्या हिरव्याचे मिश्रण
मोरपंखी देतो आदर.
दुर्गा मातेचा आशीर्वाद
मीळे जीवनाला आधार…१०

(C)(R)
गोविंद शिवराम कुलकर्णी
नौपाडा ठाणे
९८२०५ ८४४७९

navratri marathi whatsapp status

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Ashutosh R

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

2 months ago

प्रेमाची हमी | best marathi love poem for gf in 2024

अरविंद कुळकर्णी यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem for gf in 2024 विषयावर रजिस्टर…

2 months ago

ऑनलाईन प्रेम | best Fb love poem in marathi in 2024

सौ. संघमित्रा सोरटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Fb love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

फेक आयडी | Best Facebook love poem in marathi in 2024

प्रवीण मारुती कसबे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Facebook love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

खरं की खोटं | Best Social Media love poem in marathi in 2024

सौ. रेखा पिंगळे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Social Media love poem in marathi in 2024…

2 months ago

प्रेम | Best love poem marathi online pdf in 2024

शालिनी सदाशिव पवार यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem marathi online pdf in 2024 विषयावर…

2 months ago