आमचा सैनिक | Best sainik kavita marathi in 2024

सौ. समीक्षा जामखेडकर यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत sainik kavita marathi in 2024 विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

sainik kavita marathi in 2024

स्पर्धेकरीता,
काव्यबंध समूह आयोजित
कवयलातिका रविवारीय काव्य स्पर्धा
दिनांक २५/२/२०२४
विषय सैनिकासाठी कविता

आमचा सैनिक | sainik kavita marathi in 2024

भारत देश आपला
आम्हाला अभिमान
शूर वीर जन्मले इथे
करतो आम्ही त्यांचा सन्मान —-१

आमचा सैनिक देशासाठी
घरदार ,सुखी संसार सोडतो
ऊन, पाऊस, थंडी काहीही असो
देशासाठी निस्वार्थीपणे लढतो —-२

आमचा सैनिक आहे
नेहमीच देशाचे एक छत्र
वेळही नसतो त्याला कधी
घरी लिहिण्यास मनसोक्त पत्र —३

आई वडील देशरक्षणासाठी
गे मायभूला आपला पुत्र देतो
वंदन त्या मातापित्यांना आमचा,
सीमेवर उभा राहून आपले रक्षण करतो —४

हसत हसत सीमेवर पाठवतात
मन त्याचं काय म्हणत असेल
छातीवर दगड ठेवून पाठवतात
वेदना त्यांच्या मनाला होत नसेल — ५

भारत मातेसाठी सैनिक
जीव ओवाळून टाकत असतो
जिवावर उदार होवून लढतो म्हणून
सण आपण आनंदाने साजरे करतो —६

तिरंगा कायम मनात ठेवून
शत्रूशी तो लढत असतो
समर्पण वृत्ती असते त्याची
तो सीमेवर रात्रभर जगतो —–७

सैनिक कोणाचा भाऊ असतो
कोणाचा असतो तो पती
पिता तोच सुपुत्र तो कोणाचा
काय वर्णावी त्याची महती —-८

मातृभूमीची सेवा करत राहतो
तो त्यागत असतो आपले घरदार
सुखी संसार सोडूनी सीमेवर लढतो
किती किती मानू त्याचे आभार —९

कुठे बातमी हल्ल्याची येता
घरच्यांचे होते काळजाचे पाणी
सैनिक आमचा सीमेवर असतो
डोळ्यात आमच्या नकळत पाणी –१०

आमचा सैनिक असा सुपुत्र
जन्मावा प्रत्येक आईच्या पोटी
त्याला आठवणीत ठेवून नेहमी
वंदन त्याला आमचे कोटी कोटी —-११

सौ. समिक्षा बाळासाहेब जामखेडकर संभाजीनगर

sainik kavita marathi in 2024

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Ashutosh R

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

2 months ago

प्रेमाची हमी | best marathi love poem for gf in 2024

अरविंद कुळकर्णी यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem for gf in 2024 विषयावर रजिस्टर…

2 months ago

ऑनलाईन प्रेम | best Fb love poem in marathi in 2024

सौ. संघमित्रा सोरटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Fb love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

फेक आयडी | Best Facebook love poem in marathi in 2024

प्रवीण मारुती कसबे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Facebook love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

खरं की खोटं | Best Social Media love poem in marathi in 2024

सौ. रेखा पिंगळे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Social Media love poem in marathi in 2024…

2 months ago

प्रेम | Best love poem marathi online pdf in 2024

शालिनी सदाशिव पवार यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem marathi online pdf in 2024 विषयावर…

2 months ago